‘येरे येरे पावसा’ चित्रपटावर टोकियो इंडी फिल्म महोत्सवात पुरस्कारांची मोहोर

मुंबई:आठवडा विशेष टीम― पावसाचे आगमन हा साऱ्यांनाच तृप्त करणारा अनुभव असतो. याच आनंदाची गोष्ट सांगणाऱ्या ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटावर ‘ ६व्या टॉप इंडी फिल्म अॅवोर्ड टोकियो जपान (6th Top Indie Film Awards Tokyo, Japan) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ नामांकनाचा व पुरस्कारांचा आनंददायी वर्षाव झाला आहे.

सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, दिग्दर्शन, संकलन, संगीत व सर्वोत्कृष्ट संकल्पना या वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकन मिळवित सर्वोत्कृष्ट छायांकन व ध्वनी या विभागातल्या पुरस्कारांवर ‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. यंदाच्या पावसाने साऱ्यांनाच सुखावले आहे. या वर्षात आमच्या चित्रपटाला टोरंटो, कॅनडा आणि आता टोकियो (जपान) आदि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काररुपी पावती मिळाल्याने आम्ही सुद्धा या आनंदात चिंब झालो असल्याचे दिग्दर्शक शफक खान सांगतात. ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे ही त्या आवर्जून नमूद करतात. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.

जरंडीला मोफत वह्या वाटप उपक्रम ; मराठा प्रतिष्ठान शैक्षणिक मदतीत अग्रगण्य―शेख शकील यांचे प्रतिपादन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मराठा प्रतिष्ठानच्या सामाजिक देयत्व उपक्रमात शैक्षणिक मदतीत प्रतिष्ठान अग्रगण्य ठरले असून समाजाचे दूत म्हणून कार्य करणाऱ्या मराठा प्रतिष्ठानचं या उत्तुंग भरारीचे सन्मानाने स्वागत करतो असे गौरोद्गर सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील यांनी जरंडी ता.सोयगाव येथे काढले प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळात होरपळून निघालेल्या कुटुंबियांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी तालुक्यातील गरीब व … Read more

क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती व कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी

अंबाजोगाई: आठवडा विशेष टीम― शहरात क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती तसेच कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. येथील लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात बुधवार,दि.30 मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. मिलिंद आवाड तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रिय अध्यक्षा कुसुमताई गोपले तर विचारमंचावर कार्यक्रमाचे आयोजक तथा … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केले राष्ट्र निर्माणाचे कार्य―व्याख्याते चंद्रकांत हजारे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― भारताचा इतिहास हा उज्ज्वल आणि दैदिप्यमान आहे.या इतिहासात पुरूषांच्या बरोबरीनेच कर्तबगारी करत अनेक स्त्रियांनी आपली नांवे इतिहासात सुपर्णपानावर रेखाटली आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राष्ट्र निर्माण, समाज बांधणी,विविध कलांना प्रोत्साहन, साहित्य,संगीत व संस्कृती संवर्धनाचे केलेले कार्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन व्याख्याते चंद्रकांत हजारे यांनी केले. मोरफळी (ता.धारूर) येथे मंगळवार,दि.28 … Read more

बीड जिल्हयाची जनता मला ईश्वराच्या जागी, त्यांच्यासमोर मी नतमस्तक―पंकजा मुंडे

आ.भीमराव धोंडेंच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात उपस्थितही भारावले बीड दि.२९: कोणत्याही शुभ कार्याची सुरवात आपण ईश्वराचे दर्शन घेऊन करतो, माझा ईश्वर म्हणजे या जिल्हयातील जनता आहे, त्यांच्यासमोर मी नतमस्तक होते असे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहील अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी भावना व्यक्त केल्यानंतर उपस्थितही भारावून गेल्याचे … Read more

प्रा.माधव मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त 18 मे रोजी अंबाजोगाईत व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा

अंबाजोगाई: आठवडा विशेष टीम― येथील प्रा.माधव मोरे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने शनिवार,दि.18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रा.माधव मोरे यांच्या 26 व्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले.यावेळी गुणवंतांचा सत्कार ही करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.एस.के. जोगदंड यांनी दिली आहे. विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे शनिवार,दि.18 मे रोजी … Read more

