पाटोदा: चुंबळीफाटा येथे अपघाताचे सत्र चालूच

बीड़:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील चुंभळी फाटा येथील चौकाचे भिजत घोंगड़ किती दिवस राहील याचा नागरीकांना थांगपत्ता लागेना पैठण-पंढरपुर तसेच अहमदनगर -बीड़ रोड़ रस्याचे काम काही ठिकाणी वगळता पुर्णत्वा कडे गेले आहे.परंतु रस्ता चांगला झाल्या कारणाने ड़्रायव्हर यांना गाडीच्या वेगावर मर्यादा ठेवणे कठिण होऊन बसले आहे. राञी च्या वेळी रस्ता लांब सरळ आहे काय असे पाटोदा कड़ून चुंभळी फाटा कडे येताना दिसते.परंतु गाडीचा वेग कमी होईपर्यंत तर गाडी सरळ खड़्यात गाड़ेकर यांच्या शेतात जाऊन पडते. सहा महीन्यापासुन येथे खुप अपघात झाले आहेत जालन्याच्या नागरीकाला आपला जिव गमवावा लागला आहे.शुक्रवार पहाटे आज गंगाखेड़ येथील कुटुंब बालंबाल बचावले आहे.अजुन काही जिव गेल्यानंतर प्रशासन व गुत्तेदार यांना जाग येनार काय असा सवाल येथे उपस्थित होत आहे.

पाटोद्या कड़ून चुंभळी फाटा कड़े येताना अपघाताचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदार व पोलीस प्रशासनाने 100 मीटर वर आपले बॅरीकेट नागमोडी आकारात लावले तरच अपघात टळतील

बाबासाहेब ढेकळे (रहीवाशी चुंभळी फाटा)

बीड: मांजरसुंबा चौकात एसटीने रिक्षाला दिली धडक

मांजरसुंबा/बीड दि.२०:गणेश ढवळे लिंबागणेशकर― आज दि.२० ऑक्टोबर २०२० मंगळवार रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटे मांजरसुंबा चौकात एस टी बस आळंदी पुणे-गंगाखेड क्रमांक एम एच १३-७९२४ ने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा क्रमांक एमएच -२३ एच-८१५२ ला धडक दिली. सुदैवाने जिवितहानी नाही, दोन महिलांना मार लागला आहे व त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे.

सोयगाव: सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावर बनोटी जवळ दुचाकीचा अपघात ,२ जण ठार

सोयगाव/औरंगाबाद:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव- चाळीसगाव राज्य मार्ग क्रमांक २४ रस्त्यावर बनोटी (ता.सोयगाव) गावापासून एका किलोमीटर अंतरावरील वळणावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१४) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
शेवरी (ता. चाळीसगाव) येथील चंद्रकात बद्री फणशे (वय३५) पत्नी अरुणा चंद्रकात फणशे (वय ३०)आणि मुलगा कार्तिक चंद्रकांत फणशे (वय ०५)तिघे जण हिरोहोंडा फॅशन प्रो गाडी क्रमांक एमएच १९एएस ०६४७ ने बनोटी येथील नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी येत होत तर बनोटी येथील बन्सी हरचंद चौधरी (वय ४०)आणि संदीप चंपालाल चौधरी (वय३२) बजाज सीटी गाडी क्रमांक एमएच १९ एके ०७०१ दोघे जण नागद कडे वैयक्तिक कामासाठी जात असतांना बनोटी गावापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर दोन्हीही दुचाकी समासमोर येवुन जोरात धडकल्याने दुचाकीवरील तीन जण हवेत उडुन आडव्या पडलेल्या दुचाकीवर मरणासन्न अवस्थेत पडले तर दोन जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघातात दुचाकींचा जोरात आवाज झाल्याने आसपासच्या शेतातील शेतकरी तसेच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाल्याने काही काळ वहातूक खोळबुन वहानांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी उपसरपंच सागर खैरनार, स्वप्नील सोनवणे तसेच बनोटी येथील युवक मदतीला धावून येत पाचही जणांना बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमउपचार करीत पाचोरा (जि जळगाव) येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता बनोटी येथील बेचाळीस वर्षीय बन्सी हरचंद चौधरी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पाच वर्षीय कार्तिकची तब्बेत खालावल्याने जळगाव येथील खाजगी दवाखान्यात नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तिघांची तब्बेत चिंताजनक असुन पाचोरा येथील दवाखान्यात उपचार चालू अाहेत. पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाली बनोटी पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल सुभाष पवार, विकास दुबेले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे..

