पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

तुळजापूर येथे पोलिसांकडून पत्रकारास अमानुष मारहाण

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी―तालुक्यातील माळुंब्रा येथील खाजगी सोलार कंपनीकडे 20 लाखाची खंडणी मागितली म्हणून तुळजापूर येथील म मराठीचे न्युज चॅनलचे पत्रकार राहुल कोळी यांना तुळजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षण हर्षवर्धन गवळी यांनी अमानुषपणे मारहाण केली. याविषयी अधिक माहिती अशी की,तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा शिवारात दि .६ डिसेंबर रोजी वेळ ३ .३० वा.सुमारास क्लीन टेक सोलार कंपनी, मुंबई … Read more

पशुप्रर्दशनात निवडलेल्या उत्कृष्ट जनावरांना जि.प सदस्य श्री महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

तुळजापूर (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील मोजे मंगरूळ येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य पशुप्रर्दशनाचे आयोजन करण्यात आले होते , या प्रदर्शनामध्ये गावातील व परिसरातील अनेक पशु पाल्यांनी आपली जनावरे व पशु घेऊन आले होते. आणि या पशुप्रर्दशनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पशुप्रर्दशनामध्ये निवडक उत्कृष्ट जनावरांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना श्री. महेंद्र काका … Read more

तुळजापूर तालुका आदर्श अंगणवाडी मदतनीस,सेविका,पर्यवेक्षिका पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न

तुळजापूर (प्रतिनिधी): आज तुळजापूर पंचायत समिती येथे तुळजापूर तालुक्यातील आदर्श अंगणवाडी मदतनीस ,सेवीका व पर्यवेक्षिका पुरस्कार सत्कार समारंभ पार पडला.

या कार्यक्रमास आ.मधुकराव चव्हाण साहेब ,जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.आर्चनाताई पाटील , तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गायकवाड , पंचायत समिती सदस्य सिध्देश्वर कोरे , शिवाजी गोरे , सहाय्यक गटविकास अधिकारी राऊत साहेब , महिला व बालकल्याण विकास अधिकारी हावळे साहेब,यावेळी या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र काका धुरगुडे यांनी उपस्थित राहुन उपस्थित पुरस्कार प्राप्त अंगणवाडी सेविका , पर्यवेक्षिका व मदतनीस यांचे अभिनंदन करुन त्याच्या कार्याचे कौतुक केले. आणि उपस्थितांना संबोधित करताना , आपल्या शासनाकडील मागण्यांसाठी कायम पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.