महाराष्ट्र सायबरची उल्लेखनीय कामगिरी सुरूच; ५७८ गुन्हे दाखल; २९२ जणांना अटक

मुंबई दि. ३-  महामारीच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. २ ऑगस्टपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप-  २१२ गुन्हे दाखल ■ फेसबुक … Read more

नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट सावध रहा! – महाराष्ट्र सायबरचे आवाहन

मुंबई, दि.३:आठवडा विशेष टीम― नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे. सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . काही नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग अपयशाच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. ईमेलने वापरकर्त्यांच्या नेटफ्लिक्स सदस्यता २४ … Read more

ट्विटद्वारे केलेले आरोप खोडसाळपणाचे – मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई, दि.३१: राज्याचे विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी हे सीप्झमध्ये (SEEPZ) नियुक्तीस असताना अनियमितता झाल्याचे आरोप खोटेपणाचे, खोडसाळपणाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहे. सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे खंडन करताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात की, ट्विटमध्ये ज्या पद्धतीने वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे तो … Read more

महाराष्ट्रात लॉकडाऊन काळात ५७० सायबर गुन्हे दाखल; २९० जणांना अटक

मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. २९ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप- २११ गुन्हे ■ फेसबुक … Read more

नागरिकांनी ट्विटर अकाउंट्स हॅकिंगबाबत सावध रहावे!

महाराष्ट्र सायबरचे आवाहन मुंबई, दि.१६ :- काही जगप्रसिद्ध व्यक्ती जसे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व ॲपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत गेली आहेत. तसेच वरील व्यक्तींच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे.     तसेच हॅक झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स … Read more

लॉकडाऊन काळात ५२८ सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

मुंबई दि.९:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ८ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप- १९९ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २२२ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १४ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.

■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ बीड जिल्ह्यातील बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ५५ वर

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकेल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईल वर शेअर केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय
सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण विविध अपद्वारे औषध मागवत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की अशा अँपद्वारे औषध मागविण्याआधी, सदर अँप वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा व मगच वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर स्टोअर करू नका . तसेच सदर अँपवरून मागविलेली औषध डिलिव्हरी द्यायला घरी येतील तेव्हा तुम्ही मागविलेले औषध व डिलिव्हरीद्वारे आलेले औषध एकच आहे याची खात्री करा, शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on delivery) चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा.

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५१४ गुन्हे दाखल; २७३ लोकांना अटक

मुंबई, दि.०१:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५१४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५१४ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

■ व्हॉट्सॲप- १९७ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २१४ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ११ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६० गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.

■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

अकोला जिल्ह्यातील बशीरतकाली पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद

बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या २ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय टिपणीचा मजकूर असणारी पोस्ट केले होते व त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

महाराष्ट्र सायबरचे आवाहन

सध्याच्या काळात बरेच लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक हे ऑनलाईन विविध अँपद्वारे औषध मागवत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि अशा अँपद्वारे औषध मागविण्याआधी, सदर अँप वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा व मगच वापरा ,तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर स्टोर करू नका . तसेच सदर अँपवरून मागविलेली औषध डिलिव्हरी द्यायला घरी येतील तेव्हा तुम्ही मागविलेली औषध व डिलिव्हरीसाठी आलेली औषध एकच आहे याची खात्री करा, शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा.

महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४७८ गुन्हे दाखल; २५८ लोकांना अटक

मुंबई दि.१५:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर गैरवापर करुन आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७८ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २५८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४७८ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्ह्यानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे –

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

■ व्हॉट्सॲप- १९5 गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – १९5 गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २४ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५1 गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५8 आरोपींना अटक.

■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ जळगाव जिल्ह्यातील फैजापूर पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद

जळगाव जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 34 वर

■ या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणारा टिकटॉक व्हिडिओ बनवून प्रसारित केला, त्यामुळे परिसरात काही काळ तणाव तयार झाला होता ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

महाराष्ट्र सायबरचे आवाहन

शासनाने कोरोना महामारीच्या काळात म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते व त्याकरिता नियम देखील केले होते . सध्याच्या काळात सरकारने हे घातलेले निर्बंध, नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत व ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून विविध सोशल मीडियावर काही मेसेज व पोस्ट फिरत आहेत की, “सर्वसामान्य जनता सोशल डिस्टनसिंग व अन्य काही नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे सर्व शिथिल केलेल्या अटी ,नियम व निर्बंध सरकार पुढे चालू ठेवणार आहे.”

वरील नमूद आशयाचा मजकूर खोटा असून अशा कोणत्याही मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवू नका व तुम्हीदेखील कोणाला फॉरवर्ड करू नका,असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

कोरोना महामारी संदर्भातील कोणत्याही माहितीबाबत केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना नियमितपणे अधिकृतरीत्या निवेदन करून सर्व माहिती तपशीलवारपणे देत असते ,त्यामुळे सर्व नागरिकांनी फक्त त्याच माहितीवर विश्वास ठेवा . तुम्ही जर व्हॉट्सॲप ग्रुप एडमिन किंवा ग्रुप क्रियटर असाल व त्या ग्रुपवर कोणी असे मेसेज पाठवत असेल तर त्या ग्रुप सदस्यास तात्काळ ग्रुपमधून काही काळाकरिता काढून टाकावे आणि ग्रुप settings बदलून only admins असे करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र सायबरने दिल्या आहेत. अफवा पसरविणे हा कायदेशीर गुन्हा तर आहेच पण एक सामाजिक गुन्हा देखील आहे, हा गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र सायबरने दिला आहे.

दिव्यांग बांधवांनी वैश़्विक ओळखपत्र शिबीराचा लाभ घ्यावा – अण्णासाहेब साबळे

आष्टी : दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत वैश्विक ओळखपत्र (unique disability ID) वितरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद च्या समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी वैश्विकओळखपत्र शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी या अभियानातंर्गत त्या – त्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेवून आपल्या वैश्विक ओळखपत्रासाठी आँनलाईन नोंदणी करावी.असे आवाहन मी अण्णासाहेब साबळे आपणांस … Read more

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध समस्यांसाठी पंकजाताई मुंडे यांना निवेदन देण्यात आले ; अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

प्रतिनिधी दि.०७ :आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध समस्यांसाठी संघटनेच्या पदाधिका-यांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांबद्दल निवेदन दिले. राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला रहीवाशी,बांधकाम परवाना, पेटीआर नक्कलयासह सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतीचे संपूर्ण जमा खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभा यांचे ऑनलाईन कामकाज, चौदाव्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे यासह ग्रामपंचायतेतील … Read more