रस्त्याच्या दुतर्फा गवत, झुडपे वाढल्याने अपघातात वाढ

राज्य रस्ता क्रं.२४ सोयगाव चाळीसगाव रस्त्याच्या दुर्तफा वाढलेले गवत आणि झुडपांमुळे तसेच अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर समोरुन येणार्‍या वहानांचा अंदाज येत नसल्याने वहाने समोरासमोर धडकण्याच्या घटनेत वाढ झालेली असुन नुकतेच बहुलखेडा गावाजवळ अशाच अपघातात एका जणाला प्राण गमवावे लागले आहे.

वानगावफाटा येथिल अपघातात वयोवृद्ध जागीच ठार

मांजरसुंबा/बीड:डॉ.गणेश ढवळे
आज दि, ७ ऑक्टोबर वार बुधवार रोजी सकाळी १२:१५ वाजता वयोवृद्ध
किसन शंकर वाघमारे वय ६६ वर्षे राहणार साखरे बोरगाव ता, जि, बीड . हे वानगावफाटा येथे बसची वाट पाहत असताना कंटेनरने( गाडी नंबर एच. आर. ३८ वाय ८०६८) गाडी रिव्हर्स घेन्याच्या नादात वाघमारेंना उडवले, त्यात ते जागीच ठार झाले,
लिंबागणेश पोलीस चौकीचे पो.हे.१२४१ सुरेश पारधी व सोनावणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला, कंटेनरचा ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला आहे, दुपारी शवविच्छेदन झाले, पुढील तपास स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे . पारधी करत आहेत, साखरे बोरगाव गावावर शोककळा पसरली आहे.

परळी: धर्मापुरी जवळ अपघातात एक जण जागीच ठार

परळी:अशोक देवकते― भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटर सायकलच्या धडकेत मोटर-सायकलवरील तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात रविवारी संध्याकाळी परळी – धर्मापुरी रोडवर सारडगाव जवळ घडला विजय बनसोडे (वय ३२, रा.परळी असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.

विजय आणि त्यांचा मित्र नितीन हे दोघे दुचाकीवरून धर्मापुरीकडे निघाले होते. ते सारडगाव जवळ आले असतांना समोरून भरधाव वेगाने परळीकडे जात असलेल्या ट्रकने (एमएच ११ एएल ७८८८) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विजय बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर नितीन गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर अंबाजोगाईच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला आहे पुढील तपास परळी ग्रामीण चे पोलीस करत आहेत.

बीड: लिंबागणेश बसस्थानकासमोर केळीचा ट्रक पलटला ,जिवितहानी नाही

दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे,अपघातास निमंत्रण ठरत आहे, केळी भरलेला ट्रक उलटला ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना लेखी तक्रार,रास्ता रोकोचा ईशारा – डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश दि.१२: आज दि. १२/०८/२०२० वार बुधवार रोजी सकाळी ४ वा.लिंबागणेश बसस्थानक येथे ड्रायव्हर अफसर आली महाराष्ट्र बारामती येथुन केळींनी भरलेला ट्रक. गाडी नंबर यु.पी. ७२टी ९१३२ उत्तरप्रदेश-बिहार याठीकाणी जात असताना पहाटे ४ वा. लिंबागणेश बसस्थानक येथे दुभाजकासाठी खोदलेल्या खड्ड्यात चाक गुंतुन पलटला.सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ड्रायव्हरला किरकोळ मार लागला आहे.

दुभाजकाचे रखडलेले काम , पथदिवे नसणे, अपघातास निमंत्रण मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक ५४८-डी या रसत्याचे काम ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश या ठिकाणी दुभाजकाचे काम अपुर्ण असुन आणि पथदिवे सुद्धा न लावल्यामुळे दुभाजकासाठी खोदलेला खड्डा दिसतच नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

मांजरसुंभा-पाटोदा रस्ता , दुभाजक, पथदिवे, गतिरोधक आदिसाठी मा.नितिन गडकरी यांना लेखी निवेदन – डॉ.गणेश ढवळे

मांजरसुंभा ते चुंभळी फाटा या ३३ कीलोमीटर रस्त्याचे १६० कोटी रुपये किंमतीच्या रस्त्याचे काम हुले कन्स्ट्क्शन मार्फत दोन वर्षांमध्ये बंधनकारक असताना साडे ३ वर्षांपासून रखडलेले आहे. लिंबागणेश , मुळुक, वैद्यकिन्ही या गावात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मौजे लिंबागणेश,वैद्यकिन्ही, पाटोदा याठिकाणी दुभाजकाचे काम रखडलेले , असुन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. याविषयी रखडलेले काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे यासाठी दि.२७/०८/२०२० रोजी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

