अकोला जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अकोला: 27 कोरोना पॉझिटीव्ह, पाच मयत, 10 डिस्चार्ज

अकोला दि.२०:आठवडा विशेष टीम―आज दिवसभरात(सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे 323 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 296 अहवाल निगेटीव्ह तर 27 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील 4 जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित 6 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज पाच जणांचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 1163 झाली आहे.आजअखेर 347 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसारआजपर्यंत एकूण 8344 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 8022, फेरतपासणीचे 134 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 188 नमुने होते. आजपर्यंत एकूण 8341 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 7178 आहे.तर पॉझिटीव्ह अहवाल 1163 आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज 27 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नऊ महिला व सोळा पुरुष आहे. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यु साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मूकूंद वाडी, हरिहर पेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन्ही पुरुष आहेत. त्यातील जवाहर नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
पाच मयत
दरम्यान आज(दि. 20) रोजी उपचार घेताना 5 रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी शंकर नगर, अकोट फैल येथील 63 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 16 जून रोजी दाखल झाले होते, गुलजारपूरा येथील 62 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 16 जून रोजी दाखल झाले होते, पातूर येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ती दि. 15 जून रोजी दाखल झाले होती, मोठी उमरी येथील 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 8 जून रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल झाले होते त्याना ओझान हॉस्पीटल येथे दि. 14 जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू ओझान हॉस्पीटल येथे आज झाला आहे, अकबर प्लॉट, अकोट फैल येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला असून ते दि. 5 जून रोजी दाखल झाले होते.
10 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सहा जणांना घरी सोडण्यात आले तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात पुरुष आणि तिन महिला आहेत. त्यात अशोक नगर, त्रिमुर्ती नगर, सिंधी कॅम्प, तारफैल, अकोटफैल, शात्री नगर, मोठी उमरी, बाळापूर नाका, लहान उमरी, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
347 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत 1163 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 64 जण (एक आत्महत्या व 63 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 752 आहे. तर सद्यस्थितीत 347 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.