सोयगावला पोषण रॅली,तालुकाभर भरगच्च कार्यक्रम

सोयगाव दि.२७(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):पोषण अभियानाअंतर्गत महिला बाल विकास प्रकल्प सोयगावचं वतीने बुधवारी शहरातून तालुका स्तरीय पोषण रॅली काढण्यात आली यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि बचत गटांच्या महिलांचा मोठा समावेश होता.पंचायत समितीच्या मैदानावरून प्रारंभ झालेल्या या रॅलीचा प्रकल्प कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.
पोषण रॅलीद्वारे महिला विधायक कायदे,पोषण आरोग्य व शिक्षण विषयक जनजागृती करण्यात आली,प्रभारी प्रकल्प अधिकारी रुक्मिणी पारधे,पर्यवेक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,दरम्यान पोषण अभियान जनआंदोलन अभियाना अंतर्गत प्रकल्प विभागाकडून तालुकाभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे लार्य्वेक्षक वैशाली पाटील यांनी सांगितले.या दरम्यान जरंडी ता.सोयगाव येथील प्राथमिक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या,यामध्ये पाचवी ते सातवी या इयत्तांसाठी बेटी बचाव,बेटी पढाओ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये अनुक्रमे भाग्यश्री गांगुर्डे,राजश्री गायकवाड,सानिका चव्हाण यांना पारितोषिक देण्यात आले.वैशाली पाटील,रुक्मिणी पारधे,सुरेखा ठाकरे आदींनी पुढाकार घेतला.

“पाणी,आरोग्य आणि स्वच्छता” या विषयीची जाणीव बालवयापासुनच होणे गरजेचे-सौ.मंगलाताई सोळंके

समाजासमोरील मुलभूत समस्या संपल्याशिवाय विकास अशक्य-संदीप बर्वे

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

अंबाजोगाई (प्रतिनिधी): पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे ग्रामिण भागात महिलांची फरफट होते पाणी फाऊंडेशन सारख्या संस्थांमुळे गेल्या काही वर्षात जनजागृती होत आहे.तरी परंतु पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या विषयीची जाणीव बालवयापासुन निर्माण होणे गरजेचे आहे. शासकीय योजना ग्रामिण भागापर्यंत पोहोंचवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्या हव्या तशा जनतेपर्यंत वेगाने पोहोंचत नाहीत. परिणामी योजनांचा लाभ जनतेला मिळत नाही असे प्रतिपादन सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांनी केले.तर यावेळी बोलताना संदीप बर्वे यांनी स्त्री ही गुलाम आहे असे मनुस्मृतीने वेळोवेळी सांगितले आहे.महिलेला स्वातंत्र्य मिळू नये अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यामुळे भारतीय समाजाने महिलेला दुय्यमत्व दिले असल्याचे सांगुन ज्या देशाने स्त्रीयांना समान हक्क दिले ते देश आजप्रगती करीत आहेत.जोपर्यंत महिला परिवर्तनाच्या चळवळींचे नेतृत्व करीत नाहीत तोपर्यंत अमुलाग्र बदल होणार नाही असे प्रतिपादन बर्वे यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात दोन्ही मान्यवर बोलत होते.

येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात “स्त्रियांसमोरील पाणी, आरोग्य आणि स्वच्छता विषयक आव्हाने व शासकीय योजना” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार,दि. 26 मार्च रोजी करण्यात आले होते.चर्चासत्राचे उद्घाटन सौ.मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.या चर्चासत्रात 200 पेक्षा अधिक महिलांनी तसेच सदरील विषयाचे अभ्यासक, संशोधक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर हे होते.यावेळी प्रास्ताविक करताना “पाणी,आरोग्य आणि स्वच्छता” या संबंधी समाज व इतर घटकांमध्ये जागृती झाली पाहिजे असा या चर्चासत्राचा विधायक उद्देश असल्याचे प्राचार्या डॉ. वनमाला रेड्डी यांनी सांगितले व भूमिका विषद केली.या चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्त्या मनिषाताई तोकले (बीड),संदीप बर्वे(पुणे),डॉ.शुभदाताई लोहिया (अंबाजोगाई), अ‍ॅड.शोभाताई लोमटे, प्राचार्य डॉ.सविताताई शेटे,प्राचार्य डॉ.अण्णासाहेब जाधव,अभियंता बडे,
सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.संतोष शिंदे या विद्यार्थ्याने स्वागतगीत सादर केले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य श्रीमती प्रतिभा देशमुख, उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे,उपप्राचार्य प्रा.भगवान शिंद चर्चासत्र संयोजक डॉ.अहिल्या बरूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन प्रा.शैलेश जाधव यांनी करून उपस्थितांचे आभार चर्चासत्र संयोजिका डॉ.अहिल्या बरूरे यांनी मानले.चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ.डी.बी.तांदुळजेकर, डॉ.मुकुंद राजपंखे, डॉ.दिलीप भिसे, डॉ.अरविंद घोडके, प्रा.इंद्रजीत भगत, प्रा.केशव हंडीबाग, प्रा.पी.के.जाधव, प्रा.सुजाता पाटील, प्रा.रोहिणी खंदारे, प्रा.मनोरमा पवार, प्रा.हिरा नाडे, प्रा.चव्हाण मॅडम, प्रा.देशपांडे मॅडम, प्रा.सोळंके मॅडम, अधिक्षक लक्ष्मण वाघमारे यांच्यासह महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले.


