जामखेड: जामखेड शहरातून जाणाऱ्या नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिलीप तारडे उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी केली होती यासाठी त्यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या नगर व बीड कार्यालयाशी सातत्याने पुरावा केला होता जामखेड ते नगर व जामखेड ते बीड या मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण व दर्जेदार डाबरीकरण होईल ही अशा जामखेड करांना होती मात्र आज असा दर्जा मिळूनही या रस्त्याच्या कामाची दैनंदिन दयनीय अवस्था झाली जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्या नंतरही सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले होते वर्षापासून याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता जामखेड हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणावरून वाहनाचे सर्वाधिक दळणवळण असते त्यातच पावसामुळे या मार्गावरील खड्डे वाहून ते आता एक दोन फुटांपर्यंत खोल झाले आहेत अशा खड्ड्यांमुळे वेगात जाणाऱ्या मोटरसायकल या ठिकाणी पडून अनेकांचे अपघात झाले असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याकडे संबंधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे लक्ष वेधण्याचे काम कोठारी यांनी केले
संजय कोठारी यांनी उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय अहमदनगर दिलीप तारडे यांच्याशी संपर्क साधून रस्त्याच्या कामाला यश मिळवले आहे
जामखेड तालुका
पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !
बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.
पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.
#CoronaVirus अहमदनगर: जामखेड हॉटस्पॉट केंद्र जाहीर ,प्रतिबंधाची मुदत आता १० मे पर्यंत वाढवली
अहमदनगर:आठवडा विशेष टीम― जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी दि. 6 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यत बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले होते. दिनांक 26 एप्रिल रोजी जामखेड शहरातील 03 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने येथील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक 10 मे, 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक 10 मे, 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे आदेशाची माहिती द्यावी. कंट्रोल रुम स्थापन करुन 24×7 कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत. कंट्रोल रुम मध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरीकांना आवश्यक त्या जिवनावश्यक वस्तु सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे. या क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पूरविण्यात याव्यात. त्याकामी जिवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे.
जामखेड शहर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, कर्जत हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बॅकींग सुविधा बँक प्रतिनिधी मार्फत उपलब्ध करुन द्याव्यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता बॅरिकेड्सद्वारे खुला ठेवावा. या क्षेत्रामध्ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत. तसेच या प्रतिबंधित भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निर्बंध आणने आवश्यक ठरले आहे. त्यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेली वाहन वापर व वाहतूकीची सबलत रह करण्यात येत आहे, असे या आदेशात म्हटले आहे.
या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास,अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधीत आस्थापनांनी उपलब्ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालणे शक्य होईल.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
#CoronaVirus अहमदनगर: जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटीव
अहमदनगर, दि.०५:आठवडा विशेष टीम― जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या २३ अहवालापैकी २० अहवाल निगेटीव आले आहेत. आज पुन्हा १३ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा २१ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव आला आहे तर जामखेड येथील ०४ तर संगमनेर येथील ०३ कोरोना बाधित व्यक्तींचा १४ दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटीव आला आहे. आज या व्यक्तींचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटीव तर दुसरा अहवाल पॉझिटीव आला होता. त्यानंतर सात दिवसांनी पुन्हा त्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल निगेटीव आला आहे. आता आज त्याचा दुसरा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो निगेटीव आल्यास त्याला डिस्चार्ज मिळेल. तसेच संगमनेर येथील ०३ आणि जामखेड येथील ०४ जणांचा पहिला अहवाल निगेटी आला आहे. त्यांचे घशातील स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६२८ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५३५ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ असून त्यापैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन व्यक्तींचा दुर्दैवी मुत्यू झाला. सध्या एकूण १७ जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
#CoronaVirus जामखेडमधील आणखी ०३ व्यक्ती कोरोना बाधीत ; अहमदनगर जिल्ह्यात बाधितांची संख्या आता ४३
विनाकारण घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन अहमदनगर, दि. २६:आठवडा विशेष टीम― जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०३ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली … Read more
#Covid19 जामखेडमधून कोरोना बाधिताच्या संपर्कातील एका नगरसेवकासह २५ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह
जामखेड:आठवडा विशेष टीम―जामखेड येथील वध्द व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या कोरोना तपासणीत ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपर्कातील ९ व्यक्तींच्या तपासणीतून मृत व्यक्तीच्या कुटुंबातील दोन जण कोरोना बाधित असल्याचे पुण्याच्या सैनिकी महाविद्यालयाच्या अहवालात दि २० रोजी स्पष्ट झाले. तर एका डॉक्टरासह चार जणांचे रिपोर्ट निगेटीव आले आहेत. प्रशासनाने त्या दोन जणांच्या संपर्कात … Read more
जैन कॉन्फरन्स चतुर्थझोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी
जामखेड:आठवडा विशेष टीम― जैन कॉन्फरन्स चतुर्थझोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी म्हणाले आज 14 एप्रिल करोणाच्यामहामारी मुळे जयंती ही प्रत्येकाने आपल्या घरी साजरी करावी गर्दी करु नये सरकारच्या नियमाप्रमाणे सर्वांनी वागावे घराच्या बाहेर कोणी पडू नये … Read more