पाटोदा: चुंबळीफाटा येथे अपघाताचे सत्र चालूच

बीड़:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील चुंभळी फाटा येथील चौकाचे भिजत घोंगड़ किती दिवस राहील याचा नागरीकांना थांगपत्ता लागेना पैठण-पंढरपुर तसेच अहमदनगर -बीड़ रोड़ रस्याचे काम काही ठिकाणी वगळता पुर्णत्वा कडे गेले आहे.परंतु रस्ता चांगला झाल्या कारणाने ड़्रायव्हर यांना गाडीच्या वेगावर मर्यादा ठेवणे कठिण होऊन बसले आहे. राञी च्या वेळी रस्ता लांब सरळ आहे काय असे पाटोदा कड़ून चुंभळी फाटा कडे येताना दिसते.परंतु गाडीचा वेग कमी होईपर्यंत तर गाडी सरळ खड़्यात गाड़ेकर यांच्या शेतात जाऊन पडते. सहा महीन्यापासुन येथे खुप अपघात झाले आहेत जालन्याच्या नागरीकाला आपला जिव गमवावा लागला आहे.शुक्रवार पहाटे आज गंगाखेड़ येथील कुटुंब बालंबाल बचावले आहे.अजुन काही जिव गेल्यानंतर प्रशासन व गुत्तेदार यांना जाग येनार काय असा सवाल येथे उपस्थित होत आहे.

पाटोद्या कड़ून चुंभळी फाटा कड़े येताना अपघाताचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदार व पोलीस प्रशासनाने 100 मीटर वर आपले बॅरीकेट नागमोडी आकारात लावले तरच अपघात टळतील

बाबासाहेब ढेकळे (रहीवाशी चुंभळी फाटा)

मद्यधुंद लिपिक कैलास अनभुले कडून पत्रकारास विनाकारण शिवीगाळ , पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे लक्ष ?

अवैध दारूमुळे पत्रकारांसह सामान्यांना त्रास – डॉ ढवळे

पाटोदा दि.०३:आठवडा विशेष टीम― भर कोरोना काळात मद्य ढोसून पत्रकाराला शिव्या देण्याचे घाणेरडे कृत्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका गावातील श्री जगदंबा विद्यामंदीर येथील लिपिक कैलास बाबुराव अनभुले याने शनिवार दि.०१ मे २०२१ च्या रात्री ९.३० वाजताच्या सुमारास केले आहे.अशा शिवीगाळ करणाऱ्या प्रवृत्तीचा वावर जास्त वाढल्यामुळे पत्रकारांना भर कोरोना काळात पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेची सेवा करता येत नाही.पोलीस प्रशासनाने देखील याकडे लक्ष दिले पाहिजे व तात्काळ कारवाई केली पाहिजे.

सविस्तर वृत्त असे की ,पाटोदा तालुक्यातील पत्रकार नानासाहेब डिडुळ यांना शनिवारी रात्री धनगरजवळका येथील कैलास अनभुले नामक लिपिकाने मद्य प्राशन करून रात्री साडेनऊ च्या आसपास तब्बल एक ते दिड तास शिविगाळ केली आहे.पोलीस प्रशासन या गोष्टीला गांभिर्याने घ्यावे व अशा इसमाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत.

जिल्ह्यातील अवैध दारूमुळे सामान्यांना नाहक त्रास – डॉ गणेश ढवळे

पाटोदा तालुक्यातील अवैध दारू विक्री पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करावी यासाठी पोलीस अधीक्षक बीड, जिल्हाधिकारी बीड यांना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी केली असून दारू विक्रीमुळे सर्वसामान्य माणसांना दारूड्यांचा नाहक मानसिक त्रास सहन करावा तर लागतोच परंतु त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका सुद्धा आधिक वाढला आहे, त्यामुळेच संबधित प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी
– डॉ गणेश ढवळे

पोलीस स्टेशन चे बिट अंमलदार यांनी दिला पोस्टाने तक्रार करण्याचा सल्ला

बीट अंमलदार आदीनाथ तांदळे यांच्या कडे तक्रार देण्याकरता गेले असता त्यांनी पोस्टाने तक्रार करा असा सल्ला दिला
– नानासाहेब डिडुळ

शिविगाळ खपवून घेणार नाही – सचिन मेघडंबर

माझ्या अनुसुचीत जातीच्या लोकांना कोणी विनाकारण शिवीगाळ केली तर खपऊन घेणार नाही अॅट्राशिटी अॅक्ट नुसार कारवाई करण्यात येईल.
― सचिन मेघड़ंबर (वंचित बहुजन आघाडी महासचिव बीड़ जिल्हा)

बीड: मांजरसुंबा चौकात एसटीने रिक्षाला दिली धडक

मांजरसुंबा/बीड दि.२०:गणेश ढवळे लिंबागणेशकर― आज दि.२० ऑक्टोबर २०२० मंगळवार रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटे मांजरसुंबा चौकात एस टी बस आळंदी पुणे-गंगाखेड क्रमांक एम एच १३-७९२४ ने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा क्रमांक एमएच -२३ एच-८१५२ ला धडक दिली. सुदैवाने जिवितहानी नाही, दोन महिलांना मार लागला आहे व त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे.