बहादूरगड येथे बलिदान स्फूर्तीदिन व दुर्गसंवर्धन मोहीम संपन्न

शिवस्फूर्ती समूह व छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून आयोजन

पेडगाव: छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त किल्ले बहादूरगड (पेडगाव) येथे शिवस्फूर्ती समूह व छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून आयोजीत ‘ बलिदान स्फूर्तीदिन व दुर्गसंवर्धन मोहीम ‘ उत्साहात संपन्न झाली.
छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरी कैद करून (पेडगाव) बहादूरगडच्या किल्ल्यावर आणले . औरंगजेबाने येथेच त्यांचा अनन्वित छळ करून क्रूर शिक्षा दिली . नंतर वढू तुळापूर येथे नेऊन 11 मार्च 1689 रोजी हत्या केली . छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्यासाठी बलिदान दिले.
मोहिमेत संपूर्ण दुर्गदर्शन , विविध स्थळांची सफाई व व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्याते शेखर पाटील यांनी संभाजी महाराज व किल्ल्याचा इतिहास तर व्याख्याते संदिप कदम यांनी इतिहास व वास्तव परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. आकाशराजे कंक यांनी दुर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले . याप्रसंगी भगवान कणसे , सचिन झगडे सर यांचे मनोगत झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभवदादा पाचपुते यांनी उपक्रमाचे कौतुक करून विविध विषयावर भाष्य केले .आभार आदेशशेठ नागवडे यांनी मानले तर सूत्रसंचालन गोरखराजे उंडे यांनी केले.
सेवा समितीचे अध्यक्ष शंकर (आप्पा) जाधव , शिवस्फूर्तीचे अध्यक्ष अशोक पठाडे , पदाधिकारी व सदस्यांच्या कष्टातून उपक्रम यशस्वी झाला . याप्रसंगी श्रीगोंदा बाजार समितीचे उपसभापती वैभवदादा पाचपुते ,सामाजिक कार्यकर्ते आदेशशेठ नागवडे , येसाजी कंक यांचे वंशज आकाशराजे कंक , सरपंच भगवान कणसे , उपसरपंच देविदास शिर्के , केशनंद ग्रा.प.चे सदस्य सचिन जाधव , किर्तनकार सुनंदाताई बोस , फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सचिन झगडे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष टिळक बोस , मिनाक्षीताई डिंबळे , स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता हुले आदी मान्यवर उपस्थित होते.

जागर स्त्री शक्ती महोत्सवातून महिलांना मिळाले व्यासपीठ ;जागतिक महिला दिनानिमित्त अंबाजोगाई नगरपरिषदेने घेतल्या विविध स्पर्धा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.१२: जागतिक महिला दिनानिमित्त अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने महिला भगिनींसाठी विविध नऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या सर्वच स्पर्धांना महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहराच्या नगराध्यक्षा, विविध समित्यांच्या महिला सभापती, महिला नगरसेविका यांनीही अनेक स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रथमच अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे शहरातील महिलांनी स्वागत केले.जागर स्त्री शक्ती महोत्सवातून अंबाजोगाई नगर परिषदेने महिलांना नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे.