#Accident बीड: अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांड्याजवळील भिषण अपघातात तिघे ठार

अंबाजोगाई दि.०८:आठवडा विशेष टीम― अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांड्यानजिक झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी (दि.८ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागनाथ महादेव गायके (35), वसंत जनार्दन गायके (वय 45) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (23) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच 13 बीडी 5684) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या टिपरने (एमएच 25 यु 2444) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.लॉकडाऊनमध्येही वाळूची अवैध वाहतूक बिनघोरपणे सुरु आहे. लॉकडाऊन सुरु असतानाही वाळू माफिया मात्र कुठलेही निर्बंध पाळत नसल्याचे आजच्या अपघाताने पुन्हा एकदा उघड झाले असले तरी कडक कारवाईची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सौताडा घाटात अपघात एक ठार ; संजय कोठारी आणि सुनील कोठारी या दोन्ही बंधूंनी अपघात ग्रस्तांना केली मदत

पाटोदा दि.२१:नानासाहेब डिडुळ
जामखेड पासून सात किलोमीटर अंतरावर सौताडा घाटामध्ये एक ट्रक साखर भरलेले पलटी होऊन त्यामध्ये लायक शब्बीर पठाण वय 43 मुक्काम पोस्ट ममदापूर (पाटोदा )तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड हा जागीच ठार झाला तर अशोक तोरडमल मुक्काम पोस्ट मामदापुर (पाटोदा) तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड वय २४ हा जखमी झाला आहे मालकाचे नाव आमिर चॉदखा पठाण मुक्काम पोस्ट ममदापूर पाटोदा तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड एम एच ४४ ८९५५ ट्रक रेनापुर शुगर कारखाना अंबाजोगाई येथून भरून पनवेल येथे टेककेअर एअर हाऊसला येथे साखर घेऊन चालला होता सौताडा घाटामध्ये रोडचा अंदाज न आल्याने गाडी घाटात दहा फुट खोल खड्ड्यात पलटी झाली यावेळी गाडीच्या किन्नर साईडला पडल्यामुळे तो वाचला आणि ड्रायव्हर स्टेअरिंग मध्ये अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि त्यांचे बंधू मा.सरपंच सुनील कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावले असता जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना घटनेची माहिती दिली त्या आडकलेल्या माणसाला संबंधिताच्या मदतीने पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे आणि यांच्या सहकार्याचे मदतीने मृतदेह ट्रकच्या आतील काही पार्ट तोडून बाहेर काढण्यात आला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते मृतदेह कोठारी यांनी जामखेड येथील सरकारी दवाखान्यात आणून दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे यावेळी महेश मोहोळकर ,वैभव म्हेञे, असलम शेख दत्ता वाराट आदींनी मदत केली यावेळी जखमींमध्ये अशोक तोरडमल मुक्काम पोस्ट पाटोदा तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड येथील असून त्याची तब्येत चांगली आहे
मृत व्यक्तीचा पोलीस पंचनामा करून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दिले.

Updated बीड : मुळुकफाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार

लिंबागणेश दि.१५:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे मुळुक पुलाजवळ अपघात झाला आहे.अपघातात २ ठार आणि १ गंभीर जखमी व्यक्ती मृत घोषित करण्यात आला आहे.
अपघातात ठार व्यक्ति १) संजय बाळु सोनावणे वय ३५ वर्षे , २) बंकट बाबु मोरे वय ४५ रा. मसेवाडी ता.बीड जि बीड. आणि गोरख बबन मोरे वय ३२ हे गंभीर जखमी होते.पोलिस प्रशासनाने जखमींना लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते व जखमीला मृत घोषित करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की,

  1. गोरख बबन मोरे वय ३० वर्ष अविवाहित , व्यवसाय शेती ,पश्चात आई, वडील, १ भाऊ ,१ बहिण
  2. बंकट बाबूराव मोरे वय ५० वर्षे विवाहित ,१ मुलगा व १ मुलगी त्यांची लग्न झालेली आहेत वडील आहेत,आई हयात नाही.
  3. संजय बाळु सोनवणे वय ४० वर्षे विवाहीत २ मुली वय ११ वर्षे आणि ७ वर्षे ,१ मुलगा बालवाडीत

यापैकी दोघे गोरख बबन मोरे आणि बंकट बाबूराव मोरे हे लग्न समारंभांवरून मोटार सायकल वरुन गावी मसेवाडी येथे परत येत होते.

