औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

१८ जूनला औरंगाबाद जिल्ह्यात ८० जण कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 1753 कोरोनामुक्त, 1193 रुग्णांवर उपचार सुरू

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    औरंगाबाद, दि.१८:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1193 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 80 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3116 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
    जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. घाटी हॉस्पीटल परिसर (1), नॅशनल कॉलनी (1),सिंधी कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), पडेगाव (1), लक्ष्मी कॉलनी (2), हर्सुल, जटवाडा (1), म्हसोबा नगर, मयूर पार्क (1), खोकडपुरा (3), जय भवानी नगर, गल्ली नं. चार (2), एन आठ सिडको (2), एन नऊ,सिडको (2), महू नगर (1), गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), एन बारा, हडको (1), कैसर कॉलनी (3), चिकलठाणा (1), नंदनवन कॉलनी (2),मिसारवाडी (1), नूतन कॉलनी (2), गांधी नगर (1), मुकुंदवाडी (1), सेंट्रल जेल क्वार्टर्स परिसर (1), नागेश्वरवाडी (1), श्रीराम नगर (1), रामेश्वर नगर (1), न्यू विशाल नगर (1), आझाद चौक (3), पुंडलिक नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), हरीकृष्ण नगर, बीड बायपास (1), श्रीविहान कॉलनी (1), शक्ती अपार्टमेंट (1), गणेश कॉलनी (2), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), जाधववाडी, नवीन मोंढा (1), साई नगर, सिडको (1), टीव्ही सेंटर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), बन्सीलाल नगर (1), औरंगपुरा (1), सुभाषचंद्र नगर, एन अकरा (1), जय भवानी नगर, गल्ली नं. एक (1), रामदेव नगर (1), बजाज नगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (5), सिडको महानगर दोन (1), एन सहा सिडको (1), सदाद कॉलनी (1), गजानन कॉलनी, गारखेडा परिसर (1), कोतवालपुरा, खडकेश्वर (1), पवन नगर, हडको (1), अझम कॉलनी (1), नारेगाव (1), मनपा परिसर (1), उदय कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 33 स्त्री व 47 पुरूष आहेत.

    आतापर्यंत 1753 जण कोरोनामुक्त
    मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

    घाटीत चार, खासगीत दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू
    शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 18 जून रोजी मध्यरात्री 12.30 वाजता सिडकोतील आंबेडकर नगरातील 33 वर्षीय स्त्री, 01.45 वाजता समता नगरातील 55 वर्षीय स्त्री, पहाटे 4.15 वाजता बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील 57 वर्षीय स्त्री, सकाळी 6.30 वाजता कैसर कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत 126 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 124 कोरोनाबाधित रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.
    तर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये 17 जून रोजी गणेश कॉलनीतील 81 वर्षीय स्त्री रुग्णाचा दुपारी 3.40 वाजता, तर रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथील 56 वर्षीय पुरूष रूग्णाचा 18 जून रोजी पहाटे 4.15 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
    त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 124, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 45, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 170 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.