केज तालुकाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

केज तालुक्यातील माळेगाव येथे कोरोना विषाणूची लागण झालेले ४ रुग्ण , माळेगाव 'कंटेन्मेंट झोन' मध्ये

बीड दि.१७:आठवडा विशेष टीम― जिल्हाधिकारी कार्यालयाचे संदर्भीय आदेश क्र.१० अन्वये दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० वा पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) लागू करण्यात आले आहेत आणि केज तालुक्यातील माळेगाव येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले ०४ रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार केज तालूक्यातील माळेगाव हे गाव Containment zone म्हणून घोषित करण्यात येत असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज दिनांक १७/०६/२०२० रोजी दिले असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.