“जागर स्त्री शक्तीचा महोत्सव-2019″ हा शुक्रवार,दि.8 मार्च ते शनिवार,दि.9 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला.या महोत्सवाचे उद्घाटन शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी यांच्या हस्ते तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती बबीता महादेव आदमाने,उपसभापती सौ.संगिता सुनिल व्यवहारे,शिक्षण व सांस्कृतीक समितीच्या सभापती सौ.वासंती मिलिंद बाबजे, भाजपाच्या गटनेत्या नगरसेविका सौ.संगीता दिलीपराव काळे, नगरसेविका सौ.कांचन हनुमंत तौर, नगरसेविका सौ.सविता अनंत लोमटे, नगरसेविका सौ.ज्योती धम्मा सरवदे, नगरसेविका सौ.शिल्पा संजय गंभिरे, नगरसेविका सौ.उज्वला बाला पाथरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

शुक्रवार,दि.8 मार्च रोजी आयोजित आनंदनगरीमध्ये 50 महिला,संगीत खुर्ची स्पर्धेत 100 महिला , लिंबु चमचा स्पर्धेत 150 महिला,रांगोळी स्पर्धेत 45 महिला,वर्क्तृत्व स्पर्धेत 17 महिला तसेच शनिवार,दि.9 मार्च रोजी आयोजित गीतगायन स्पर्धेत 52 महिला,फॅन्सी ड्रेस स्पर्धेत 22 महिला, वैयक्तीक नृत्य स्पर्धेत 20 महिला आणि सामुहिक नृत्य स्पर्धेत 7 महिला संघ व 356 महिलांनी वैयक्तीक स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेचा समारोप समारंभ शनिवार,दि.9 मार्च रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.बबीता महादेव आदमाने, उपसभापती सौ.संगिता सुनिल व्यवहारे,शिक्षण व सांस्कृतिक समितीच्या सभापती सौ.वासंती मिलींद बाबजे,भाजपाच्या गटनेत्या नगरसेविका सौ.संगिता दिलीपराव काळे,नगरसेविका सौ.कांचन हनुमंत तौर, नगरसेविका सौ.सविता अनंत लोमटे, नगरसेविका सौ.ज्योती धम्मा सरवदे, नगरसेविका सौ.शिल्पा संजय गंभीरे, नगरसेविका सौ.उज्वला बाला पाथरकर, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयूताई हेबाळकर यांच्यासहीत मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नगरपालिका कटीबद्ध आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला भगिनींना खुले व्यासपीठ मिळावे या भूमिकेतुन हा उपक्रम राबविण्यात आला. आमचे नेते राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काळातही अंबाजोगाई शहरातील महिला भगिनींसाठी अशाच पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती देवून जागर स्त्री शक्तीचा महोत्सव- 2019 ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी यांनी स्पर्धक तसेच उपस्थित महिला भगिनींचे आभार मानले.यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली.पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम असे होते. स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आनंदनगरी स्पर्धा श्रद्धा लोढा (प्रथम),रविना लोमटे (द्वितीय),वैष्णवी पवार (तृतीय),वक्तृत्व स्पर्धा-अंजली सेलुकर (प्रथम), शिवकन्या पवार (द्वितीय),वर्षा तोडकर (तृतीय),पुजा कुलकर्णी (उत्तेजनार्थ),लिंबु चमचा स्पर्धा-मोहर डिगांबर डाके(प्रथम), निता युवराज भोसले (द्वितीय),प्रेमा सचिन स्वामी (तृतीय),संगीत खुर्ची स्पर्धा-जया सतिष पाटील (प्रथम),राजश्री सचिन गौरशेट्टी (द्वितीय),रंजना धनराज शिंदे (तृतीय),रांगोळी स्पर्धा-मेघा दत्तोपंत अकोलकर (प्रथम), सुप्रिया वाघमारे (द्वितीय),अनुराधा बाबासाहेब केंद्रे (तृतीय),आरती संतोष खैरमोडे (उत्तेजनार्थ), गीतगायन स्पर्धा-ज्योती जीवन देशमुख (प्रथम), प्रतिक्षा जोशी (द्वितीय), जयश्री मस्के (तृतीय), सारिका जोशी (उत्तेजनार्थ),वैयक्तीक नृत्य स्पर्धा-अंजली कदम (प्रथम),उज्वला मुंडे (द्वितीय),मंजुषा शिनगारे (तृतीय), सामुहिक नृत्य स्पर्धा सहभाग संघ-सखी ग्रुप (प्रथम),गजानन महाराज ग्रुप (द्वितीय), मुक्ता ग्रुप (तृतीय) तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वरूपा कुलकर्णी (प्रथम),शिल्पा सावरे (द्वितीय),अनिता फड (तृतीय) हे विजेते ठरले.

