कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाप्रशासकीयबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

बीड: पाटोदा तालुक्यातील बेनसुर हे गाव कंटेन्मेंट झोन मध्ये ,अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद

बीड जिल्हा कोरोना अपडेट

पाटोदा दि.०६:आठवडा विशेष टीम मौजे बेनसुर ता.पाटोदा येथील एक रुग्ण ज्युपीटर हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी कोविड-१९ पॉझिटिव्ह आला असून तो बीड जिल्हयाच्या कोविड-१९ पार्टलवर प्राप्त झाला आहे. त्यामुळे बेनसुर ता. पाटोदा येथे कंटेन्मेंट झोन जाहीर करुन प्रतिबंधात्मक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादृर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार पाटोदा तालुक्यातील बेनसुर हे गांव Containment zone म्हणून घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आले आहे व संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश आज दिनांक ०६/०७/२०२० रोजी बीड जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.