अंबाजोगाई तालुकासामाजिक

आदर्श राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार जाहीर

शिवजागर प्रतिष्ठाणचा उपक्रम ; वर्ष 17 वे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.16 : येथील शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजन्मोत्सव व राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार सोहळा गेल्या 16 वर्षांपासुन साजरा करण्यात येतो.या उपक्रमाचे यंदाचे हे 17 वे वर्ष आहे.दरवर्षी राज्याच्या विविध भागातील आदर्श मातांचा गौरव केला जातो.यावर्षी दहा आदर्श मातांचा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव होणार आहे.या मातांना आदर्श राजमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण मंगळवार,दि.19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता नगरपरिषदेच्या आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होणार आहे.अशी माहिती शिवजागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमृतराव टेकाळे आणि सहसचिव दाजिसाहेब लोमटे यांनी दिली आहे.

शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासुन राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने कष्टातून,संघर्षातून कुटुंबाची व मुला-मुलींची जडण-घडण करणा-या आदर्श मातांचा शोध घेवून त्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कार वितरण उपक्रमाचे हे 17 वे वर्ष आहे.यावर्षीही शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजन्मोत्सव व राजमाता जिजाऊ माँ साहेब पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यावर्षी आदर्श माता जिजाऊ माँ साहेब पुरस्कारासाठी सौ.मंदाकिनीताई महादेव जाधव (पुणे),
सौ.शारदाताई बालासाहेब अवारे (पाटोदा),सौ.सिंधुताई वसंतराव केदार (एकुरगा),
सौ.अनिताताई अर्जुनराव थोरात (पांगरी),सौ.सुनंदाताई अण्णासाहेब लोमटे (अंबाजोगाई), सौ.लिलाताई प्रतापराव सुर्वे (इंदापुर जि.पुणे), सौ.पार्वतीताई हणुमंतराव हुडे (उदगीर),सौ.
प्रभावतीताई काशिनाथराव कांबळे (चिंचोलीमाळी),श्रीमती हरिबाई विठोबा सोनवणे (आनंदगाव सारणी),सौ.सिंधुताई दिगंबरराव पुजारी (पुस) या दहा मातांना शाल, श्रीफळ,साडी-चोळी व सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ.राजर्षी शाहु बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील (बीड) तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुरेखाताई काळे (शिवप्रतिष्ठान, लातूर),आ.प्रा.सौ.
संगिताताई विजयप्रकाश ठोंबरे, माजी आ.पृथ्विराज साठे,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, नगराध्यक्षा सौ. रचनाताई सुरेश मोदी, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा,बीड जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक बबनराव लोमटे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेशराव पोकळे (बीड) यांना कै.नागोराव काशिनाथराव लोमटे (नवाब) स्मृती पुरस्कार- 2019 ने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रारंभी मंगळवार,दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण होईल व त्यानंतर सकाळी 8 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली “चित्रकला रंगभरण स्पर्धा" आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह परिसरात होईल.रंगभरण स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी या गटात होईल.स्पर्धेसाठी संयोजकांकडून चित्र देण्यात येईल.ही स्पर्धा निःशुल्क आहे. विजेत्यांना प्रथम,द्वितीय व तृतीय रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येईल.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वनमाला रेड्डी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नवनाथ घुगे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहिल.तरी शिवजागर प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवजागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमृतराव टेकाळे,डॉ.सुधीर देशमुख (उपाध्यक्ष), राम चव्हाण (सचिव), दाजिसाहेब लोमटे (सहसचिव),परमेश्वर भिसे (कोषाध्यक्ष), सदस्य सर्वश्री कमलाकर जाधव, अ‍ॅड.माधव जाधव, श्रीरंगराव चौधरी, अण्णासाहेब जगताप, अनंत आरसुडे,रामराव सरवदे,अ‍ॅड.संतोष पवार,जे.डी.थोरात यांनी केले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.