परिक्षक म्हणून पाटील मॅडम,जोगळेकर मॅडम, ज्योती इंगळे-शिंदे, प्रगती घोडके,मिसाळ मॅडम,गणेश कदम, विद्याधर पंडीत,शंकर शिनगारे,बळीराम उपाडे,मंजुषा देशपांडे, अनुराधा निकम, डॉ.हेबाळकर मॅडम, डॉ.काळेगावकर मॅडम, मर्लेचा मॅडम यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरणानंतर उपस्थितांचे आभार उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर शिनगारे यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
सुनिल व्यवहारे,शहरअभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे,शहर अभियान व्यवस्थापक शेख समिरोद्दीन,पालिकेचे लेखाधिकारी उदय दिक्षीत,भिमाशंकर शिंदे,आनंद कांबळे, गणेश तौर,प्रिती पोपळघट,पंकज जोगदंड,पुजा हजारे आदींनी पुढाकार घेतला.


१८७१.३४ कोटी खर्च करून येडशी ते औरंगाबाद चौपदरीकरण रस्त्याचे लोकार्पण गेवराई येथे ना.पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते पार पडले

गेवराई दि.०९ : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आयोजित 1871.34 कोटी खर्च करून बीड जिल्ह्यातील येडशी ते औरंगाबाद 211 किमी लांबीच्या चौपदरीकरण करणे या रस्त्याचे लोकार्पण आज गेवराई, जिल्हा बीड येथे ना.पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते पार पडले तसेच याच कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव देवगाव लासुर स्टेशन रा.मा. 39 … Read more

विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक―न्यायमूर्ती एम. व्ही. जावळे

पाटोदा ( शेख महेशर ) दि.२८ : प्रत्येक नागरिकास तसेच शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांना कायद्या विषयी साक्षर व जागरूक करणे, विद्यार्थ्यांना कायद्याचे मुलभूत ज्ञान प्रदान करणे आवश्यक आहे, त्या मुळे मा.उच्च न्यायालयाने निर्देशित केल्या प्रमाणे पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे लिगल लिटरसी क्लब ची स्थापना करण्यात आली.या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची सखोल माहिती … Read more

३ मार्चला अंबाजोगाई शहरात महास्वच्छता अभियान

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण,रेवदंडा व नगरपरिषद अंबाजोगाई यांचा संयुक्त पुढाकार महास्वच्छता अभियानात अंबाजोगाईकरांनी सहभाग नोंदवावा―नगरपरिषदेचे विनम्र आवाहन अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.२७ :डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, रेवदंडा व नगरपरिषद, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई शहरात रविवार,दि.3 मार्च रोजी सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात अंबाजोगाई शहरातील नागरिक,स्वयंसेवी, सहकारी संस्था, सामाजिक व … Read more

रमाईंचा त्याग व पाठबळामुळे ‘बाबासाहेब’ हे नाव जगमान्य झाले ―आनंदराज आंबेडकर

मातोश्री रमाई आंबेडकर जयंती निमित्त भिमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम

आठवडा विशेष|प्रतिनिधी

अंबाजोगाई दि.२५: माता रमाईंचा त्याग व पाठबळामुळे बाबासाहेब हे नांव जगमान्य झाले. रमाईंच्या नावाने अंबाजोगाईत होणारा महोत्सव प्रेरणादायी असल्याचे सांगून या देशावर बाबासाहेबांचे मोठे उपकार आहेत. त्यांनी लिहीलेल्या राज्य घटनेमुळे आज भारत अखंड देश राहीलाय. बाबासाहेबांचे विचार अंगिकारल्याने आंबेडकरी समाजाची प्रगती झाली व पुढेही होईल.त्यामुळे मुलांना उच्च शिक्षीत करा, निर्व्यसनी बनवा,चांगले संस्कार करा.आज समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.
शिकलेल्या लोकांनी आंबेडकरी चळवळीस योगदान द्यावे.सत्ता ही प्रगतीची गुरूकिल्ली आहे.काळ बदलतोय, राजकिय हवा बदलतेय, हे ओळखा.वंचित आघाडीच्या सर्वच सभांना आज लाखोंची गर्दी होतेय.तेव्हा अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना साथ व ताकद द्या,तेच तुम्हाला सत्ता देतील असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले.ते अंबाजोगाईत आयोजित मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सवात उदघाटक म्हणून बोलत होते.

मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणेच यावर्षी मातोश्री रमाई प्रतिष्ठान, अंबाजोगाई आयोजित मातोश्री रमाई आंबेडकर जयंती उत्सव समिती,अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित रमाई महोत्सव-2019 मध्ये विविध उपक्रम घेण्यात आले.जयंती महोत्सवाचे हे दहावे वर्ष होते.या महोत्सवाच्या आयोजनासाठी निमंञक मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.राहूल धाकडे यांच्या संयोजन समितीने पुढाकार घेतला.यावेळी विचारपीठावर उदघाटक म्हणून आनंदराजजी आंबेडकर (सरसेनानी, रिपब्लिकन सेना, महाराष्ट्र राज्य) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे होते.यावेळी प्राचार्य मेजर डॉ.एस.के. खिल्लारे(स्वा.रा.ती.महाविद्यालय),अ‍ॅड. सुनिल सौंदरमल(संस्थापक अध्यक्ष, आधार मल्टीस्टेट) हे प्रमुख अतिथी तर डॉ.अजय ओव्हाळ,(शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,लातूर), अ‍ॅड.विशाल जोगदंड (सुप्रिम कोर्ट,दिल्ली),जितेंद्र पोटभरे (ग्रामविकास अधिकारी),विजय वाकोडे(परभणी),रवी वाघमारे,राजेंद्र घोडके, संजय बोधनकर, शोभाताई गायकवाड,मुख्याध्यापक, वेणूताई चव्हाण (कन्या) विद्यालय,अंबाजोगाई तसेच मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष व निमंञक
डॉ.राहूल धाकडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र घोडके, अनुष्का सोनवणे,मुख्याध्यापिका शोभाताई गायकवाड,प्रा.सा.द.सोनसळे,किरण चक्रे यांचा सन्मान करण्यात आला. मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपादित विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावर्षी महोत्सवाने वेगळेपण जपत “आंबेडकर कुटूंबातील बाबासाहेबांचे नातू आनंदराजजी आंबेडकर यांना ऐकण्याचा दुग्धशर्करा योग जुळवून आणला.प्रास्ताविक करताना डॉ.राहुल धाकडे म्हणाले की, रमाई प्रतिष्ठान, अंबाजोगाईच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम व सोबत प्रबोधनपर भिमगीतांचा कार्यक्रम ही आयोजित करीत आहोत.माता रमाईंचा “त्याग व जीवनकार्य” हे नव्या पिढीसमोर व समाजासमोर पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम सुरु केला आहे. आंबेडकरी कुटूंबाशी ऋणानूबंध ठेवून गेल्या दहा वर्षांत समाजात काम करणारे कार्यकर्ते,लेखक, विचारवंत,कलावंत,भिमशाहीर,साहित्यिक, समाजसेवक यांचा वेळोवेळी सन्मान केला.यापुढे एकिकडे बाबासाहेबांचे नांव घ्यायचे व कुणाच्याही मागे जय-जयकार करीत फिरणा-या अशा वाट चुकलेल्या समाजातील तरूणांना बाबासाहेबांच्या चळवळीशी जोडण्याचे काम करणार असल्याचा मनोदय डॉ.धाकडे यांनी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य मेजर डॉ.एस.के.खिल्लारे, डॉ.अजय ओव्हाळ,अ‍ॅड.विशाल जोगदंड यांची समायोचित भाषणे झाली.तर अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.कमलाकर कांबळे यांनी,“जो नीतिमान असेल त्याला बौध्द समजले पाहीजे असे स्वता: बाबासाहेबांनीच सांगीतले आहे.तेव्हा कडवे बौध्द व्हा,धम्माचे आचरण करा,आपल्या पैशातून आपल्या महामानवांच्या जयंती साज-या करा, डॉ.राहूल धाकडे यांनी रमाई महोत्सवासारखा अतिशय चांगला उपक्रम सुरू केल्याचे सांगून आता एकञ येवून आंबेडकरी चळवळ पुढे नेऊ असा आशावाद डॉ.कांबळे यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार भिमाशंकर शिंदे यांनी मानले.प्रारंभी गायक बळीराम उपाडे व संच यांच्या “भीमगीतांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाची” सुरेल गितांची मेजवानी अंबाजोगाईकरांना ऐकावयास मिळाली.
त्यानंतर मातोश्री रमाई आंबेडकर व महापुरूषांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले.मशाल प्रज्ज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. संयोजन समितीने मान्यवरांचा सत्कार केला.रविवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता या महोत्सवाचे उदघाटन झाले.वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, बसस्थानकासमोर अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रमाई प्रतिष्ठान, अंबाजोगाई आयोजित मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाच्या यशस्वितेसाठी जयंती महोत्सव समितीचे निमंञक डॉ.राहूल धाकडे (अध्यक्ष) तसेच संयोजन समितीचे प्रा.अनंत कांबळे,मुजीब काझी,विश्वास चोबे,रविंद्र केंद्रे, डॉ.विनायक गडेकर,भिमाशंकर शिंदे,डॉ.विकास जाधव,प्रियदर्शी मस्के,संतोष बोबडे,डॉ.प्रशांत दहिरे,आरती लिंबगावकर,पञकार रणजित डांगे,डॉ.प्रमोद समुद्रे,सुनिल व्यवहारे,आनंद सरवदे, सुशिल कुंबेफळकर, रमाकांत उजगरे, अनिकेत पोटभरे,विक्रमसेन आगळे, अतुल जोगदंड,विशाल लोंढे, वैभव ओव्हाळ,नंदकुमार पोटभरे,दिपक गुळभिले, अतुल ढगे, सचिन राठोड आदीं सहीत सर्व संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी जयंती महोत्सवास प्रा.एस.के. जोगदंड, कॉ.बब्रुवाहन पोटभरे,अॅड.शामभाऊ तांगडे, आधार मल्टीस्टेट अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष प्रा.डी.जी. धाकडे,अॅड.अनंतराव जगतकर,नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक संतोष शिनगारे,संतराम पारवे,प्रा.एस.डी.धाकडे,पुष्पाताई बगाडे आदींसहीत आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते, युवक, महिला,आदींची मोठया संखेने उपस्थिती होती


