कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युजसातारा जिल्हा

सातारा जिल्हा: आणखी १९ नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह ,कोरोनाबाधितांची आज दिवसभरातील एकूण संख्या ४७

सातारा दि.२७:आठवडा विशेष टीम― विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित 19 रुग्णांमध्ये 13 पुरुष व 6 महिलांचा समावेश असून यात मुंबई येथून प्रवास करुन आलेले 12 प्रवासी, 7 निकटसहवासित आहेत.
बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील जखीणवाडी येथील 47 वर्षीय महिला,23 वर्षीय युवती, 52 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक, लटकेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक आणि 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवती, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील 8 वर्षीय बालक, वय 30 व 50 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 30 वर्षीय महिला.,पाटण तालुक्यातील नवसरे येथील 42 वर्षीय पुरुष, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,खटाव तालुक्यातील खटाव येथील येथील 62 वर्षीय पुरुष.,माण तालुक्यातील म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.