खवल्या मांजराची तस्करी ; तिघांना दोन दिवसांची वन कोठडी

सोयगांव दि १३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― तालुक्यातील सावळदबारा परिसरात दुर्मिळ अशा खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना आज सोयगांव न्यायालयात हजर केले असता. वनविभागाने केलेल्या मागणीवरून तिघांना दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे..
त्यामुळे आरोपीच्या मोबाईल मध्ये आढळलेल्या माहितीवरून दुर्मिळ वन्यप्राण्यांची तस्करी करणारी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे..
सोयगांव तालुक्यात मोठे जंगलक्षेत्र आहे. यातील सावळदबारा जंगलक्षेत्रात दुर्मिळ असे खवले मांजराची तस्करी करणारे नासिर खां लाडखां तडवी (२४)अमीर समशेदखां तडवी (१८)व एक सोळावर्षीय विधिसंघर्ष मुलगा (तिघे रा. देव्हारी ता. सोयगांव )यां तिघांना अजिंठा वनविभागाच्या पथकाने खवल्या मांजरासह सापळा रचून (दि १२)गुरुवारी पहाटे पकडले. त्या तिघांना आज (दि १३ )शुक्रवारी सोयगांव न्यायालयात हजर करण्यात आले होते. घटनास्थळावरून फरार झालेले दोन आरोपी पकडण्यासाठी व अधिक माहिती मिळवून दुर्मिळ वन्यप्राण्याची तस्करी करणारी मोठी साखळी उघड करण्यासाठी वन कोठडी मिळावी अशी विनंती वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी न्यायालयास केली त्यावरून दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीच्या मोबाईलमुळे मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता

सावळदबारा येथे दुर्मिळ खवल्या मांजराला पकडणाऱ्या आरोपीच्या मोबाईल मध्ये मांजर, मांडूळ आदी वन्यप्राण्यांचे फोटो व व्हिडीओ आढळले.हे व्हिडीओ कुणाला तरी पाठविण्यात आले आहे त्यामुळे मोठा आर्थिक व्यवहार होणार होता असा संशय आहे आणि घेणारे कोण आहे हे आता कळणार असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे..

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

सोयगाव: सावळदबारा येथे मध्यवर्ती बँकेत सोशल डिस्टनचा फज्जा

सावळदबारा:सुनील माकोडे―
जगभरामध्ये कोरोनाव्हायरस ने थैमान घातले असून औरंगाबाद जिल्हा हा रेड झोन मध्ये असून औरंगाबाद मध्ये कोरोना पॉझिटिव ची संख्या 291 असून सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या सर्कलमध्ये चौदा पंधरा खेडे गावे असून तीन जिल्ह्याची सीमा असून येथे मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये निराधार व श्रावण बाळ योजना अंतर्गत पेन्शन धारकाला व महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये जनधन खातेधारकांना पाचशे रुपये सातशे ते आठशे लोकांचे बँक मध्ये लोकांनी गर्दी करताना दिसत आहे गावातील पोलीस प्रशासन कोतवाल व पोलीस पाटील आणि तलाठी गांभीर्य घेताना दिसत नाहीत.
पोलीस प्रशासन व महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे तरी एपीआय बहुरे व सोयगाव येथील तालुका दंडाधिकारी प्रवीण पांडे यांचे कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष आढळून असे दिसून येत आहे.
तात्काळ जिल्हाधिकारी उदय चौधरी व ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेवटचे टोकावरती बसलेले 14 ,15 गावाकडे लक्ष देण्यात यावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.