बीड दि.०४:आठवडा विशेष टीम―आज जिल्ह्यातुन २५१ स्वॅब कोविड-१९ RT-PCR चाचणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी ९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर २४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह स्वरूपाचे आले आहेत.
आजच्या अहवालात बागझरी तालुका अंबाजोगाई येथील ६५ वर्षीय महिला ,राळेसांगवी तालुका शिरूर येथील ४५ वर्षीय पुरुष ,बीड शहरातील २ महिला व अन्य परळीच्या ५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
परळी शहरातील टॉवर परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेतील सहा जणांना काल अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्या स्वॅबचे नमुने आरोग्य प्रशासनाने घेऊन अंबाजोगाई येथील कोविड-१९ सेंटरला पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल आता नुकताच प्राप्त झाला असून ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एसबीआय बँकेची शाखा तालुक्यातील एक मोठी व्यवहार असणारी बँक आहे. यामुळे कर्मचाऱ्या पासून अनेक लोकांचा संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे ह्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून अजून किती लोकांना संसर्ग झाला असेल हे आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.
आज दि.०४ जुलै २०२० रोजीच्या अहवालातील सविस्तर माहिती―
- 5 -परळी – 28 वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55 वर्षीय पुरुष
- 1 -राळेसांगवी ता शिरूर- 45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)
- 1-अजीज पुरा ,बीड- 40 वर्षीय महिला
- 1-डीपी रोड,बीड- 45 वर्षीय महिला
- 1- बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)