अंबाजोगाई (बीड) :- अंबाजोगाई नगर पालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (वय ३४, रा. परळी वेस, अंबाजोगाई) यांचा आज दि.18 जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. परळी वेस येथे झालेल्या भांडणात तिक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने जोगदंड यांच्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस- अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांचे सह अधिकारी रुग्णालयात दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
संपादक
नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या हस्ते उदघाटन
ना.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती परळी वै.दि 18: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पद्दविभुषन खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिध्द क्रिकेटपट्टु सुरेश रैना यांच्या हस्ते तर ना.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 … Read more
धिरजभैय्या देशमुख यांची निलंगा शिष्टमंडळाची बाभळगाव येथे सदिच्छा भेट
लातूर प्रतिनिधी: जि. प. गटनेते तथा लातुर कांग्रेस चे युवा नेतृत्व धिरजभैय्या देशमुख व विलासराव युवा मंच चे अध्यक्ष विजय देशमुख यांची निलंगा तालुक्यातील शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.
यावेळी संदिप मोरे, गफ्फारभाई लालटेकडे, शरद पवार विचार मंच चे निलंगा तालुका अध्यक्ष सुधीरदादा मसलगे, कार्याध्यक्ष अंगद जाधव,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यक सेल गणीमामु खडके,राष्ट्रवादी युवक तथा शरद पवार विचार मंच चे शहराध्यक्ष धम्मानंद काळे,राष्ट्रवादी किसान सेल चे सुरेश रोळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सोशल मीडिया सेल किरणकुमार सोळुंके, ओबीसी सेल चे मंचक पांचाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी चे सचिन चव्हाण, प्रसिध्दी प्रमुख राजेश माने, मोहन माने, पंढरी पाटिल, सचिन कडतने, बळिराम पाटिल, महम्मदभाई शेख, विजयकुमार चव्हाण, लक्ष्मण क्षीरसागर ,राम पाटिल, मेहबूब पठाण ईत्यादी सर्वानी भेट घेतली.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत लिंबोटा येथे प्रशांतभैय्या कराड यांच्या प्रयत्नातून लाभार्थ्यांना गॅस वाटप
परळी प्रतिनिधी: दि.18 तालुक्यातील लिंबोटा येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत 16 लाभार्थ्यांना युवक नेते प्रशांत कराड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.प्रितम मुंडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलंचद कराड यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थ्यांना परळी तालुक्यात गॅसचे वाटप करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने लिंबोटा येथे 16 लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले.
यावेळी युवक नेते प्रशांत कराड, देविदास कराड, माजी सरपंच महादेव कराड, मंचक मुंडे, बालासाहेब कराड, अच्युत कराड, रवी कराड, छत्रगुण मुंडे, भरत तिडके, विजय कराड, वैजनाथ मुंडे, रामप्रभु कराड, गोविंद मुंडे, गोवर्धन मुंडे, सौदागर दोडके, रघुनाथ मुंडे, दिपक मुंडे, संदिप मुंडे, श्रीनिवास मुंडे, राहुल खाडे, परळीच्या वैद्यनाथ गॅस डिस्टयुब्युटर्सचे चेतन श्रीपाद बुरकुले, ज्ञानेश्वर चिकणे, रामकिशन सुरवसे, धर्मराज चौधरी उपस्थित होते.भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सतत काहीना काही नवीन कार्य व शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचून त्या योजनाचा लाभ देणेचे काम भाजपा युवक नेते प्रशांत कराड नेहमी करत असतात.
लिंबोटा येथील रत्नमाला गोवर्धन मुंडे, संध्या मंचक मुंडे, आशाबाई रामप्रभु कराड, उर्मिला दत्तात्रय मुंडे, राधा अच्युत कराड, सुनिता छत्रगुन मुंडे, शिवाबाई लिंबाजी कराड, अंकिता दादाराव कराड यांच्यासह इतर लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर व शिगडी वाटप करण्यात आले.
विधानसभेच्या निवडणूकीत आष्टी मतदारसंघाचा आमदार कोण?
➡ नविन चहेर्यामुळे जुन्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आष्टी मतदारसंघातील जनता नव्याना संधी देणार का ? पुन्हा जुन्यानाच स्वीकारणार
➡ विजय गोल्हार,जयदत्त धस,सतीश शिंदे,अमोल तरटे,आष्टी मतदारसंघात चर्चेत असलेले नवीन चेहरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का ?
पाटोदा (गणेश शेवाळे) 2014 च्या निवडणूकीत देशभरात मोदी लाटेणे भल्याभल्यांना पाणी पाजले पण 2019 च्या विधान सभेच्या निवडणूकीत आष्टी मतदारसंघाच्या राजकारणात ही परिस्थिती दिसणार weनाही.याचे अनेक कारणे असु शकतात याचा प्रत्यही तीन राज्याच्या निवडणूकीत दिसुन आलेला आहे यामुळे आगामी निवडणूकात जुन्या उमेदवाराना सोप्या नाहीत त्यातच जातीय समिकरण व नविन चेहऱ्याची आष्टी मतदारसंघात क्रेज वाढल्याने येणाऱ्या निवडणूकीत आष्टी मतदारसंघाचा आमदार कोण होणार याची चर्चा मतदारसंघातील गावागावात युवकांन मध्ये होत असुन मतदारसंघातील युवकांन मध्ये क्रेज असलेले विजय गोल्हार,जयदत्त धस,सतिष शिंदे,अमोल तरटे हे नविन चेहरे निवडणूक लढल्यास निवडणूकाचा निकाल काय लागेल यांची कोणत्याही ज्योतिषाला विचारण्याची आवश्यकता नाही