शिवरायांचे विचार आत्मसात करुन जगावर राज्य करा-राजेसाहेब देशमुख

कुंबेफळ येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव अंबाजोगाई (प्रतिनिधी) आजचा काळ हा तलवारीने नव्हे तर लेखणीने कर्तबगारी गाजविण्याचा आहे. तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी,युवकांनी लेखणी व पुस्तक यांचा वापर करुन आपले मन,मेंदू,मनगट व मस्तक बळकट करावे, विज्ञानवाद जोपासावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे.थोरा-मोठ्यांचे विचार अंगिकारावेत. आज आणि उद्याही श्रमाला प्रतिष्ठा मिळणार आहे.तेव्हा उद्योगी बना,सतत कार्यमग्न रहा.स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळून,कौटुंबिक … Read more

परळीत दिमाखदार वातावरणात पार पडला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा ; सोहळ्यातील प्रत्येक जोडप्याला अक्षयकुमारने दिली एक लाखाची मदत

ना. पंकजाताईंचे सामाजिक कार्य गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच – मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

जनसेवेचा वसा शेवटच्या श्वास असेपर्यंत सोडणार नाही – ना. पंकजाताई मुंडे

परळी दि. २२ : सनईचे मंजूळ स्वर, ब्रम्हवृदांच्या जयघोषातील मंगलाष्टका, फटाक्यांची आतिषबाजी व लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने आज सायंकाळी गोरज मुहूर्तावर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार हे सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.
सामाजिक जाणिवेतून सतत कार्यरत राहून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक स्फूर्तीला रचनात्मक जोड देत कौशल्याने काम करण्याची शिकवण आम्हाला दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिली आहे.राज्यात काम करताना हे सुत्र घेऊन राज्य सरकारने काम केले आहे. पंकजाताईच्या सामाजिक जाणिवाही गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच असुन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर मी येथे सेलेब्रिटी म्हणून नाही तर घरचे कार्य समजून आलो असे चित्रपट अभिनेता अक्षयकुमार यांनी सांगितले. दरम्यान, जनसेवेचा वसा शेवटचा श्वास असेपर्यंत सोडणार नाही अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी दिली.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात आज सर्वधर्मीय ७९ वधू – वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी यावेळी सोन्याचे मनी मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले. दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तोतला मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता .सकाळी मुस्लिम समाजातील तीन तर दुपारी बौध्द धर्मातील वीस वधू वरांचे विवाह त्या त्या धर्मातील रितीरिवाजानुसार उत्साहात पार पडले. सायंकाळी गोरज मुहूर्तावर उर्वरित विवाह उत्साहात संपन्न झाले. या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अक्षयकुमार, श्रीमती प्रज्ञाताई मुंडे, मंत्री महादेव जानकर, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, गोविंदराव केंद्रे, प्रवीण घुगे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