सोयगाव: सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावर बनोटी जवळ दुचाकीचा अपघात ,२ जण ठार

सोयगाव/औरंगाबाद:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव- चाळीसगाव राज्य मार्ग क्रमांक २४ रस्त्यावर बनोटी (ता.सोयगाव) गावापासून एका किलोमीटर अंतरावरील वळणावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
शेवरी (ता. चाळीसगाव) येथील चंद्रकात बद्री फणशे (वय३५) पत्नी अरुणा चंद्रकात फणशे (वय ३०)आणि मुलगा कार्तिक चंद्रकांत फणशे (वय ०५)तिघे जण हिरोहोंडा फॅशन प्रो गाडी क्रमांक एमएच १९एएस ०६४७ ने बनोटी येथील नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी येत होत तर बनोटी येथील बन्सी हरचंद चौधरी (वय ४०)आणि संदीप चंपालाल चौधरी (वय३२) बजाज सीटी गाडी क्रमांक एमएच १९ एके ०७०१ दोघे जण नागद कडे वैयक्तिक कामासाठी जात असतांना बनोटी गावापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर दोन्हीही दुचाकी समासमोर येवुन जोरात धडकल्याने दुचाकीवरील तीन जण हवेत उडुन आडव्या पडलेल्या दुचाकीवर मरणासन्न अवस्थेत पडले तर दोन जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघातात दुचाकींचा जोरात आवाज झाल्याने आसपासच्या शेतातील शेतकरी तसेच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाल्याने काही काळ वहातूक खोळबुन वहानांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी उपसरपंच सागर खैरनार, स्वप्नील सोनवणे तसेच बनोटी येथील युवक मदतीला धावून येत पाचही जणांना बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमउपचार करीत पाचोरा (जि जळगाव) येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता बनोटी येथील बेचाळीस वर्षीय बन्सी हरचंद चौधरी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पाच वर्षीय कार्तिकची तब्बेत खालावल्याने जळगाव येथील खाजगी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तिघांची तब्बेत चिंताजनक असुन पाचोरा येथील दवाखान्यात उपचार चालू अाहेत. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली बनोटी पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल सुभाष पवार, विकास दुबेले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे..

रस्त्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढल्याने अपघातात वाढ

राज्य रस्ता क्रं.२४ सोयगाव चाळीसगाव रस्त्याच्या दुर्तफा वाढलेले गवत आणि झुडपांमुळे तसेच अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर समोरुन येणार्‍या वहानांचा अंदाज येत नसल्याने वहाने समोरासमोर धडकण्याच्या घटनेत वाढ झालेली असुन नुकतेच बहुलखेडा गावाजवळ अशाच अपघातात एका जणाला प्राण गमवावे लागले आहे.

वानगावफाटा येथिल अपघातात वयोवृद्ध जागीच ठार

मांजरसुंबा/बीड:डॉ.गणेश ढवळे
आज दि, ७ ऑक्टोबर वार बुधवार रोजी सकाळी १२:१५ वाजता वयोवृद्ध
किसन शंकर वाघमारे वय ६६ वर्षे राहणार साखरे बोरगाव ता, जि, बीड . हे वानगावफाटा येथे बसची वाट पाहत असताना कंटेनरने( गाडी नंबर एच. आर. ३८ वाय ८०६८) गाडी रिव्हर्स घेन्याच्या नादात वाघमारेंना उडवले, त्यात ते जागीच ठार झाले,
लिंबागणेश पोलीस चौकीचे पो.हे.१२४१ सुरेश पारधी व सोनावणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला, कंटेनरचा ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला आहे, दुपारी शवविच्छेदन झाले, पुढील तपास स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे . पारधी करत आहेत, साखरे बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे.