लिंबागणेश याठिकाणी संजय बाळु सोनावणे यांची भेट झाली. चहापाणी झाल्यावर तिघेही एकाच मोटार सायकल वर बसुन मसेवाडी कडे निघाले वेळ दुपारी पावने दोन च्या सुमारास मुळुक गावाजवळ पुलाजवळ बीड येथुन पांढऱ्या स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिली. यात स्विफ्ट कार दोन पलटी खाऊन रस्त्याच्या बाजुला पडली. मोटार सायकल वरील बंकट बाबुराव मोरे व संजय बाळु सोनावणे जागीच ठार झाले.

तिसरा गंभीर अवस्थेत लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठीकाणी तपासणी केल्यानंतर डॉ.रूपाली राऊत वैद्यकीय अधिकारी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी जखमी गोरख बबन मोरे यांना मृत घोषित केले.

घटना स्थळावर नेकनुर पोलिस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आणि त्यांची टीम व लिंबागणेश येथिल पोलिस चौकीतील कर्मचारी उपस्थित होते.
सध्या लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टमच्या तयारीत आहेत. सध्या पोलीस कर्मचारी मृत व्यक्ती वरील जखमा आदि.ची नोंद करत आहेत.

स्विफ्ट गाडीतील दोघेही मद्यधुंद अवस्थेत आहेत. नेकनुर पोलिस ठाणे येथे त्यांना नेण्यात आले आहे.


मांजरसुंबा घाटात पथदिवे नसल्याने लुटमारीचे प्रकार ; तात्काळ पथदिवे बसवण्याची डॉ.गणेश ढवळे यांची मागणी

मांजरसुंबा (बीड):आठवडा विशेष टीम― सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग वरील मांजरसुंभा घाटामध्ये पोईचा देव फाटा ते कोळवाडी या एक ते दिड किलोमीटर अंतरावरील घाटामध्ये पथदिवे लावलेलेच नसल्यामुळे अंधारात लुटमारीचे प्रकार व पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या संभाव्य शक्यतेमुळे तात्काळ पथदीवे बसवण्यात यावेत अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी लेखी निवेदन ई-मेलद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांना दिले आहे.

मांजरसुंबा घाटात लुटमार

यापुर्वीही नेकनुर पोलिस ठाण्यात मांजरसुंभा घाटात ट्रकमधुन सामान चोरी जाणे ,अथवा वाहने अडवून लुटमार करणे अशा घटना घडलेल्या आहेत.

पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे होणारे अपघात

मोठमोठाले डोंगर कोरून नविन रस्तामार्ग बनवल्यामुळे व सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामूळे त्या ठिकाणी लोखंडी जाळीची संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर रात्रि अपरात्री दरड कोसळली तर पथदिव्यांच्या प्रकाशात दिसून येईल.

नितिनजी गडकरी , केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांना निवेदन

जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत या प्रकरणी नितिनजी गडकरी, केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री , मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, रस्तेविकासमंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


गोंदिया: ठेकेदाराच्या लापरवाही मुळे घडली दुर्घटना बाईक चालकाचे हात निकामी

आमगाव दि.०९:बिंबिसार शहारे आमगाव तालुक्यातील कोपीटोला चिमणटोला या परिसरात सध्या वनविभागाकडून नव्या रोपटे च्या सुरक्षेकरिता तारेचे कुंपण लावण्याचे काम कॉन्ट्रॅक्ट दाराच्या मार्फत करण्यात येत आहे। हे काम सुरू असताना कामाचे साहित्य खांब ठेकेदाराने हलगर्जीपणा करत रोडावर ठेवले असल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे.

वाहन चालक कोपीटोला कडून चिमनटोल्या च्या दिशेने जात असतांनी समोरून चार चाकी गाडी येत असल्यामुळे टुविलर चालकानी नाईलाजाने रोडलगत ठेवलेले खांबाला धडक दिल्यामुळे टुविलर चालकाचे उजवे हात पूर्णपणे निकामी झाले या घटनेची माहिती मिळताच रुग्णाचे नातेवाईकानी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णाला गोंदिया प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेले.चालकाचे नाव सुरेंद्र सिरसाम असून गोरेगाव तालुक्यातील लिबा येथील रहिवासी असून आपल्या आजोबाला मंक्कीटोला येथे नेऊन देण्याकरिता गेले होते व तिथून वापस आपल्या गावी लींबा करीता जात असतानी ही घटना घडलेली आहे.

