उस्मानाबाद:आठवडा विशेष टीम― मंगळवार दि.३० जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून ११२ swab कोविड-१९ RT-PCR तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते. सर्व अहवाल प्राप्त झाले असून आठ पॉझिटिव्ह १० अनिर्णित व ९४ निगेटिव्ह असे आले आहेत. व एक पेशंट उमरगा येथील, लातूर येथे पॉजिटीव्ह आला आहे. असे आज एकूण ९ पॉझिटीव्ह कोरोना बाधितांची भर पडली आहे.
आजच्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची माहिती―
सहा रुग्ण उमरगा तालुका ,दोन रुग्ण परांडा तालुका ,एक रुग्ण उस्मानाबाद तालुका.
- उमरगा तालुका –पाच रुग्ण उमरगा शहरातील असून एक पेशंट गुंजोटी येथील आहे.
- परांडा तालुका –एक रुग्ण नालगाव व एक रुग्ण आसू येथील असून पूर्वीच्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे.
- उस्मानाबाद तालुका -एक रुग्ण नागोबाचीवाडी ता.उस्मानाबाद येथील आहे.