मुंबई दि.२०:आठवडा विशेष टीम― चीन ने लडाख येथील गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर पूर्व नियोजितपणे कट करून हल्ला केला. त्या हल्ल्याचा प्रतिकार भारतीय सैनिकांनी केला त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. त्या शूर वीर भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आज रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर धोकेबाज राष्ट्र चीनच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करीत निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चीन चे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रतिमेचे आणि चिनी ध्वजाचे दहन तसेच चीन मुर्दाबादच्या घोषणा फलक घेऊन आंदोलन करण्यात आले.
मुंबईत बांद्रा येथे ना रामदास आठवले यांच्या बंगल्याच्या बाहेर ना रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताईं आठवले यांनी चीन चा निषेध करणारे फलक हाती घेऊन आंदोलनात सहभाग घेतला. बांद्रा येथील जिल्हा अधिकारी कार्यलयाबाहेर रिपाइं चे सिद्धार्थ कासारे। विवेक पवार; अमित तांबे यांनी निदर्शने करीत चीन चा निषेध केला. मुलुंड येथे योगेश शिलवंत; ताडदेव येथे सोना कांबळे ; दहिसर येथे दिलीप व्हावळे ; गोरेगाव येथे रामेश पाईकराव यांनी चीन विरुद्ध निषेध आंदोलन केले.
तसेच राज्यात सोलापूर येथे रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात चीनच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. कल्याण मध्ये रिपाइं चे दयाळ बहादुरे ; अण्णा रोकडे; अरुण पाठारे ; मीनाताई साळवी आदींनी चीन विरुद्ध आंदोलन केले.
तसेच उद्या रविवारी दुपारी 2 वाजता मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांच्या नेतृत्वात घाटकोपर पश्चिम सर्वोदय सिग्नल येथे चीन च्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.