परळी: धर्मापुरी जवळ अपघातात एक जण जागीच ठार

परळी:अशोक देवकते― भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटर सायकलच्या धडकेत मोटर-सायकलवरील तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात रविवारी संध्याकाळी परळी – धर्मापुरी रोडवर सारडगाव जवळ घडला विजय बनसोडे (वय ३२, रा.परळी असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.

विजय आणि त्यांचा मित्र नितीन हे दोघे दुचाकीवरून धर्मापुरीकडे निघाले होते. ते सारडगाव जवळ आले असतांना समोरून भरधाव वेगाने परळीकडे जात असलेल्या ट्रकने (एमएच ११ एएल ७८८८) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विजय बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर नितीन गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला आहे पुढील तपास परळी ग्रामीण चे पोलीस करत आहेत.

बीड जिल्हा: मयतीस जाणाऱ्या इसमावर हल्ला करणाऱ्या आरोपीस जेरबंद

बीड:आठवडा विशेष टीम― दि. 16-09-2020 रोजी 21:45 वा. सुमारास यातील फिर्यादी निजामुद्दीन खमरोद्दीन काझी वय 49 वर्षे रा. कसबा विभाग धारुर हे त्यांचे मित्र अब्दुल अफीज हे मरण पावले असल्याने त्यांचे मयतीस साथीदारासह डस्टर गाडी क्रमांक एम.एच.-42 एक्स 4275 ने धारुर येथुन केज मार्गे अंबाजोगाई कडे जात असतांना होळ येथील नदी पुलावर कार बंद पडली म्हणुन कारचे बोनट उघडुन पाहीले तर कुलंट (पाणी) संपल्याने त्यांचे सोबतचे सय्यद लाईक, सोहेल तांबोळी हे पाणी आणण्यासाठी एका घराकडे गेले व फिर्यादी व साक्षीदार हे गाडीजवळ थांबले असता एक मोटार सायकलवर अज्ञात दोन इसम आले त्यांच्यात किरकोळ कारणा वरुन बाचाबची झाली व शिवीगाळ केली. फिर्यादी व साक्षीदार यांनी शिवीगाळ करु नका असे म्हणताच त्यांनी त्यांचे मोबाईलवरुन फोन करुन इतर चार साथीदारांना बोलावुन घेऊन त्यांचे हातातील लाकडी दांडयाने व दगडाने जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी सोहेल तांबोळी यास डोकीत तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करुन गंभीर दुखापत केली आणि डस्टर गाडीवर दगडफेक करुन काचा फोडुन गाडीचे नुकसान केले. सदरचे आरोपो हे हिंदु समाजाचे आहेत, वैगेरे मचकुराचे फिर्यादवरुन पो.स्टे. युसुफवडगांव येथे गु.र.नं. 190:2020 कलम 307,324,323,147,148,149,504,427 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरचा गुन्हा हिंदु मुस्लीम अशा दोन धर्माशी संबधीत व्यक्तीमध्ये झाला असल्याने, गुन्हयाचे घटनास्थळी मा. पोलीस अधिक्षक साहेब, बीड, अ.पो.अ. मॅडम, अंबाजोगाई, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, बीड, स.पो.नि. पो.स्टे. युसुफवडगांव यांनी भेट दिली. मा. पोलीस अधिक्षक साहेब, बीड यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पो.नि. स्था.गु.शा. व सपोनि यु.वडगांव यांना देऊन आरोपी शोध कामी वेगवेगळे पथके तयार करुन रवाना केली. त्यादरम्यान स्था. गु.शा.चे तसेच पो.स्टे.चे अधीकारी व कर्मचारी यांनी 15 संशयीत लोकांना ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस केली. त्यादरम्यान पो.नि.स्था गु.शा.यांनी गोपनीय माहीती काढून त्यांना मिळालेल्या माहीती वरुन दोन संशयीत इसमांना होळ येथुन ताब्यात घेऊन त्यांना नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1. नारायण धनराज घुगे, 2. राहुल तुकाराम घुगे दोन्ही रा. होळ ता. केज असे सांगितले. त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे इतर चार साथीदारसह गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास सपोनि आनंद झोटे पो.स्टे. यु.वडगांव करीत आहेत.उर्वरीत आरोपींना अटक करणेसाठी स्था.गु.शा. व पो.स्टे.ची पथके रवाना केली आहेत. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हयातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री.हर्ष ए पोद्दार, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती, स्वाती भोर, उप विभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई श्री. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री.भारत राऊत, सपोनि आनंद झोटे, पो.स्टे. यु.वडगांव, पो.उप.नि. श्री. संतोष जोंधळे, पोउपनि श्री गोविंद एकीलवाले, श्रीमंत उबाळे, गोरख मिसाळ, बालाजी दराडे, कैलास ठोंबरे, प्रसाद कदम, सतिष कातखडे, मनोज वाघ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, असेफ शेख, सोमनाथ गायवाड, वाहन चालक मुकुंद सूस्कर, राजु वंजारे, अतुल हराळे यांनी केलेली आहे.

