एअरएशिया आंतरराष्ट्रीय विमानाच्या तिकीटाचे पैसे वापस हवेत ? मग हे करा – Airasia Flight Cancelled ? Want REFUND ?

आठवडा विशेष टीम―

एअरएशिया कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विमानाचे तिकीट तुम्ही बुक केले आहे का ? असल्यास विमानसेवा रद्द (Flight Cancelled) झाली असल्यास तुम्हाला रिफंड भेटत नसल्यास तुम्ही [email protected][email protected] या दोन ईमेल मार्फत तुम्ही तुमचा परतावा (Refund) मागवू शकता त्यासाठी तुम्हाला त्यांनी दिलेल्या क्रेडिट रिफंड व फ्लाईट मूव्ह असे पर्याय दिले जातील ते तुम्हाला मान्य नसल्यास ते मान्य नाहीत असे सांगून फक्त रिफंड हवे आहे असा ईमेल करा. तुम्हाला रिफंड मिळण्यास मदत होऊल.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

फ्रान्समध्ये हवेतच दोन विमानांची भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

आठवडा विशेष टीम―

पॅरिस:वृत्तसंस्था― फ्रान्स देशामध्ये एक विमानाची भीषण दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तब्बल ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिल्याने ही दुर्घटना झाली. पश्चिम फ्रान्समध्ये ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ४.३०च्या सुमारास दोन विमानांमध्ये टक्कर झाली होती.

या अपघातात आतापर्यंत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या की, मायक्रोलाईट विमानात दोनजण प्रवास करत होते ज्याने डीए४० या प्रवासी विमानाला भीषण धडक दिली. या प्रवासी विमानात ३ जण प्रवास करत होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मायक्रोलाईट विमान एका घराजवळ उतरलं तर दुसरं प्रवासी विमान हे एका स्थानिक ठिकाणी लँड झालयाच समजत आहे. सुदैवाने घराजवळ विमान पडल्यानंतर कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. पण विमानात असलेल्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवेतच भिषण धडक झाल्यामुळे या विमानांनी पेट घेतला.अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहांना शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतल आहे तसेच पुढील तपास सुरू आहे.

‘येरे येरे पावसा’ चित्रपटावर टोकियो इंडी फिल्म महोत्सवात पुरस्कारांची मोहोर

मुंबई:आठवडा विशेष टीम― पावसाचे आगमन हा साऱ्यांनाच तृप्त करणारा अनुभव असतो. याच आनंदाची गोष्ट सांगणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटावर ‘ ६व्या टॉप इंडी फिल्म अॅवोर्ड टोकियो जपान (6th Top Indie Film Awards Tokyo, Japan) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ नामांकनाचा व पुरस्कारांचा आनंददायी वर्षाव झाला आहे.

सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, संकलन, संगीत व सर्वोत्कृष्ट संकल्पना या वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकन मिळवित सर्वोत्कृष्ट छायांकन व ध्वनी या विभागातल्या पुरस्कारांवर ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. यंदाच्या पावसाने साऱ्यांनाच सुखावले आहे. या वर्षात आमच्या चित्रपटाला टोरंटो, कॅनडा आणि आता टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काररुपी पावती मिळाल्याने आम्ही सुद्धा या आनंदात चिंब झालो असल्याचे दिग्दर्शक शफक खान सांगतात. ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे ही त्या आवर्जून नमूद करतात. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

चीनचे भारतीयांशी होणारं आर्थिक युद्ध…?

(इकोनॉमिक वॉर…मोबाईल अँप,इलेक्ट्रॉनिक उत्पादने)

भारत आणि चीन यांच्यातही आर्थिक आघाडीवर सुरू असलेल्या गतिरोधकामुळे केंद्र सरकारने मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची अपेक्षा केली जात आहे, जेणेकरुन चिनी उत्पादने आणि इतर सेवा यासाठी देशात अधिक कठीण परिस्थिती उद्भवू शकतात. गेल्या आठवड्यात लडाखमधील हिंसाचारानंतर व्यापाऱ्यांच्या समुदायासह नागरिकांनी चिनी वस्तू व सेवांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. या हिंसाचारात २० सैनिक ठार आणि ७० हून अधिक जखमी झाले.

