पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

अकोला: शेतमजूर पती-पत्नीची आत्महत्या

अकोला:आठवडा विशेष टीम― अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या भागातील शेत शिवारात एका विहिरीमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आला आहे. ही घटना ३१ मे रोजी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेतली आहे.अकोट तालुका दुष्काळ घोषित झाला आहे. अशा स्थितीत इंधन आणण्याकरीता समाधान वारुळे व बेबीताई वारुळे हे दोघे पती-पत्नी ३० मे रोजी सकाळपासून … Read more

अकोला : सर्वधर्मिय सामाजिक एकता स्नेह भोजनात सर्वांनी घडविले एकतेचे दर्शन

अकोट शहरकरांची ह्या एकता सर्वांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार : एम राकेश कलासागर ठाणेदार संतोष महल्ले यांनी कार्यक्रम ठेवून सर्व समाजाचे लोकांना केले एकत्र अकोट: अतिसंवेदनशील मानल्या जाते तसा आता अकोट शहर असा नाहीच आहे .या शहराकडे सर्वांचे लक्ष असतात .आता अकोट शहरात सर्वधर्मीय एकच भावनाने मनमिळावु पणे राहतात, याच पाहुन अकोट शहर पो स्टे चे पोलिस … Read more

अकोला: लोहारी ते मुंडगाव रस्त्या गेला खड्यात; खराब रस्त्यामुळे अपघातांची भीती

अकोट: मुंडगाव ते लोहारी या दोन गावांना जोडणारया रस्त्याची महत्वाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्यांनमुळे या रस्त्यावर वाहन चालवितांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मुंडगाव ते लोहारी मार्गाने अकोटला जाण्यासाठी एक लहान पर्यायी मार्ग आहे. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून या मार्गावर दिवसभरात मोठया प्रमाणात वाहतुक सुरू असते. रस्त्यावरील जीवघेण्या खड्यांनमुळे या मार्गावर दररोज अपघातात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारयांनी या रस्त्याच्या दुरावस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे काम त्वरीत सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गासह ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोट: पवित्र रमजान महिन्यात खरेदीसाठी रात्री ११.३० पर्यंतची वेळ द्या―एमआयएम चा शहर पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन

अकोट: दि.७ मे पासून पवित्र रमज़ान महीना प्रारंभ होत आहे मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठा उत्सव सण असते. रमज़ान महिन्या मध्ये सर्व धर्म समभाव एकोपाचे दर्शन घड़तात मुस्लिम बांधवांना या काळात वस्तु व इतर आवश्यक सहित्याची खरेदी सुलभतेने करता, या करिता शौकत अली चौक जामा मस्जिद जवळच्या सर्व परिसर अंजनगाव रोड उर्दू हाईस्कुल ते इकरा उर्दू … Read more

अकोला: अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील दोन एकर गहू जळून खाक

अकोला दि.२५: अकोट तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथील अनिल सहदेवराव गावंडे या शेतकरयाच्या शेतातील उभा असलेला २ एकरातील गहू जळून खाक झाला. यामुळे या शेतकरयाचे हजारो रूपयांचे नुकसान झालेआहे. सदर आग शाॅट॔सक्रिटमुळे लागल्याची माहिती आहे. अनिल गावंडे या शेतकरयाने वर्षभर अतिशय मेहनत करून गहू उभा केला. ३ एकरांत पेरलेला गहू सध्या काढण्यावर आला होता. दरम्यान आज … Read more

लोहारी मुंडगाव रोडवरील काटेरी झुडूपे ठरताहेत धोकादायक

अकोट:मुंडगाव येथून अकोट जाण्यासाठी जवळचा मार्ग लोहारी मार्गावरील वळण रस्त्याच्या कडेला काटेरी झुडूपांचे वाढ झाली आहे. यामुळे समोरून येणारया वाहणाचा अंदाज न येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे ही झाडे तोडण्याची मागणी वाहनधारकांनी व ग्रामस्थांनी केली आहे. मुंडगाव वरून अकोट ला हा जवळचा मार्ग आहे.यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ सुरु असते. येथूनच सिरसोली, बेलखेड, अकोली रूपराव, नेव्हरी, जळगाव नहाटे,जाण्याचा कणी अंतराचा मार्ग असल्याने अनेक वाहनधारक येथूनच जाणे पसंत करतात, या मार्गावर वळण रस्त्यावर अनेक दिवसांपासून काटेरी झुडूपांची वाढ झाली आहे. वाहन चालवताना पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहन चालकांची फसगत होते.तसेच अनेक जड वाहने या मार्गावर जात असतात.रात्रीच्या वेळी ही झुडूपे न दिसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. रस्त्या वद॔ळीचा असल्यामुळे तसेच या परिसरातील शैक्षणिक महाविद्यालयिन विद्यार्थी नेहमी या रस्त्याने ये जा करीत असतात.सध्या अवकाळी पाऊस तसेच वादळी वारयामुळे रस्त्या लगत असणारया धोकादायक झाडे व झुडूपामुळे वाहतुकीसाठी अडथळा होत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकारयांनी लक्ष देऊन काटेरी झुडूपे तोडण्याची मागणी वाहनधारक व ग्रामस्थ करत आहे.

