अंबाजोगाई दि ५:राम कुलकर्णी― कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या खासदार, डॉ .सौ . प्रितमताई गोपीनाथ मुंडे या सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी जागता पहारा देत असून अहोरात्र जिल्हाधिकारी रेखावार यांच्या संपर्कात आहेत .संकटात माझ्या जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोरगरीब कष्टकरी ,मजूर, शेतकरी , तथा आम माणसा पैकी कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये. त्याच्या पोटाला चार घास मिळाले पाहिजे .हे लक्षात घेऊन त्यांनी केंद्र सरकार मार्फत मिळत असलेल्या. मोफत धान्य वितरण प्रणाली व्यवस्थेवर, बारकाईने लक्ष ठेवत. कार्यकर्त्यांचा जणूकाही टास्कफोर्स निर्माण केला आहे .ज्या लोकांना रेशन मिळत नाही? इथपासून कार्ड उपलब्ध, करेपर्यंत .आणि सर्वांना वाटप होईपर्यंत. लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनाही दिल्या आहेत. त्यामुळे संकटाच्या पार्श्वभूमीवर त्या जरी इथे नसल्या, तरी रात्रंदिवस त्यांचा जागता पहारा सुरूच आहे.
हे संकट कधी जाणार? माहीत नाही. याउलट प्रादुर्भाव अधिक वाढत असून ,बीड नंतर परळी शहरात त्याने पाय पसरले आहेत .कदाचित येणारे दोन महिने पण असेच घालावे लागतील .काय ?अशा प्रकारच्या हालचाली सर्व स्तरावर दिसत आहेत. मात्र संकटात लोकप्रतिनिधी म्हणून कस सावध राहिलपाहिजे. आणि लोकांना मदत कशी केली पाहिजे? याचं चांगलं उदाहरण म्हणून बीडच्या खासदार सध्या समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरिबांना येणाऱ्या दिवाळीपर्यंत मोफत धान्य देण्याची परवा घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील तिल गोरगरिबांना व्यवस्थित धान्य मिळाले पाहिजे? लक्षात घेऊन काल खासदारांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत संपर्क करून सविस्तर माहिती घेतली. एवढेच नव्हे तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावल . व्हाट्सअप ,फेसबुक, वर संवाद करून .एवढेच नव्हे तर सुचनेच्या संवाद कॅसेट करून स्वतः खासदारांनी प्रत्येकाला धान्य वितरणाबाबत सूचना दिल्या असल्याने बीड जिल्ह्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते, आता शहरी आणि ग्रामीण भागात कामाला लागले. गेल्या तीन-चार महिन्यात खासदारांनी, जिल्ह्यात राशन वितरण प्रणाली वर विशेष लक्ष दिले आहे. वर्तमान काळात घरात बसल्या, माझ्या जिल्ह्यातील एकही गरजू, आणि गरीब माणूस उपाशी राहता कामा नये. त्याच्या पोटाला चार घास मिळाले पाहिजे, यासाठी जागता पहारा देत सामाजिक जाणीव ठेवून, आपली यंत्रणा कामाला लावली आहे? नवीन रेशन कार्ड काढणे असतील, किंवा त्यांचे कागदपत्र पूर्तता असेल ,या सर्व कामांमध्ये सामान्य माणसाला मदत कार्यकर्त्यांनी करावी , लोकांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.? अशा प्रकारच्या ही सूचना त्यांनी दिल्या आहेत. खरं म्हणजे लोकप्रतिनिधीच्या अंगी संवेदनशीलता असेल ,तर सर्वसामान्य माणसाचं कल्याण त्या नेतृत्वात कसं दडलेल असतं. याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार होय .आपल्या जिल्ह्यात संकटाच्या पार्श्वभूमीवर येणे शक्य नसले? तरी वर्तमान काळात मोबाईल साधनाचा प्रभावी वापर करून त्यांनी. सर्वांना कामाला लावले आहे. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष कार्यकर्त्याला त्या फोन करतात ,एखाद्याचं काम आवडलं तर अभिनंदन करून त्याला प्रोत्साहित करतात?. प्रशासनाच्या संपर्कात राहून सर्व प्रश्नाची माहिती घेतात , ? सोशल माध्यमाचा प्रभावी वापर त्या स्वःताच करतात . अगदी ग्रामीण भागातील साध्या कार्यकर्त्याची सुद्धा त्या दखल घेतात, आणि त्याचं कौतुक करतात. म्हणून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक जाणीव ठेवून ,पंकजाताई प्रीतम ताई या भगिनीच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व कार्यकर्ते या कोरोना संकटात जोमाने काम करत असून लोकांच्या मदतीला धावून जात आहेत , स्वः गोपीनाथ मुंडेना अभिप्रेत काम आणि भुमीका आहे नक्की.