प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करावी – रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई:आठवडा विशेष टीम― निसर्ग चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणवासीयांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी असून त्या मदतीत वाढ करावी. मागील महिन्यात दि.3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला त्यात कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले.त्यां पैकी बहुतांश ठिकाणी अद्याप मदत पोहोचली नसल्याने राज्य सरकार वर कोकणवासीयांनी बाळगलेल्या अपेक्षांचाभंग झाला आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने घरांचे नुकसान झलेल्यांना केवळ दीड लाख रुपये मदत जाहीर केली असून ती रक्कम अल्प असून त्यात वाढ करून 3 लाख रुपये घर बांधणीसाठी द्यावेत. तसेच या वादळात रायगड जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासीयांना केवळ 4 लाख रुपये सांत्वनपर मदत म्हणून देण्यात आले असून त्यात वाढ करून 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी. घरांची अल्प पडझड झलेल्यांना केवळ 15हजार मदत जाहीर केली असून त्यात वाढ करून 40 हजार मदत देण्यात यावी.भातशेती सारख्या पिकांना हेक्टरी 50 हजार अल्प मदत जाहीर करण्यात आली असून त्यात वाढ करून 1 लाख रुपये नुकसान भरपाईसाठी मदत देण्यात यावी. तसेच आंबा; सुपारी; नारळ या बागांना वृक्षनिहाय नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच बागांची नुकसान भरपाई देताना केवळ 1 वर्षाचा विचार न करता वृक्षनीहाय किमान 3 वर्ष ते 10 वर्षांचा विचार करून बागांची नुकसान भरपाई राज्य शासनाने द्यावी.निसर्गचक्रीवादळाने कोकणाला तडाखा देऊन 1 महिना झाला तरी आद्याप वादळग्रस्तांना पुरेशी मदत न मिळणे म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोकणवासीय वादळग्रस्तांची राज्य शासनाने उपेक्षा केल्याचे द्योतक आहे असा आरोप ना रामदास आठवले यांनी राज्य सरकार वर केला आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.