अंबाजोगाई तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीहेल्थ

कोरोना संकटकाळात कौतुकास्पद कार्य करून अंबाजोगाई नगरपरिषदेने कोरोना दूर ठेवला―अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचेकडून अंबाजोगाई नगरपरिषदेचा गौरव

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना सारख्या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाविकास आघाडी विविध उपाययोजना आखत कोरोनामुक्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद देवून कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून उपाययोजना राबविण्यात अंबाजोगाई नगरपरिषदेला यश मिळाले आहे.जिल्ह्यात अंबाजोगाई शहराला कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या अंबाजोगाई नगरपरिषदेवर वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांनी कौतुकाच्या शब्दांत गौरव केला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांनी शुक्रवार,दिनांक 26 जून रोजी अंबाजोगाई नगरपरिषदेस भेट देवून कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून केलेल्या उपाययोजना यांची माहिती घेवून बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगराध्यक्षा सौ रचनाताई सुरेश मोदी यांनी व नगरपालिका प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे.बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहराला कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या अंबाजोगाई नगरपरिषदेचा स्तुत्य शब्दांत गौरव केला.कोरोनासारख्या महामारीवर पालिकेची प्रशासकीय यंत्रणेने काय व कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी यांनी माहिती दिली.तर सुरूवातीला रूग्णालय प्रशासन व नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेवून उपाययोजनांचा आढावा घेतला.या बैठकीत रूग्णालयातील समस्या रूग्णालय प्रशासनाने देशमुख यांच्यासमोर मांडल्या त्या समस्या प्राधान्याने आपण सोडविणार असल्याचे सांगितले.त्यानंतर लोकनेते स्व.विलासराव देशमुख सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख,आमदार संजय दौंड,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,माजी आ.पृथ्वीराज साठे,जिल्हाधिकारी राहुल रेखावार,नगराध्यक्ष सौ.रचनाताई मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत सोळंके,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार,उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,तहसीलदार संतोष रूईकर,स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,उपनगराध्यक्ष बबन लोमटे,मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप,नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अमोल लोमटे,नगरसेवक धम्मा सरवदे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक असिफोद्दीन खतीब यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अंबाजोगाई नगरपरिषद परिसरात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,राणा चव्हाण,कचरूलाल सारडा, डॉ.राजेश इंगोले,सज्जन गाठाळ,गणेश मसने,सुनिल वाघाळकर,दिनेश घोडके,अशोक देवकर,सय्यद अमजद,अजय रापतवार,अकबर पठाण,रणजित पवार,विजय कोंबडे,सचिन जाधव,भारत जोगदंड, अमोल मिसाळ,अजीम जरगर,रणजित हारे,माऊली वैद्य,मतीन जरगर,जावेद गवळी यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना संकटकाळात नगरपरिषदेमुळे अंबाजोगाई कोरोनामुक्त

कोरोना सारख्या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाविकास आघाडी विविध उपाययोजना आखत कोरोनामुक्त करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद देवून कोरोना संकटकाळात विविध माध्यमातून तसेच राजकिशोर मोदी यांचे मार्गदर्शनाखाली उपाययोजना राबविण्यात अंबाजोगाई नगरपरिषदेला यश मिळाले आहे.जिल्ह्यात अंबाजोगाई शहराला कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या अंबाजोगाई नगरपरिषदेच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.शासनाच्या उपाययोजना,जिल्हा व तालुका प्रशासनाचे प्रयत्न आणि सुचनांचे नागरिकांनी केलेले पालन यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे.नियमीत स्वच्छता,पाणीपुरवठा,आरोग्य व कोरोना विषयक जनजागृती,प्रबोधन,शासन निर्देशानुसार केलेले कार्य
स्तुत्यच आहे.

―ना.अमित देशमुख (वैद्यकीय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य.)

अंबाजोगाईकरांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे कोरोना संकट दूर

अंबाजोगाई हे मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते.सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणा-या या शहरात कोरोना संकटकाळात सर्व
आरोग्य,पोलिस,महसूल विभाग ही शासकीय कार्यालये,अंबाजोगाईकर जनता,स्वयंसेवी व सामाजिक संस्था,पञकार बांधव,रोटरी क्लब व नगरपरिषदेचे सर्वपक्षीय नगरसेवक,नगरसेविका,अधिकारी,प्रशासन,स्वच्छता व पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांचे एकञित सामुहिक प्रयत्नांमुळे अंबाजोगाईवरचे कोरोना संकट सध्या तरी दूर ठेवण्यात यश आले आहे.पुढील काळात ही अंबाजोगाईतील सर्वच घटकांनी नगरपरिषदेस असेच सहकार्य करावे.

―राजकिशोर मोदी (गटनेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,न.प.अंबाजोगाई .)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button