कोरोना संकटकाळातील कार्याची दखल ; पञकार सतिश मोरे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील पञकार सतिश मोरे यांना विश्व मानवाधिकार परिषदेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे.कोरोना संकटकाळातील कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार मान्यवरांचे उपस्थितीत लवकरच प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती विश्व मानवाधिकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष भाई सय्यद गफार यांनी दिली आहे.पञकार सतिश मोरे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत, आंबेजोगाईचे तहसिलदार संतोष रूईकर,पञकार सतिश मोरे,डॉ.प्रल्हाद गुरव,डॉ.विजय लाड यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा अंबाजोगाईत आयोजित करण्यात येणार आहे.अशी माहिती विश्व मानवाधिकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष भाई सय्यद गफार यांनी दिली आहे.
पञकार सतिश मोरे हे मागील 20 वर्षांपासून पञकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.अंबाजोगाई,अहमदपूर,गंगाखेड आणि उदगीर या शहरांत मोरे यांनी दै.पुढारी,दैनिक युवा सोबती या प्रिंट मिडियाच्या व “अंबाजोगाई दर्शन” या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून सातत्याने विधायक व सामाजिक बांधिलकी मानून पञकारीता केली आहे.अंबाजोगाईत कला महोत्सवातून सलग 6 वर्षे नव्या पिढीला मोरे यांनी सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.कोरोना संकटकाळात पञकारीतेच्या माध्यमातून प्रशसनाला सहकार्य व गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल त्यांना विश्व मानवाधिकार परिषदेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल पञकार सतिश मोरे यांनी विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एम.आर.अन्सारी, सल्लागार हाजी आयएएस झामा,सचिव प्रसुन गोस्वामी,प्रदेशाध्यक्ष हाजी सय्यद लायक,राज्य उपाध्यक्ष भाई सय्यद गफार यांचे आभार मानले आहेत.