कोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयबीड जिल्हाबीड शहरब्रेकिंग न्युज

बीड शहरामध्ये आज दि.१ जुलै ला आढळले ३ जण कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड दि.०१:आठवडा विशेष टीम―
आज ५४ जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक स्वॅब बीड शहरातील होते आज पाठवण्यात आलेल्या तपासणीत बीड शहरातील ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. कारंजा व अजीज पुरा भागातील हे पोझिटिव्ह रुग्ण आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १२८ असलीतरी १०९ रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत. आजच बीड तालुक्यातील ४ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता फक्त ७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. १२८ मध्ये ८ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील असुन बीड जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षात घेता बीड जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?



    • Inconclusive अहवाल- 01
    • Rejected अहवाल- 02
    • 1 – 29 वर्षे महिला – रा.अजीजपुरा, बीड
    • 1 – 48 वर्षे पुरूष – रा.जुना बाजार,बीड
    • 1 – 66 वर्षे महिला – रा.कारंजा रोड, बीड

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.