अकोला: उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक ; 1 ठार 1 गंभीर

अकोट मधील मध्यरात्रीची घटना

अकोट दि.२२: अंजनगाव मार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला अंजनगाव कडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक दीपक अशोक बिजली हा २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला व एक जण गंभीर झाल्याची घटना रविवारी (दि.२१) च्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, अंजनगाव मार्गावर ट्रॅक्टर व ट्राॅली उभी होती. अंजनगावकडून येणारया भरधाव दुचाकीने येत असलेल्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून गाडीने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की,या अपघातात दुचाकी चालक दीपक बिजली (वय २२)हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असणारया शहर पोलिसांनी जखमीला ग्रामीण रूग्नालयात उपचारासाठी हलवले मात्र गंभीर जखमी असल्यामुळे त्याला अकोला येथे रवाना करण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण रूग्नालयाचे डाॅ चक्रणारायान यांचे तर्फे वार्डबाॅय श्रीकांत नृपणारायण यांचे फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दिनकरराव पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम ; स्वखर्चाने पाणपोई

अकोट :अकोट मध्ये उन्हाचा पारा ४३° पर्यंत जावून पोहोचलाय उन्हाने जीवाची काहीली होत आहे ,प्रत्येकाला वेळोवेळी पाण्याची गरज भासत आहे . अशातच खेड्या पाड्यातील लोकांना आपल्या दैनंदिन कामासाठी अकोटला तालुक्याच्या ठिकाणी यावेच लागते . अशाच प्रकारे वीज वितरण ऑफिस कडे सुध्दा लोकांची वर्दळ असते अशा वेळेस लोकांची तृष्णा भागावी व त्यांना उन्हापासून दिलासा मिळावा या … Read more

अकोला: अकोट तालुक्यातील ग्राम रामापूर येथील इसमाची विहिरीत आत्महत्या

अकोट: अकोट तालुक्यातील ग्राम रामापुर येथील पंकज मधुकर शिरसाम वय २६ वर्ष धंदा मजुरी याने गावाला लागूनच असलेल्या विजय गोपालदास चांडक यांच्या शेतातील १५० फुट असलेल्या कोरड्या विहीरी मधे आत्महत्या केली आहे.त्याच्या मागे पत्नी,३ भाऊ, वडिल असा मोठा परिवार आहे.या विहीरी मधे याआधी सुद्धा ३ आत्महत्या झाल्या आहेत.आणि याच विहिरच्या बाजुला अवैध कनेक्शन सुरु असलेल्या ईलेकट्रिक पोलच्या ताणाला रामापुर येथील एक युवक शौक लागून मरण पावलेला आहे. तरी ही विहिर पुर्ण पणे शिकस्थ झाली आहे.तरी शेत मालकाने हे विहिर त्वरित बुजवून टाकावी,किवा त्या विहीरी वर जाळी बसवावी अशी मागणी रामापुर येथील नागरिकानी केलेली आहे.

जऊळखेड – धारेल शिवारात पाच हरणांची शिकार ; आरोपी मांस व गाडी सोडून फरार

दहिहांडा पोलिसांची कारवाई अकोट: खारपाणपट्टयातील जऊळखेड-धारेल शेतशिवरात पाच हरणांची शिकार करण्यात आली. हे मास आरोपी गाडीवर घेऊन जात असतांना दहिहांडा पोलिसांनी रंगेहात पकडले. मात्र, आरोपी मांस व गाडी सोडून पसार झाले. ही कारवाई सोमवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या घटनेमुळे चोहट्टा परिसरात खळखळ उडाली. अकोट वनक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या दहिहांडा पोलिस स्टेशन हद्दीतील … Read more

पत्रकार प्रवीण दांडगे यांना जातिवादक शिविगाळ करणारे ठाणेदारांवर तात्काळ कारवाई करा

अकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाची तहसीलदारांना निवेदनव्दारे केली मागणी

अकोला(प्रतिनिधी):बाभूळगाव चे पत्रकार प्रवीण दांडगे यांचे पत्नीसोबत शेजारी राहणा-या व्यक्तीने वाद घालून मारहाण केल्याची तक्रार पातुर पो स्टे ला देण्यात आली होती. त्यावेळी ३ तास प्रवीण दांडगे यांना, थांबून ठेवले या संदर्भात वृत पत्रातुन बातम्या प्रकाशित झाल्याने ठाणेदार गुल्हाने व जमादारास दांडगेच्या घरी जावून त्यांना ठाण्यात बोलावले व जातिवादक शिवीगाळ करून बातम्या प्रकाशित का केल्या. असा म्हणत मारहाण केली म्हणून ठाणेदार गुल्हाने यांच्या वर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी. अकोट तालुका पत्रकार संघाचे वतीने अकोट तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांचा जाहिर निषेध करण्यात आला. या निवेदन देते वेळी अकोट तालुका अध्य्क्ष जगन्नाथ कोंडे जिल्हा उपाध्य्क्ष शेख अहेमद शेख बब्बू, गणेश वाकोडे, प्रकाश आम्ले, निरंजन गावंडे, स्वप्निल सरकटे ,संतोष विणके, गौरव बुधे, सै नूर सै उस्मान, कमलेश राठी ,गोवर्धन चव्हाण, यांच्यासह अकोट तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.