अकोला जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अकोला: ३४५ अहवाल प्राप्त, ९० कोरोना पॉझिटीव्ह, ३ मयत, २८ डिस्चार्ज

अकोला,दि.२८:आठवडा विशेष टीम― आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ३४५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २५५ अहवाल निगेटीव्ह तर ९० अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १५१० झाली आहे. आज उपचार घेतांना तीन जणांना मृत्यू झाला. तर दिवसभरात २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आजअखेर ३५८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १०३८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १००२३, फेरतपासणीचे १४४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २१६ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०३३३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८८२३ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १५१० आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आज ९० पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ९० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. यापैकी पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, टेकडीपुरा ता. अकोट (पोपटखेड ता.अकोट ग्रामिण रुग्णालयातून संदर्भित) सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शी टाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सात जण तारफैल येथील तर चार जण लहा उमरी येथील व खदान येथील एक जण रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

तीन मयत

दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.२६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि.१४ रोजी दाखल झाला होता त्याचा काल(दि.२७) रात्री मृत्यू झाला. दरम्यान आज दुपारनंतर एका जणाचा मृत्यू झाला असून हा व्यक्ती बार्शी टाकळी येथील ५३ वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण दि.१६ रोजी दाखल झाला होता त्याचा आज दुपारनंतर मृत्यू झाला.

२८ जणांना डिस्चार्ज

आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच तर कोविड केअर सेंटर मधून २३ अशा २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ज्या रुग्णांना आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना घरी सोडण्यात आले. ते रुग्ण सिंधी कॅम्प, खैर मोहम्मद प्लॉट, महाकाली नगर, अकोट फैल व शंकरनगर येथील रहिवासी आहेत. तर कोविड केअर सेंटर मधून ज्या २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सिंधी कॅंप मधील सहा जण, खदान, अशोक नगर व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन जण व देशमुख फैल, शिवनी, शिवाजीनगर, लहुजी नगर, लाडिस फैल, हरिहर पेठ, शंकर नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

३५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण १५१० पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७७ जण (एक आत्महत्या व ७६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०७५ आहे. तर सद्यस्थितीत ३५८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button