औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद: आज(दि.०१ जुलै) दिवसभरात जिल्ह्यात २१७ कोरोनाबाधित रुग्णांची भर

जिल्ह्यात 2857 कोरोनामुक्त, 2654 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद दि.०१:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 116 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 79, ग्रामीण भागातील 37 जणांचा समावेश आहे. आज एकूण 217 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 136, ग्रामीण भागातील 81 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 129 पुरूष, 88 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 5782 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 271 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2654 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सायंकाळनंतर आढळलेल्या 17 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या आहे.) आहे. यामध्ये नऊ पुरूष आणि आठ महिला रुग्णांचा समावेश आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण (15)

लोटा कारंजा परिसर (1) जयसिंगपुरा (1), हुसेन नगर, बीड बायपास (1), कोकणवाडी (1), भीमनगर, भावसिंगपुरा (1), रमा नगर, क्रांती चौक (1), हनुमान नगर, गारखेडा (1), रेहमानिया मस्जिद परिसराजवळ (1) बजाज नगर (1), एन दोन, महाजन कॉलनी, सिडको (2), क्रांती चौक, उस्मानपुरा (1), सूतगिरणी रोड (1), साई नगर, एन सहा सिडको (1) अन्य (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (2)

चितेगाव, पैठण रोड (1), अजिंठा, सिल्लोड (1) या भागातील रुग्ण आहेत.

घाटीत सहा, खासगीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 30 जून रोजी गंगापुरातील अरब गल्ली येथील 25 वर्षीय स्त्री, जालन्यातील मूर्ती गेट येथील 70 वर्षीय स्त्री, औरंगाबाद शहरातील एन आठ, सिडकोतील 70 वर्षीय स्त्री, अरिफ कॉलनीतील 50 वर्षीय स्त्री, लोटाकारंजा येथील 57 वर्षीय पुरूष, अहिंसा नगरातील 67 वर्षीय पुरूष आणि रशिदपुरा येथील 65 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 211 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 206 कोरोनाबाधित रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.
शहरातील एका खासगी रुग्णालयात औरंगाबाद शहरातील आझाद चौकातील 65 वर्षीय स्त्री, अन्य एका खासगी रुग्णालयात मेन रोड, रेहमानिया मस्ज‍िद परिसरातील 68 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 206, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये 64, मिनी घाटीमध्ये 01 अशा एकूण 271 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button