कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंकेत कोलंबो येथे झालेल्या तब्बल ६ साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंका हादरली आहे. इस्टर संडेच्या दिवशी ३ चर्च आणि ३ हॉटेलमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. सकाळी पाऊनेनऊच्या दरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अद्याप ५२ जण मृत तर २०० पेक्षा अधिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
#BREAKING Toll rises to 52 killed in Sri Lanka blasts: police to AFP pic.twitter.com/PRLD7ToipQ
— AFP News Agency (@AFP) April 21, 2019
ईस्टर संडेच्या वेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना हा बॉम्ब-स्फोट घडवून आणल्यामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांच्या माहीती नुसार,जेव्हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला त्यावेळी ईस्टर संडेच्या निमित्ताने चर्चमध्ये प्रार्थना आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक चर्चमध्ये जमा झाले होते आणि याच वेळेत हा स्फोट घडवण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे? जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरित कोलंबो नॅशनल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलेले आहे. हा बॉम्बस्फोट कोणी घडवला याबाबत आतापर्यंत माहिती मिळालेली नाही.