भारत चीन सीमेवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात पुन्हा तेच जुने पण नव्याने वाद सुरू झाला की,चीनी वस्तू वापरू नका,चीनी अँप, इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रीकल वस्तू,चैनीच्या गोष्टी, सौंदर्य प्रसाधने अश्या अन्य अत्यावश्यक गोष्टी वापरण्यास थेट नकार दिला,काहींनी चीनच्या विरोधात पडसाद उमटले लोकांनी घरातील टीव्ही फोडले कुणी मोबाईल फोडले तर कुणी चीनला सेकंदाला कोटी रुपयांची उलाढाल करून देणारे tik tok अँप डिलिट केले व आम्ही देशभक्त कट्टर स्वदेशी असल्याचा आव सर्वत्र आणला,पण काही दिवस जातात तेव्हा सर्व परिस्थिती जैसे थे होती.

या सर्व प्रकारावर नजर टाकताना अनेक गोष्टी लक्षात येतात, की जेव्हा चीनसारख्या देशाने जीवनातील प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध करून तो जागतिक बाजारपेठेत जागतिक दाराच्या किमतीपेक्षा माफक दरात त्यांची उत्पादने बाजारपेठेत आणली, यामुळे सर्वांना एक पर्याय मिळाला की ज्या गोष्टीसाठी अमाप रक्कम मोजावी लागते आहे तीच गोष्ट जर अत्यल्प दारात मिळत असेल तर मग देशप्रेम, स्वदेशी या संज्ञा कुठेतरी खिदपद पडतात हे नेहमीच नागरिकांनी सिद्द केले आहे.

भारत देश स्वतंत्र होऊन काही दिवसांनंतर १९६६-६७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चीनला धडा शिकविला ज्याच्या जखमा अजूनही हिरव्या आहेत. इंदिरा गांधी सरकारने दिलेल्या रणनीतिक आणि सशस्त्र पावसाचा चीन विसरला नाही. सुमारे ५३ वर्षांपूर्वी भूतानचे संरक्षण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी चीनच्या निशाण्याखाली आल्या. तेव्हा चीनी सैनिक डोकलाममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. १९६६ मध्ये चीनने भूतानच्या बाजूने असल्याची कठोर टीका केली. पण भूतान हा अतिशय जवळचा आणि मैत्रीपूर्ण देश असल्याची भारताची वचनबद्धता आहे.

दि.१७ जून रोजी भारत चीनचा सीमावाद यामुळे हल्ला झाला व त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले, त्याच्या दुसऱ्या दिवशी चीनचे ४८ जवान मारले गेल्याच्या बातम्या सकाळी सकाळी व्हायरल झाला व नंतर सायंकाळी तीच बातमी ते जवान शहीद नाही तर जखमी झाले ह्या बातम्या सर्वत्र पसरल्या मग आज भारत स्वातंत्र्यच्या ७३ व्या वर्षांत पदार्पण करत असताना जर ,ज्या मीडियामुळे, माध्यमांनमुळे आज भारत स्थिर आहे,त्या भारत देशाला हीच मीडिया जर चुकीचा संदेश देत असेल तर ही या भारत देशाची शोकांतिका म्हणावे लागेल..!

