औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद जिल्ह्यात आज(दि.२०) १२२ कोरोना रुग्णांची भर

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट

जिल्ह्यात 1857 कोरोनामुक्त, 1316 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि.२०:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1316 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 122 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3360 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नवजीवन कॉलनी (1), गरम पाणी (1), पडेगाव (1), जाधववाडी (4), राजाबाजार (1), एन नऊ हडको (1), ठाकरे नगर (1), बजाज नगर (1), एन सहा (1), शिवाजी नगर (1), नागेश्वरवाडी (3), शिवशंकर कॉलनी (2), गजानन नगर (2), छत्रपती नगर (1), दर्गा रोड (1), एकता नगर, हर्सुल (1), हनुमान नगर (1), सुरेवाडी (3), टीव्ही सेंटर (1), एन आठ सिडको (1), श्रद्धा कॉलनी (4), एन सहा, सिंहगड कॉलनी (1), आयोध्या नगर (1), बायजीपुरा (3), कोतवालपुरा (1), नारळीबाग (2), अंबिका नगर, मुकुंदवाडी (4), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (1), समता नगर(1), सिंधी कॉलनी (2), बजाज नगर (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), जयसिंगपुरा (2), सिडको एन अकरा (1), नेहरू नगर, कटकट गेट (2), न्यू हनुमान नगर (1), विजय नगर, नक्षत्रवाडी (1), भाग्य नगर (4), शिवाजी नगर (1), पदमपुरा (1), उत्तम नगर (2), खोकडपुरा (2), टिळक नगर (1), पिसादेवी (1), बीड बायपास (2), सखी नगर (3), जिल्हा परिषद परिसर (1), सारा गौरव बजाज नगर (3), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (6), पंचमुखी महादेव मंदिराजवळ बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (1), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (3), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (1), दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (1), देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (2), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), मांडकी (1), पळशी (5), जय हिंद नगरी, पिसादेवी (1), कन्नड (1), मातोश्री नगर, औरंगाबाद (1), गोरख कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), पालखेड, वैजापूर (1), शिवाजी कॉलनी (1), पानचक्की रोड (1), बारूदगर नाला (1), सादात नगर, रेल्वे स्टेशन (1), कबीर नगर (1), एन सात सिडको (1), रशीदपुरा (1), सिद्धीविनायक अपार्टमेंट (1), सिडको एन चार (1), रेहमानिया कॉलनी (1), विश्वास नगर (1), हडको (1) या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये 55 स्त्री व 67 पुरुष आहेत.

आतापर्यंत 1857 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
*घाटीत सात, खासगी रुग्णालयांत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 19 जून रोजी सकाळी 10.15 वाजता लोटा कारंजा येथील 45 वर्षीय स्त्री रुग्णाचा, रात्री दहा वाजता जटवाडा, हर्सुल येथील साइदा कॉलनीतील 55 वर्षीय स्त्री, रात्री एक वाजता नाशिक जिल्ह्यातील येवला येथील 48 वर्षीय स्त्री, मध्यरात्री 1.15 वाजता शिवाजी नगर, गारखेडा येथील 55 वर्षीय स्त्री , तर 20 जून रोजी मध्यरात्री 1.15 वाजता राजा बाजार परिसरातील 65 वर्षीय स्त्री, सकाळी 9.45 वाजता रांजणगाव, ता.गंगापूर येथील 29 वर्षीय स्त्री आणि बेगमपुरा येथील 47 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी 2.10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत 140 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 137 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते.
तर शहरातील एका खासगी रुग्णालयात 19 जून रोजी सायं.5.15 मंजुरपुऱ्यातील 59 वर्षीय पुरूष रुग्णाचा, जुना बाजार येथील 52 वर्षीय पुरूष रुग्णाचा 20 जून रोजी सकाळी 7 वाजता, तर अन्य एका खासगी रुग्णालयात रोजा बाग येथील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी एक वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 137, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 49, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 187 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.