बीड: लिंबागणेश बसस्थानकासमोर केळीचा ट्रक पलटला ,जिवितहानी नाही

दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे,अपघातास निमंत्रण ठरत आहे, केळी भरलेला ट्रक उलटला ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना लेखी तक्रार,रास्ता रोकोचा ईशारा – डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश दि.१२: आज दि. १२/०८/२०२० वार बुधवार रोजी सकाळी ४ वा.लिंबागणेश बसस्थानक येथे ड्रायव्हर अफसर आली महाराष्ट्र बारामती येथुन केळींनी भरलेला ट्रक. गाडी नंबर यु.पी. ७२टी ९१३२ उत्तरप्रदेश-बिहार याठीकाणी जात असताना पहाटे ४ वा. लिंबागणेश बसस्थानक येथे दुभाजकासाठी खोदलेल्या खड्ड्यात चाक गुंतुन पलटला.सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ड्रायव्हरला किरकोळ मार लागला आहे.

दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे, अपघातास निमंत्रण मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक ५४८-डी या रसत्याचे काम ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश या ठिकाणी दुभाजकाचे काम अपुर्ण असुन आणि पथदिवे सुद्धा न लावल्यामुळे दुभाजकासाठी खोदलेला खड्डा दिसतच नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

मांजरसुंभा-पाटोदा रस्ता , दुभाजक, पथदिवे, गतिरोधक आदिसाठी मा.नितिन गडकरी यांना लेखी निवेदन – डॉ.गणेश ढवळे

मांजरसुंभा ते चुंभळी फाटा या ३३ कीलोमीटर रस्त्याचे १६० कोटी रुपये किंमतीच्या रस्त्याचे काम हुले कन्स्ट्क्शन मार्फत दोन वर्षांमध्ये बंधनकारक असताना साडे ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश , मुळुक, वैद्यकिन्ही या गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मौजे लिंबागणेश,वैद्यकिन्ही, पाटोदा याठिकाणी दुभाजकाचे काम रखडलेले , असुन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. याविषयी रखडलेले काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे यासाठी दि.२७/०८/२०२० रोजी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

#Accident बीड: अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांड्याजवळील भिषण अपघातात तिघे ठार

अंबाजोगाई दि.०८:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांड्यानजिक झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी (दि.८ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागनाथ महादेव गायके (35), वसंत जनार्दन गायके (वय 45) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (23) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच 13 बीडी 5684) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या टिपरने (एमएच 25 यु 2444) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.लॉकडाऊनमध्येही वाळूची अवैध वाहतूक बिनघोरपणे सुरु आहे. लॉकडाऊन सुरु असतानाही वाळू माफिया मात्र कुठलेही निर्बंध पाळत नसल्याचे आजच्या अपघाताने पुन्हा एकदा उघड झाले असले तरी कडक कारवाईची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पोलिसांना अवैध दारू सापडत नव्हती ? पहा ‘यांनी’ स्वतः डोंगरदऱ्यात जाऊन शोधली गावठीदारू

वाघिरा गावातील गावठी दारूचा पर्दाफाश, पाटोदा पोलिसांना छापे मारुन न सापडणारी दारू सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी शोधली

पाटोदा दि.०६:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा या गावात अवैध गावठी दारूच्या वाढत्या प्रमाणामुळे पुरूष व लहान मुले व्यसनापायी बरबाद होताना पाहुन महिलांनी दि. १४/०७/२०२० रोजी पाटोदा पोलिस ठाणे येथील स.पो.नि. सिद्धार्थ माने यांना लेखी निवेदन दिले,त्यांनी छापा टाकला परंतु दारु सापडली नाही.त्यानंतर दारु विक्रेत्यांचा महिलांना त्रास वाढला, शिविगाळ करणे, धमकी देणे, आदि.प्रकार वाढल्यामुळे व दारूबंदी न झाल्याने दि. १७/०७/२०२० रोजी बीड येथे जाऊन पोलिस अधीक्षक बीड व दारूबंदी शाखा यांना लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर दारुबंदी शाखा बीड यांनी छापा टाकला परंतु त्यांना दारू सापडली नाही.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=313138613135624&id=100033184637265?sfnsn=wiwspwa&extid=FVk4djNJQSGWWRn5&d=w&vh=i

पोलिसच घरभेदी, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच,महिलांचा आरोप―

वाघिरा ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य यांनी पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची छुपीयूती आहे, छापा टाकायला येण्यापूर्वीच दारूविक्रेत्यांना मोबाईल फोन वरून कल्पना दिली जाते.त्यामुळे छापा टाकल्यानंतर मूद्देमाल सापडत नाही, व महिलांना दारू विक्रेत्यांनी त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.

