सोयगाव,ता.२२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादेतून सोयगावला शासकीय कार्यालयात आलेले अधिकारी व कर्मचारी विना तपासणी करताच कर्तव्यावर हजर झाल्याने शहरात खळबळ उडाली होती.पंचायत समितीचा तो अधिकारी औरंगाबादेतून ये-जा करतांना सकारात्मक आढळल्याची घटना ताजी असतांनाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डझनभर अधिकारी व कर्मचारी औरंगाबादेतून सोयगावला कर्तव्यावर हजर झाले होते.
सोयगाव तालुक्यात अचानक अपघात होवून कोरोना संसर्गाचे केवळ तीन रुग्ण आढळले होते,परंतु पंचायत समितीच्या त्या अधिकार्याने औरंगाबादेतून येवून थेट सोयगाव तालुक्यात दहा ग्रामपंचायतींना भेटी दिल्यावर त्या अधिकार्याचा शुक्रवारी अहवाल सकारात्मक आढळला असतांना त्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा औरंगाबादवरून अधिकारी व कर्मचार्यांची मोठी फौज सोयगावला दाखल झालेली आहे.पंचायत समितीच्या त्या अधिकार्याची घटना ताजी असतांना देखील प्रशासनाकडून कोणत्याही खबरदारीच्या उपाय योजना न घेता पुन्हा सोमवारी ये-जा प्रकार सर्रास सुरु झालेला आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात बाधा वाढण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली असून औरंगाबादेतून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना औरंगाबादला थांबण्याच्या सूचना देण्यात याव्या अशी अपेक्षा नागरिकांची आहे.परंतु प्रशासनाला न जुमानता सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सोयगावात येत असल्याने धोका वाढला आहे,यावर प्रतिबंध घालण्याच्या मागणीसाठी अनेकांनी यापूर्वी निवेदने दिलेले असतांनाही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे-
औरंगाबादमधून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्याचा अहवाल सकारात्मक येवूनही सोमवारी बिनधास्त अधिकारी व कर्मचारी औरंगाबाद वरून सोयगावला आले होते एका अधिकाऱ्याच्या संपर्काने तालुका बाधित होण्याची घटन उघडकीस येवूनही अखेरीस प्रशासनाच्या त्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असा प्रकार सोमवारी उघड झालेला आहे.
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तक्रार-
औरंगाबादवरून नियमित ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई न करणाऱ्या जबाबदार अधिकार्याविरुद्ध आणि ये-जा करणाऱ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करा अशी थेट मागणीच प्रहार क्रांती अपंग आंदोलनचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.