१९६६-६७ ला भारत चीनमध्ये जे युद्ध झाले त्या धर्तीवर एक इंडियन आर्मी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तो चित्रपट जरी काल्पनिक असला तरी या चित्रपटात दाखवलेले चित्र आज भारतीयांशी मिळते जुळते आहे,कारण भविष्यात जेव्हा कधी भारत चीनचे युद्ध होईल त्यामध्ये कुणाची हार जित होणार नाही तर यासाठी प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था (आर्मी) स्ट्राँग असते पण जि आर्मी स्ट्राँग करण्यासाठी प्रत्येक देशातील गरीब जनता उपाशीपोटी राहते,ज्या पैशातून आपण अन्न खरेदी करतो त्याच पैशातून आपण युद्धाचे साहित्य दारुगोळा खरेदी करतो ही परिस्थिती आहे, राजकीय चौकटीतील काही बोटावर मोजण्याइतके लोक आपल्या भारत देशाची हाताळणी करत आहे,

यापुढे जर भारत चीन मध्ये युद्ध झाले तर ती हत्यार युद्धाने नाही तर इकॉनमिक वॉर ने होईल यामध्ये जन्मलेल्या बाळापासून मारणाऱ्या माणसांपर्यत चीनच्या उत्पादनाची गरज चीनने भारतीयांना लावलेली आहे यामुळे आपण एक सुई जरी खरेदी केली तर त्याचा सरळ फायदा थेट चीनला होईल याचे उदाहरण आज सर्वांच्या डोळ्यासमोर आहे,ते म्हणजे चिनी अँप टीक-टॉक हे ६७ एम.बी.चे हे व्हिडिओ एडिटिंग व पब्लिसिटी अँप आहे,आज भारतीय घरामध्ये ७ सदस्य असतील तर त्यांपैकी ४ सदस्य हे या tik tok ऑपच्या अधीन गेले आहेत व यांच्या दिवसातील २४ तासांपैकी ४-५ तास प्रत्येकजण या अँपसाठी देत आहे व वस्तुस्थिती आहे, यामागचे इकॉनॉमिक वॉर कसे आहे पहा,एक सेकंदाला एक भारतीयाने हे अँप इन्स्टॉल केले तर ६७ MB डेटा जातो, तर एक तासाला किती लोक आहे अँप घेत असतील त्याचा आलेख नाही,हे अँप वापरताना मोबाईलमध्ये सर्वात जास्त इंटरनेट डेटा व पॉवर वापरणारे हे अँप आहे,यामध्ये ३० सेकंदाचा व्हिडीओ अपलोड होतो जर एका सेकंदाला १ कोट व्हिडिओ अपलोड झाले तर त्याचा थेट फायदा चीनच्या इकॉनॉमिला होतो हे आहे चीनच्या पोटातील भारतीयांसाठी इ-वॉर…

म्हणूनच येणाऱ्या व चालू काळात हे युद्ध सुरू आहे,त्यामुळे या युद्धात देश किती संकटात व आर्थिक संकटात जाईल तेव्हा या देशाचा प्रत्येक नागरिक यासाठी जबाबदार असेल हे डावलता येणार नाही.

―संक्षिप्त―
इंजि.दत्ता हुले (बीड)
मो.9960135634

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ११ हजाराहूनअधिक प्रवासी मुंबईत दाखल

वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८ हजार ४६५ प्रवाशांचे आगमन

मुंबई, दि. १४:आठवडा विशेष टीम― ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ७२ विमानांमधून तब्बल ११ हजार ६६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४३१३ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ३७२९ इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ३६२४ इतकी आहे.या सर्व प्रवाशांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्वारंटाईन करण्यात येत आहे.
हे प्रवासी ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, रोम, जर्मनी, दुबई, मालदीव, वेस्टइंडिज आदी देशातून मुंबईत दाखल झाले आहेत.

