खेळ

कुर्‍हाड येथे शिवजयंती उत्साहात संपन्न महिला क्रिडापटूंचा पुरस्काराने सन्मान महिला लेझीम पथक ठरले लक्षवेधी

तालुका प्रतिनिधी |ज्ञानेश्वर धोंडू पाटील

पाचोरा :तालुक्यातील कुर्‍हाड खुर्द येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांचा पेहराव केलेल्या प्रतिकात्मक अश्वारूढ शिवरायांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सोमनाथ चौधरी यांनी शिवरायांचे पात्र सादर केले .यावेळी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने नऊवारी साडी भगवा फेटा परिधान करून मिरवणुकीची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून
जिजाऊ वंदना सादर करण्यात आली प्रसंगी पुलवामा घटनेतील शाहिदानां भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मिरवणुकीच्या समारोपानंतर येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांनी शिवरायांच्या जन्मावर आधारित गीते तसेच पोवाडा आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथि सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील तसेच लोहारा गटाचे जि प सदस्य दीपक सिंग राजपूत शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख अरुण पाटील यांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोग बक्षिसे देण्यात आली राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त खेळाडू नंदिनी पाटील तसेच कांस्य पदक मिळविल्याबद्दल माया झाडे यांचा सन्मान करण्यात आला . मिरवणुकीत शिवरायांच्या पालखीसह जिजाऊ मासाहेब संत तुकाराम महाराज राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिवीर भगतसिंग स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली, जयंतीत मोठ्या प्रमाणात तरुण मित्र , विद्यार्थी , ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.त्यासोबतच संतोष चौधरी , जगदीश तेली , विनोद भाऊ पाटील , सुधाकर महाजन , डॉ.महाजन , कोटकर ,एस.आर. पाटील ,एस.जे.माळी, देसले आदी शिक्षक वृंद आणि पत्रकार सुनील लोहार या सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पप्पू गायकवाड,सुधिर पाटील ,पंकज रेणुके,सतिष देशमुख,विलास चव्हाण,संदिप शिंदे, सचिन माळी, आकाश चित्ते, गणेश शिंदे, राहुल आमले, राहुल बोरसे, वाल्मिक चौधरी, चेतन पाटिल, शुभम शिंदे,सिध्दांत पोसणे, दिपक भडांगे,सोपान सोनवणे, प्रविण जगदाळे, गोविंदा पाटील,संग्राम चव्हाण, आबा पाटील, पंकज वाघ,योगेश चव्हाण,दत्तात्रय बेलदार,सचिन पाटिल,सतिष पाटील,मोहन दोडके,अमोल बोरसे,उल्हास म्हस्के,प्रविण पाटील, अतुल जगदाळे,राजु माळी, योगेश महाजन,किरण माळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सचिन माळी सरांनी केले.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.