सोयगाव,ता.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर कोरोना विषाणूने ठसा उमटविला असून ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आहे.त्यामुळे रुग्ण वाढीसोबतच मृत्यूदर नियंत्रणावरही शासनाने उपाय योजना करण्यासाठी स्थानिकांना आरोग्य विभागात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने स्थानिक उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना तहसीलदार प्रवीण पांडे यांनी शुक्रवारी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या आहे.त्याचबरोबर ५५ वर्षावरील मधुमेह,उच्चरक्तदाब आणि इतर व्याधी असलेल्या नागरिकांची तातडीने आठवड्यातून दोन दिवस तपासणी करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टरांची तहसीलदार प्रवीण पांडे यांनी बैठक घेवून त्यांना तपासणीच्या सूचना दिल्या आहे.
सोयगाव तालुक्यात कोविड-१९ चे नियंत्रण घालण्यात तालुका प्रशासनाला चांगले यश आले असतांना यापुढेही या कामात गतिमानता आणण्यासाठी शुक्रवारी खासगी डॉक्टर यांची बैठक घेवून प्रशासनाच्या दिमतीला आता खासगी डॉक्टरांना मैदानात उतरविले असून कोरोना संसार्गासाठी मृत्युदारावर नियंत्रण घालण्यासाठी प्रशासन पुढे आले असून ५५ वर्षावरील वृद्धांच्या तपासणीत लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात येवून त्यांना स्थानिक ठिकाणीच आयसोलेशन प्रभागात भरती करण्याची नवीन योजना प्रशासनाने आखली आहे.यासाठी सोयगाव शहरासह ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांना प्रशासनाने दिमतीला घेतले असून स्थानिकांनाही यामध्ये नोकऱ्या देण्यात येवून मानधनावर संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले यासाठी कोविड-१९ साठी काम करू इच्छिणाऱ्यांनी तातडीने आरोग्य विभागाकडे माहितीसह कागदपत्रे जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण वाढीच्या नियंत्रणासोबत मृत्युदर नियंत्रण करण्यावर प्रशासनाने जोर दिलेला असून यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.त्यामुळे स्थानिकांच्या सहाय्याने रुग्ण वाढीच्या नियंत्रणासोबतच मृत्युदारावरही नियंत्रण येऊ शकते असा अंदाज प्रशासनाचा आहे.५५ वर्षावरील वृद्धांच्या तपासणीत लक्षणे अद्जालाल्यास तातडीने त्यांची माहिती प्रशासनाकडे मिळाल्यास त्यांना स्थानिक ठिकाणीच उपचार मिळतील यामुळे रुग्ण वाढीच्या सोबतच मृतुदरावर नियंत्रण मिळेल.यासाठी बैठकीत शहरातील ३७ खासगी डॉक्टर आणि तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार मकसूद शेख,तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास सोनवणे,वैद्यकीय अधिकारी सावळदबारा,बनोटी आदींची उपस्थिती होती.