१ जुलैपर्यंत आणखी ३७ विमानांनी प्रवासी येणे अपेक्षित

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवाशांच्या संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था विविध हॉटेल्समध्ये करण्यात येत आहे. इतर राज्यातील व महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने वंदे भारत अभियान महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

वंदेभारत अभियान : ४७ विमानांद्वारे परदेशातील ६ हजार ७९५ नागरिक मुंबईत दाखल

मुंबई दि.८:आठवडा विशेष टीम― वंदेभारत अभियानांतर्गत फेज १ आणि २ अंतर्गत ४७ विमानांद्वारे एकूण ६ हजार ७९५ नागरिक विविध देशातून महाराष्ट्रात परतले आहेत. या सर्वांना मुंबई विमानतळावर उतरवून घेण्यात येत असून आलेल्या प्रवाशांचे काटेकोर क्वारंटाईन करण्यात येत आहे.
आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये २१०७ प्रवासी मुंबईचे आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २४८३ इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या २२०५ इतकी आहे.

आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी अशा विविध देशातून प्रवाशी मुंबईत दाखल झाले आहेत.

याशिवाय १ जुलै २०२० पर्यंत ४८ फ्लाईटसद्वारे परदेशात अडकलेले नागरिक मुंबईत येणार आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांकडून क्वारंटाईन केले जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्या राज्यातील प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. या प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या राबवित आहे.

#Philippines महाराष्ट्रातील जवळपास 200+ MBBSचे विध्यार्थी अडकलेत फिलिपीन्स देशामध्ये ; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं !

पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू … Read more

शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ कोटी जमा

मुंबई:आठवडा विशेष टीम―कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. संस्थानाच्या … Read more

COVID-19: कोरोना व्हायरसवर औषध ,न्यूयॉर्कच्या Pfizer कंपनीने केला दावा; अँटिव्हायरल कंपाउंड सापडल्याचा दावा

न्यूयॉर्क:आठवडा विशेष टीम― नॉवेल कोरोना व्हायरस जगभरात पसरत आहे.त्यावर उपचार शोधण्यासाठी सर्व शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत.कोरोना व्हायरसला मारक अशा औषधांचा शोध सुरू युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात शास्त्रज्ञांना एक असा कंपाउंड(घटक) सापडला ज्याने करोना व्हायरस आजाराचा उपचार होऊ शकतो असा दावा एका फार्माकंपनीने केला आहे. आम्ही असा अँटिव्हायरल कंपाउंड तयार केला आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरसचा उपचार … Read more

फिलिपाईन्स देशातील दवावो शहरात लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती साजरी

दवावो(फिलिपाईन्स):आठवडा विशेष टीम― येथील दवावो मेडिकल स्कूल फौंडेशन या वैदयकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती दवावो येथे अभिवादन करून साजरी केली आहे.

गोपीनाथ मुंडे साहेबांवरील श्रद्धेपोटी परदेशात देखील साहेबांची जयंती साजरी करण्यात आली आहे.संघर्षयात्री असलेले लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र राज्यात विविध राजकिय पदावर काम केले व जनतेसाठी कल्याणकारी निर्णय घेतले.त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून फिलिपिन्स मधील दवावो मेडिकल स्कुल फौंडेशनच्या वैदयकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी साहेबांवरील श्रद्धा दाखवली आहे.गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती शहरात,राज्यात नव्हे तर परदेशात विविध कार्यक्रमांनी साजरी केली आहे.

या कार्यक्रमास डॉ.शिवकृष्ण बांगर,डॉ.आदित्य ढाकणे,डॉ.ऋषिकेश विघ्ने,डॉ.सौरभ बेंबडे,डॉ.अरविंद घाडगे,डॉ.वैष्णव गोल्हार,डॉ.महेश घुगे,डॉ.स्वप्नील ठोंबरे,डॉ.धनंजय आंधळे,सह छत्रपती ग्रुप चे अनेक सदस्य उपस्थित होते.

