मानवी हक्क अभियान बीड चे जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली मागणी
बीड:आठवडा विशेष टीम―
औरंगाबाद येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण करत प्रशासनाच्या चुका चव्हाट्यावर मांडल्यानंतर आपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने दिव्य मराठीच्य विरोधात गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद येथील प्रशासकीय यंत्रणेचा मानवी हक्क अभियान च्या वतीने जाहीर निषेध केला असून दैनिक दिव्य मराठी वरील गुन्हा त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी मानवी हक्क अभियान चे बीड जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
औरंगाबाद महानगरपालिका भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या पार्श्वभुमीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा बाबत दैनिक दिव्य मराठीने सत्य परिस्थिती मांडल्यानंतर प्रशासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने व आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दैनिकाचे संपादक, प्रकाशक व वार्ताहरावरच गुन्हे दाखल केले आहेत. प्रशासनाच्या या मुजोरपणाचा मानवी हक्क अभियान च्या वतीने जाहीर निषेध करीत मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी लक्ष घालून दिव्य मराठी दैनिका विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे प्रशासनाने तात्काळ मागे घेण्यात यावेत व या कार्यपद्धतीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही सुरेश पाटोळे यांनी केली आहे.