नाशिक लाचलुचपत विभागाची कारवाई : बिल पास करण्यासाठी ठेकेदाराला मागितली लाच
जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत सिंचन विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे (रा. जळगाव) या अधिकाऱ्याला 13 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जि.प. आवारात सापळा रचून ही कारवाई केली.
जिल्हा परिषदमधील सिंचन विभागातील लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे याने ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी १५ हजाराची मागणी केली होती तक्रारदार ठेकेदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
सोमवारपासुन एसीबीच्या पथकाचा सापळा
तक्रारीची पडताळणी झाल्यावर
नाशिक विभागाचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कळासने, पो.नि. चंद्रकांत फालक, पो.ना. श्री. सपकाळे, प्रविण महाजन, पी.एच. पगारे या पथकाने सोमवारपासून जिल्हा परिषदेच्याचआवारात सापळा रचलेला होता. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ठेकेदाकडून तडजोडीअंती ठरलेली 13 हजाराची लाच घेतांना सुरेंद्रकुमार अाहिरे यांना पथकाने रंगेहाथ अटक केली आहे कोरोना अन् त्यातच लॉकडाऊन यादरम्यान जिल्हा परिषदेत झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.