परळी वैद्यनाथ:आठवडा विशेष टीम― अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा ना नाना पटोले साहेब व मराठवाडा अध्यक्ष अँड माधव जाधव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग डॉ सुरेश चौधरी गणपत आप्पा जी एस सौंदळे शेख सिकंदर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुका किसान काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये परळी तालुका अध्यक्ष लहू दास तांदळे कार्याध्यक्ष सय्यद अल्ताफ ज्ञानोबा मुंडे चिटणीस रामभाऊ भदाडे उपाध्यक्ष उत्तम राव मुंडे उपाध्यक्ष रामलिंग नावंदे चिटणीस इत्यादींची नियुक्ती करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर परळी तालुक्यात किसान काँग्रेस काम करणार यामध्ये बी बियाणे खते औषधी भाववाढ बाजारपेठेतील चढ-उतार या सर्व प्रश्नांवर आवाज किसान काँग्रेस उठणार असे बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर केला सूत्रसंचालन सय्यद आलताफ आभार रामलिंग नावंदे यांनी मानले.