#Earthquake : दवावो सिटी मध्ये दुसऱ्यांदा मोठा भूकंप ; ६.५ मॅग्नीट्युडचा सकाळी ९.११ मिनिटांनी झाला भूकंप

दवावो(फिलिपीन्स): आठवडा विशेष टीम― फिलिपीन्स देशातील दवावो शहरात दुसऱ्यांदा मोठा भूकंपाचा हादरा बसला आहे.याआधी मंगळवारी सकाळी असल्याचं प्रकारचा भूकंपाचा हादरा बसल्याची घटना घडली होती त्यात १० जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते तर सुमारे ३५०+ जखमी झाल्याची खात्रीलायक माहिती आठवडा विशेष च्या हाती लागली आहे.मंगळवारी झालेल्या भूकंप हादऱ्या पेक्षा आजचा हादरा कमी प्रमाणात असल्याचे दवावो येथील सूत्रांकडून समजत आहे.फिलीपीन ज्वालामुखीशास्त्र आणि भूकंपशास्त्र संस्थाच्या मते ६.५ मॅग्नीट्युड चा हादरा असल्याचे सांगण्यात आले आहे.


ह्या भूकंपाच्या हादऱ्यामुळे दवावो येथील जनता रस्त्यावर येऊन सुरक्षित ठिकाणी उभा राहून आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती.तर भारतातील जवळपास ४ ते ५ हजार विध्यार्थी दवावो येथील दवावो मेडिकल स्कुल फौंडेशन या वैद्यकीय महाविद्यालयात एमडी(एमबीबीएस) व बीएस चे शिक्षण घेत आहेत.त्यांच्यामध्येही ह्या हादऱ्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक

आठवडा विशेष टीम―लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली असल्याचे समजते. हाफिजला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. Jamatud Dawa's Hafiz Saeed arrested and sent to judicial … Read more

फक्त एकदा ‘आमदार’ करा सगळ्यांचे ‘लग्न’ जुळवतो―चांगदेव गिते यांची घोषणा

पाटोदा:आठवडा विशेष टीम―हाताला काम-धंदा नसल्याने अनेक तरुणांचे लग्न जमणे अवघड होत चालले आहे अश्या परिस्थितीत आपल्याला विधानसभेला निवडुन दिल्यास संपुर्ण मतदारसंघात प्रत्येक झेडपी गटात, प्रसंगी इतर जिल्ह्यातही वधु-वर परिचय मेळावे घेऊन तरुणांचे लग्न जुळवण्याचे काम प्राधान्याने केले जाईल असं वक्तव्य आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील इच्छुक उमेदवार श्री. चांगदेव गिते यांनी केलं. ते काल पत्रकारांशी बोलत होते.

बीड जिल्हा हा कायम दुष्काळाच्या छायेत असतो त्यातल्या त्यात आष्टी-पाटोदा-शिरूर हे तिन्ही तालुके अत्यंत दुष्काळी पट्ट्यात येतात. सोबतच रोजगारांचे इतर साधनं उपलब्ध नसल्याने अनेक तरुणांना रोजगार नाहीत अन मागच्या काळात वरून स्त्री-भ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या कमालीची घटलेली असलेली असल्याने अनेक तरूणांचे विवाह खोळंबळे आहेत. अनेक तरुण लग्नाचे वय पार करत आहेत व ही समस्या गंभीर बनत आहेत. त्यामुळे आपल्याला आमदार केल्यास तरुणांना बँका मार्फत, सरकार मार्फत व्यवसायासाठी कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करेन. संपुर्ण मतदारसंघात नौकरी महोत्सव आयोजित केले जातील. कारण ज्या तरुणांना नौकरी नाही किंवा जे काही आर्थिक अडचणीमुळे व्यवसाय करू शकत नाहीत अश्यांना मुली देण्यास पालक धजावत नाहीत. त्यामुळे या प्रश्नात जातीने लक्ष घालुन हा प्रश्न प्राध्याण्याने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ही श्री.गिते म्हटले. भविष्यात ही अशी परिस्थिती उदभवू नये याकरीता मुलींच्या जन्मदर वाढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करेन व आपल्या भागात छोटे-मोठे उद्योग उभारले जातील जेणेकरून ज्याचा विवाह जुळत नाही त्याला प्राधान्याने काम दिलं जाईल व लग्न जुळण्यासाठी प्रयत्न केले जातील. एकुणच आमदार होण्यासाठी गिते यांनी कंबर कसली असुन अनेक मुद्द्यासह आता एका गंभीर पण तितक्याच दुर्लक्षित व कोणी बोलायला तयार नसलेल्या मुद्द्याला हात घातला आहे. आमदार होण्यासाठी आता सार्वजनिक प्रश्नासोबत वयक्तिक प्रश्नाकडे ही गिते यांनी लक्ष घातल्याचे दिसुन येत आहे.