पोलिसांना न सापडणारी दारू शोधली, महिलांना शिविगाळ व धमक्या वाढलेल्या, गुन्हे दाखल करण्यासाठी रास्तारोको ― डॉ.गणेश ढवळे

दारूविक्रेते यांच्याकडुन महिलांना अर्वाच्च शिवीगाळ व मानसिक ताण तसेच धमकीचे प्रकार वाढल्याने पाटोदा पोलिस ठाणे येथील स.पो.नि. सिद्धार्थ माने यांना तक्रार केली असता ५-६ वेळा छापा टाकला परंतु दारू आढळुन आली नाही,व त्यांच्यावर कारवाई केली आहे,असे सांगितले त्यानंतर आज दि. ०६/०८/२०२० वार गुरुवार रोजी सकाळी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी स्वत: वाघिरा शिवारातील डोंगरदऱ्यात जाऊन दारू निर्मिती करणाऱ्या दत्ता काळे यांचे दोन बरल दारुंचे चित्रिकरण व छायाचित्र प्रसारमाध्यमात पाठवले. त्यामुळे आज सकाळी पुन्हा दत्ता काळे यांनी मनिषा भागवत जोगदंड व भागवत जोगदंड यांनी दारूबंदीसाठी लेखी तक्रार दाखल केल्यामुळे व डॉ.गणेश ढवळे यांना कल्पना दिल्यामुळे अर्वाच्च शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आज पाटोदा पोलिस ठाणे येथे जाऊन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी संबंधित दारु निर्माते,व विक्रेते यांच्यावर कोव्हीड-१९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.तसेच मनिषा भागवत जोगदंड व भागवत जोगदंड यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणा-या दत्ता काळे व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी लेखी मागणी करत दि. १० ऑगस्ट रोजी वाघिरा फाटा येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र सायबरची उल्लेखनीय कामगिरी सुरूच; ५७८ गुन्हे दाखल; २९२ जणांना अटक

मुंबई दि. ३-  महामारीच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. २ ऑगस्टपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप-  २१२ गुन्हे दाखल ■ फेसबुक … Read more

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २० हजार गुन्हे दाखल; ३२ हजार पेक्षा अधिक व्यक्तींना अटक

मुंबई दि.३: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २० हजार २५६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४६७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १८ कोटी ३६लाख ३९ हजार ४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते … Read more

…या अभिनेत्याने केली सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी.बी.आय मार्फत चौकशीची मागणी

मुंबई, दि.३१:आठवडा विशेष टीम― अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आसिफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते.

महाराष्ट्रात लॉकडाऊन काळात ५७० सायबर गुन्हे दाखल; २९० जणांना अटक

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. २९ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप- २११ गुन्हे ■ फेसबुक … Read more

पाटोदा नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले यांना लाच घेताना अटक

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व त्यांच्या गाडी चालकास 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी ने रंगेहात पकडले ही मोठी कारवाई आज दिनांक 20 जुलै 2020 रोजी रात्री 7 च्या दरम्यान करण्यात आले याची प्राथमिक माहिती आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे समजते की तक्रारदाराचे नगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील बील काढण्यासाठी पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले यांनी लाचेची मागणी केली होती आज मुख्याधिकारी व चालक प्रदीप वाघ यांना 60 हजारांची लाच स्विकरताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले सदरील कारवाई लाचलुचपत विभागाचे अधिकारी हंनपुडे पाटील व त्यांच्या टीमने केली आहे केली आहे.

Crime बीड: केज तालुक्यातील लाडेगाव परिसरात खून

केज दि.१८ जुलै:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील लाडेगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.बाबासाहेब चंद्रभान लाड (वय ३९) असे मयताचे नाव आहे.अंबाजोगाई रोडवरील लाडेगाव परिसरातील अर्जुन लाड यांच्या शेतात शनिवारी (दि.१८) सकाळी मृतदेह आढळून आला. यावेळी मयताच्या अंगावर जखमा आढळून आल्या. अनैतिक संबधातून हा खून झाला असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असुन आठ ते दहा जणांनी मिळून त्याचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि.आनंद झोटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.