कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजसातारा जिल्हा

सातारा: 17 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह पैकी एकाचा मृत्यू

सातारा दि.१८:आठवडा विशेष टीम― कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 17 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 59 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष,सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला
पाटण तालुक्यातील कराटे येथील 59 वर्षीय पुरुष,
कोरेगाव येथील 39 वर्षीय महिला
फलटण तालुक्यातील शेऱ्याचीवाडी ( हिंगणगाव ) येथील 10 वर्षीय मुलगा,
माण तालुक्यातील दहिवडी येथील 39 वर्षीय पुरुष, 21 व 17 वर्षीय तरुण
खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 4 वर्षाची बालीका व 32 वर्षीय महिला
सातारा तालुक्यातील आरे तर्फ परळी येथील 55 वर्षीय पुरुष

वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74 वर्षी महिला.
खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुष 14 जून रोजी मुंबईहून आला , वाकळवाडी गावात घरीच विलगीकरणात होता , ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पीएचसी निमसोड ने 17 जून ला कराड कृष्णा येथे पाठवले, आज सकाळी 11 वा उपचार चालू असताना मृत्यू झाला.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.