अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

काँग्रेस नेते खा.राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 19 जून रोजी कोरोना योद्धा यांचा सन्मान करून गरजूंना अन्न पाकिटे वाटप करणार―राजकिशोर मोदी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खा.राहुलजी गांधी यांचा 19 जून रोजी वाढदिवस आहे.वाढदिवसाच्या निमीत्ताने काँग्रेस पक्ष कार्यकर्ते यांनी गरजूंना अन्न पाकिटे वाटप करून मदत करणार असून तसेच कोरोना विषाणू साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर संकटकाळी विविध माध्यमातून मदत व सहकार्य करणा-या कोरोना योद्धा यांचा सन्मान करणार असल्याची माहिती देवून या उपक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते,आजी माजी पदाधिकारी,सर्व सेल,विभाग,जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

याबाबत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले आहे की,काँग्रेस अध्यक्षा मा.खा.सोनियाजी गांधी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाच्या संकटात बीड जिल्हा काँग्रेस,ब्लॉक काँग्रेस आणि संलग्नित फ्रंटल व सेलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केलेले मदतकार्य प्रशंसनीय आहे.या कठीण काळात लोकांचे दुःख दूर करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेल्या स्तुत्य प्रयत्नांचे पक्षाला मनापासून कौतुक आहे.आपल्या सर्वांना माहित आहेच की,काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांचा 19 जूनला वाढदिवस आहे.परंतू,सध्या कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता या वर्षीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.कोविडचा गंभीर परिणाम होईल असा इशारा केंद्र सरकारला मा.राहुलजी गांधी यांनीच सर्वांत आधी देऊन,योग्य ती पावले उचलण्याचा सल्ला दिला होता.आता पुन्हा एकदा माननीय काँग्रेस अध्यक्षा,सोनियाजी गांधी आणि आदरणीय राहुलजी गांधी यांनी व्यापक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे,थेट रोख हस्तांतरण योजना, स्थलांतरित कामगारांसाठी मोफत प्रवासाची सोय,कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवणे आणि आरोग्य कर्मचा-यांना चांगल्या सुविधा द्याव्यात यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरला आहे.गरीब कामगारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मा.राहुलजी हे स्वतः रस्त्यावर उतरले होते.याबाबत आवाहन करताना राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,आदरणीय खा.राहुलजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू लोकांना मदत करण्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निश्चित केले आहे.त्यानुसार प्रांताध्यक्ष मा.ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून आणि माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख,प्रदेश समन्वय समितीचे मराठवाडा विभागाचे बसवराज पाटील मुरूमकर,जितेंद्र देहाडे यांचे मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आजी माजी पदाधिकारी,विविध सेलचे प्रमुख,तालुका व शहराध्यक्ष आपणांस कळविण्यात येते की,मा.राहुलजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिट्या व फ्रंटल ऑर्गनायझेशन आणि सर्व सेल व विभाग यांनी मिळून सामुदायीक स्वयंपाकघरातून
(Community Kitchens) अन्नाची पाकिटे बनवून जिल्ह्यातील गरजू लोकांना देण्याची व्यवस्था करावी.तसेच कोवीड 19 साथ रोगाच्या संकटात निस्वार्थीपणे लढा देणारे आरोग्य सेवेतील कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस यंत्रणा व इतर कोरोना योद्धा यांचा यथोचित सन्मान करणारे कार्यक्रम आयोजित करावेत.अशा कार्यक्रमांमध्ये जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवरील पक्षाचे सर्व पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

शासन निर्देशांचे पालन करून सामाजिक उपक्रम राबवा

या संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की,वरील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करत असताना सर्वांनी एक गोष्ट गंभीरपणे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वाढदिवशी जल्लोष करणे टाळावे.या कार्यक्रमांना उत्साहाचे स्वरूप येणार नाही हे आवर्जून लक्षात घ्यावे.सर्व देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना राहुलजींच्या वाढदिवसाला उत्सवाचे स्वरूप देऊन परिस्थितीचे गांभीर्य घालवू नका व गालबोट लागेल असे काहीही करू नका.हे सर्व करत असताना शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व अटी,नियमांचे तसेच फिजीकल डिस्टंसिंगचे पालन करावे.या उपक्रमात बीड जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी खासदार,आमदार,स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी,प्रदेश पदाधिकारी सर्व फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष व पदाधिकारी यांनी सहभागी होवून मा.राहुलजी गांधी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करावा.

―राजकिशोर मोदी,(अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.