क्राईमगोंदिया जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

पत्रकार नरेश बोपचेच्या मारेकऱ्याला अटक ; अनेक आरोपी पसार ,आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी

आमगाव:बिंबिसार शहारे― आमगाव तालुक्याच्या वळद व तिगाव येथील अवैध वाळू चोरीचा बिंग फोडणाऱ्या पत्रकारांचा वचपा काढण्यासाठी केलेल्या हल्ल्यात नरेश बोपचे हा गंभीर जखमी झाला होता,सदर प्रकरणातील एक आरोपीला अटक करण्यात आले,न्यायालयाने आरोपीला एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
आमगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वाळूचे(रेतीचे) अवैध उत्खनन सुरू आहे.शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून वाळूची उचल करुन वाळू चोरांनी धुमाकूळ घातला आहे.
या वाळू चोरी सबंधात पोलीस विभाग व तहसीलदार यांना माहिती दिली होती.अवैध रेती उत्खनना संबंधात मोहीम काही पत्रकारांनी राबविली आहे.यातच वळद येथील अवैध वाळू उपसामूळे वाळू चोरांवर दीड कोटींचा दंड प्रशासनाने घातला होता,परंतु वाळू चोरणांचा मनसुबा खाली पडला नाही तर अधिक प्रमाणात विविध ठिकाणी वाळूची अवैधपणे चोरी बडावली आहे.
अवैध वाळू चोरांची माहिती पत्रकार प्रशासनाला देतात,यामुळे त्यांचा वचपा काढण्यासाठी काही वेक्तींनी यात पुढाकार घेतल्याची माहीत आहे.
बुधवारला दिनांक १७ जूनला सकाळी गजानन रहांगडाले रा.कालिमाटी ता. गोरेगाव यांनी तिगाव परिसरातून वाळूचे ट्रॅक्टर घेऊन जातानी दिसल्यास पत्रकार नरेश बोपचे यांनी पोलीस व तहसीलदार प्रशासनाला माहिती दिली.
पूर्वीच वळद प्रकरणात व आता सुरू असलेल्या वाळू चोरीची माहिती प्रशासनाला नरेश बोपचेच देतो,याचा राग धरून त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपी गजानन रहांगडाले व इतरांनी बोपचेवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते.यात प्रारंभी नरेश बोपचेला आमगाव येथे प्रथम उपचार करून पुढे उपचारासाठी गोंदिया येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपी गजानन रहांगडाले याला अटक करून त्याच्याविरुद्ध भादवी ३२४,३९२,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर प्रकरणात आरोपी अनेक असल्याची माहिती मिळाली आहे, परंतु अद्यापही त्या आरोपींना अटक करण्यात आली नाही.
वाळू चोरांची दहशत निर्माण झाली असून याविरुद्ध प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशी मागणी अनेक संघटनांनी प्रशासनाला केली आहे व लेखी निवेदन पोलिस अधीक्षक,जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.