औरंगाबाद Aurangabad:आठवडा विशेष टीम― प्रसार माध्यमे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून या स्तंभाच्या दैनिक दिव्य मराठीवर Daily Divya Marathi Newspaper औरंगाबाद प्रशासनाने सूडबुद्धीने गुन्हा दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.याला आम्ही मुळीच थारा देणार नाही.आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत राहू.दैनिक दिव्य मराठीवर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी एडिटर अँड प्रेस रिपोर्टर Editor and Press Reporter या संघटनेच्या वतीने आज विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.या वेळी अध्यक्ष रतन कुमार साळवे,जगन्नाथ सुपेकर,संजय सोनखेडे,गणेश पवार,बबन सोनवणे,प्रशांत पाटील,देवीदास कोळेकर,भास्कर,निकाळजे,भगवान हिवाळे,आकाश सपकाळ,रमेश वानखेडे,अँड,अशोक हिवराळे,आदींची उपस्थिती होती.आठ दिवसात गुन्हा मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.