बीड: भरधाव कारच्या धडकेत खोकरमोहा येथील श्रीराम सानप यांचा मृत्यू

बीड:आठवडा विशेष टीम―भरधाव कार ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होऊन ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे.अपघाताची ही घटना बीड-अहमदनगर महामार्गावरील वंजारवाडी फाटा परिसरात शनिवारी (दि.११ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार,श्रीराम विठ्ठल सानप (२८, रा.खोकरमोहा ता.शिरूर कासार) असे मयताचे नाव आहे तर दुचाकीवरील महेश विष्णू मिसाळ … Read more

#Accident: मुंबई पुणे मार्गावर बसच्या भिषण अपघातात ५ ठार तर ४० जण जखमी

आठवडा विशेष टीम―मुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात बसचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत.कराड-मुंबई खासगी बसचा अपघात झाला आहे. बसच्या ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही बस दरीत कोसळली.या अपघातात दोन वर्षांचा एक मुलगा, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला असे चारजण जागीच ठार झाले. या ठिकाणी महामार्ग पोलीस,खोपोली पोलीस यांच्या साथीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

बोरघाटातील गारमाळ पॉईंटजवळ चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानंतर हा अपघात झाला. सर्वज्ञा सचिन थोरात (वय ३- रा.कराड), स्नेहा पाटील (१५वर्ष,रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (४५ वर्ष), संजय शिवाजी राक्षे (५० वर्ष, पवई), आणि एका महिलेची ओळख पटलेली नाही. मात्र या ५ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळते आहे.

बीड : खासगी कार आणि पोलीस जीपच्या धडकेत १ ठार, ८ जखमी

आष्टी :सुमो जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील बाळासाहेब दादाराव देवगडे (वय ४५) हे जागीच ठार झाले तर दोन्ही वाहनातील एकूण ८ जण जखमी झाले. हा अपघात आज पहाटे ५ वाजता आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किमी अंतरावर झाला.अपघातग्रस्त पोलीस-जीप ही आष्टी पोलिसांची असल्याची माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील … Read more

सोयगाव: भरधाव ओमिनीच्या धडकेत गंभीर दोघांचा उपचारादरम्यान जळगावला मृत्यू

सोयगाव दि.२३(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): सोयगाव-जरंडी रस्त्यावर भरधाव ओमिनी वाहनाने दुचाकीस्वारांना दिलेल्या समोरासमोरील धडकेत गंभीर जखमी झालेल्या जरंडी गावातील दोघांचा जळगावला सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे जरंडी गावात शोककळा पसरली आहे.दोघांवर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दोन्ही बावीस वर्षीय तरुण असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल ज्ञानेश्वर मोरे(वय २२)आणि वैभव त्रंबक मोरे(वय २२)दोघे रा.जरंडी असे मृतांचे नावे असून सोमवारी रात्री सोयगावकडून जरंडीकडे येत असतांना सोयगावजवळ झालेल्या ओमिनी वाहनाच्या धडकेत हे दोघे गंभीर तर उर्वरित दोघे किरकोळ जखमी झाले असल्याने या दोघांना तातडीने जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता,दोघांचा मंगळवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला आहे.भरधाव येणाऱ्या ओमिनी वाहन एम-एच-२० ०१९६ या वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने या दोघांच्या मेंदूला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचाह मृत्यू झाला आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार-

दरम्यान जरंडी गावात दुपारी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून गावात दिवसभर शोककळा पसरली होती.

ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर संताप-

अपघातग्रस्त रुग्णांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी प्राथमिक उपचार न मिळाल्याने या अपघातग्रस्त तरुणांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात असून,तालुका आरोग्य विभाग एक लाख रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तालुका रुग्णालयाला दोन महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने सोयगाव परिसरातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अपघात ग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार न झाल्याने जळगाव प्रवासात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

सोयगाव-जरंडी रस्त्यावर भीषण अपघातात ४ गंभीर ; दोघांना जळगावला हलविले

सोयगाव दि.२३(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): जरंडीकडून सोयगावकडे जाणाऱ्या भरधाव ओमिनी गाडीने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जरंडी गावाजवळ घडली.यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने उपचारासाठी जळगावला सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेमुळे जरंडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .याप्रकरणी सोयगाव … Read more