तिरोडा:बिंबिसार शहारे― तिरोडया तालुक्यातील ग्राम बोरगाव येथे विधवा महिला प्रतिमा ऊके वय ३५ वर्ष मुलगी विधी ऊके वय 10 वर्ष हिचेसह दोघी मायलेकी दिनांक 15/06/2020 ला रात्री 11.30 वाजता त्या दरम्यान झोपले होते. सासरा दिनदयाल ऊके हयाने दिवसा दारू पिण्याकरता सुनेला पैसे मागितले होते. सुनेने पैसे न दिल्यामुळे मायलेकी गाढ झोपेत असतांना सुनेवर हात पाय व अन्य ठिकाणी कुर्हाडीने वार केेले. मारत असताना आरडाओरड झाली. व मुलीची काकू प्रकार ऐकल्यावर विधी मुलीला वाचवले. प्रतिमाला वडेगाव दवाखान्यात उपचाराकरता नेण्यात आले. गंभीर दुखापत असल्यामुळे गोंदिया शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आले. तेथेच सिटीस्कॅन करून बाहेकर नर्सिंग होम येथे आयसीयू विभागात ठेवले आहे. आरोपीवर कठिनात कठीन कारवाई करण्यात यावी. अशी मागणी परिवाराकडून केली जात आहे.
0