#देवावरचे #हल्ले: …जर डॉक्टरला ठोकून पेशंट बरा होत असेल,वापस येत असेल तर रोज ठोका ?

चांगदेव गिते―आपल्याकडे डॉक्टरांना पृथ्वीवरचे देव म्हटलं जातं. अन त्याच देवांना आपण जर मारहाण करत असु तर यापेक्षा दुर्दैव काही नाही.
आपल्या पेशंटचं काही बरं-वाईट व्हावं असं जगातल्या कोणत्याच डॉक्टरला वाटत नाही मग आपल्या डॉक्टरचं पेशंट होईपर्यंत किंवा डॉक्टरचं बरं-वाईट होईपर्यंत मारहाण करणं अत्यंत चुकीचं आहे.
आपण पैसे देतो म्हणजे आपल्याला डॉक्टरच्या जीवावर उठायचा अधिकार मिळत नाही.
शिवाय डॉक्टर होणं हे मारहाण करण्याइतकं सोप्पं मुळीच नसतं.
आयुष्यातले १०-१२ वर्षे जनावरा सारखे कष्ट करावे लागतात. मग एवढं करून ही मारहाण होत असेल तर डॉक्टरच्या मनाला काय वाटत असेल ??
शिवाय बऱ्याच गोष्टी ह्या डॉक्टरांच्या हाताबाहेरच्या असतात. अनेकदा प्रबळ इच्छा असुनही ते एखाद्या रुग्णाला वाचवू शकत नाहीत, नीट करू शकत नाहीत त्यात डॉक्टरांचा दोष नसतो. डॉक्टरांनी समजा निष्काळजी पना केला / झाला तर त्याला कायदेशीर मार्गाने आपण विरोध करू शकतो किंवा कारवाई ही होऊ शकते. मग हल्ले करून काय भेटणार आहे.

विचार करा जर आपला नातेवाईक, मित्र किंवा आपण स्वतः काही आजारी पडलो तर आपल्या काय भावना होतात मग डॉक्टरला ही भावना, नातेवाईक असतात की.
त्यामुळे डॉक्टर वर हात उचलण्यापुर्वी नक्की विचार करा की कधीकाळी याच हातात डॉक्टरांनी injection दिलेलं असत, याच हाताच्या जखमा बऱ्या केलेल्या असतात, याच हाताला मलमपट्टी केलीली असते.
शेवटी हेच हात त्यांच्यावर पडत असतील तर देशभरातल्या डॉक्टरांची लोकांप्रती असलेली मानसिकता बदलु शकते.
अन जर डॉक्टरला ठोकून पेशंट बरा होत असेल, वापस येत असेल तर रोज ठोका !!

– चांगदेव गिते (लेखक)

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित ; भारताचा सर्वात मोठा विजय

आठवडा विशेष टीम: भारतातील अनेक हल्ल्याचा मागचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताला सर्वात मोठे यश आले आहे. संयुक्त राष्ट्रां-च्या(युनायटेड नेशन) सुरक्षा परिषदेने (दि.१) बुधवारी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून यादीत टाकले आहे.

संयुक्त राष्ट्रातील(यू.एन) भारताचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेच्या मंजूर यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. युएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत.