कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यात आज सोमवारी २७८६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई, दि. १५:आठवडा विशेष टीम― राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात आज पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी १ लाख १० हजार ७४४ नमुने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०,मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७, कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३,जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना २).

आज नोंद झालेल्या १७८ मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये ( ६९.३४ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४१२८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. पूर्वीच्या कालावधीतील १४९ मृत्यूंपैकी मुंबई ६३, वसई विरार – १९, मीरा भाईंदर – १२, नवी मुंबई -१२, धुळे -१०, ठाणे -११ , पनवेल -७, कल्याण डोंबिवली – ८, जळगाव – २, जालना -२, पालघर – १,सोलापूर -१ आणि रायगड -१ मृत्यू असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५९,२९३), बरे झालेले रुग्ण- (३०,१२५), मृत्यू- (२२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,९१०)

ठाणे: बाधित रुग्ण- (१८,७३२), बरे झालेले रुग्ण- (७८९०), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३६१)

पालघर: बाधित रुग्ण- (२४७६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९१)

रायगड: बाधित रुग्ण- (१९३२), बरे झालेले रुग्ण- (१२४७), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६११)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४३५), बरे झालेले रुग्ण- (२९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३)

पुणे: बाधित रुग्ण- (१२,४१९), बरे झालेले रुग्ण- (७२७९), मृत्यू- (४९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६४६)

सातारा: बाधित रुग्ण- (७५२), बरे झालेले रुग्ण- (४६१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३)

सांगली: बाधित रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७२९), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१८८९), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६६)

नाशिक: बाधित रुग्ण- (२००६), बरे झालेले रुग्ण- (१२१४), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७८३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

धुळे: बाधित रुग्ण- (४३३), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२७८६), बरे झालेले रुग्ण- (१५१६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३५)

जालना: बाधित रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१७१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)

बीड: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

परभणी: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

नांदेड: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण (१६१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

अमरावती: बाधित रुग्ण- (३५१), बरे झालेले रुग्ण- (२५८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

अकोला: बाधित रुग्ण- (१०२६), बरे झालेले रुग्ण- (५६८), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१३७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

नागपूर: बाधित रुग्ण- (१०४६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१०)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)

भंडारा: बाधित रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)

एकूण : बाधित रुग्ण-(१,१०,७४४), बरे झालेले रुग्ण- (५६,०४९), मृत्यू- (४१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव्ह रुग्ण-(५०,५५४)

(टीप– आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आय सी एम आर ) यांच्यावतीने मे २०२० मध्ये देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो-सर्व्हे करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली असून या प्रकारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे परंतू याचा दुसरा अर्थ राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने अद्याप प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसून कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणा-या पृष्ठभागाची स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक आहे. येणा-या काळातही प्रभावी सर्वेक्षण आणि काटेकोर कंटेनमेंट धोरण यावर भर देणे आवश्यक राहणार आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.