मुख्यमंत्री फडणवीस

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कांही जण आयुष्यात केवळ राजकारणच करतात.मात्र मुंडे साहेबांनी आम्हाला समाजकारण करण्याचं शिकवले. त्यानुसार आम्ही वाटचाल करीत आहोत. परळी ही पवित्र भूमी असून शुभारंभ आणि सुरवात करण्याचं ठिकाण आहे, पण कांही मंडळी या भूमीचा उपयोग समारोपासाठी करतात, परळीत जेंव्हा सुरुवात होते तेंव्हा ते देशभर जाते. जे परळीत समारोप करतात त्यांचा समारोप झाल्या शिवाय राहत नाही असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. रचनात्मक जोड देत राजकारणा पलिकडे जाऊन सामाजिक काम करण्याची शिकवण आम्हाला दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेली आहे.राज्यात काम करताना हे सुत्र घेऊन राज्य सरकारने काम केले आहे. पंकजाताईच्या सामाजिक जाणिवाही गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच असल्याचा गौरव यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.


अक्षयकुमार

अभिनेता अक्षय कुमार यावेळी म्हणाले की, आजची बीड येथील गर्दी पाहता परळी छोटं गाव नसून परळी हे मोठं शहर आहे. एवढ्या मोठ्या एकत्र लग्नास आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित जनसुदायासमोर मी पहिल्यांदा आलो आहे. आपले वैवाहिक जीवन आनंदी व्हावे.सुख शांती लक्ष्मी यावी असेल असे वाटत असेल तर पत्नी आणि आईची काळजी घ्यावी .मराठी मला खूप चांगली वाटते. इकडे परळीत सामूहिक लग्नाचा दरवर्षी हा कार्यक्रम वर्षातून दोनदा आयोजित करावा असे आवाहन ही अभिनेता अक्षयकुमार यांनी यावेळी केले.


ना. पंकजाताई मुंडे

ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या की, सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा वाली व वाणी होण्याची शिकवण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेली आहे. या शिकवणी पासून श्वासात श्वास असेपर्यंत दूर जाणार नाही. मला मुलगा आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने कन्यादानाचे भाग्य मला लाभले याचा आनंद होत आहे. सामान्यांच्या सेवेचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात सदैव प्रामाणिक काम करत राहू. आपले प्रेम,आशिर्वाद, साथ व सहकार्य असू द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक खा. डाॅ.प्रीतम मुंडे यांनी केले.


क्षणचित्र

▪गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास लाखोंचा जनसमुदाय होता. मैदानावर व मैदानाच्या बाहेर तुडूंब गर्दी होती.

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अक्षयकुमार यांचे शक्तीकुंज वसाहतीच्या मैदानावर हेलिकाॅप्टरने आगमन झाले. तिथे ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर एकाच गाडीतून ते कार्यक्रम स्थळी आले, तत्पूर्वी यशःश्री निवासस्थानी त्यांनी भेट दिली.

• शक्तीकुंज वसाहत ते विवाह स्थळापर्यंत नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा उभा राहून पाहूण्यांचे स्वागत केले.

▪ सतत दुष्काळ आणि अवर्षणाचा सामना करणाऱ्या कष्टकरी चेहऱ्यांवर या सोहळ्याने आनंद ओसंडून वाहत होता.

▪ये छोटी परली नही ,इतने सारे लोग एक साथ पहले कभी देखे नही या अक्षय कुमारच्या वाक्याने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट

▪अभिनेता अक्षय कुमारने सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वधू वरांना एक लाख रूपये गिफ्ट चेक दिला. आपल्या पत्नी व आईच्या नांवाने ही रक्कम एफडी करा असे आवाहन त्यांनी केले.

• शहीद जवानांच्या मदतीसाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘भारत के वीर’ अंतर्गत जमा झालेली एक कोटीचे धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

▪ अक्षयकुमार यांनी भाषणाला सुरवात करण्यापूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित लाखो नागरिकांनी दोन मिनीटं उभा राहून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

• दुपारी व-हाडींच्या लक्ष भोजनास सुरवात झाली आहे. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात हा सोहळा संपन्न करण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, भाजपचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेतले.