टाकरखेड्याची शाळा झाली तंबाखुमुक्त

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील– जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा झाली तंबाखुमुक्त.जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा टाकरखेडा शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील आणी शाळेतील शिक्षक देवाजी पाटील, रवींद्र चौधरी, जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, रामेश्वर आहेर, श्रीमती ज्योती उंबरकर यांनी तंबाखुमुक्त बाबतचे सर्व निकष पूर्ण केले. निकष पूर्ण केल्यानंतर शाळेला तंबाखुमुक्त बाबतचे सर्टिफिकेट नुकतेच प्राप्त झाले असल्याचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी सांगितले. तंबाखुमुक्त शाळा करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे तसेच सलाम मुंबई फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक संजय ठाणगे, जामनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, शहापूर केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख विकास वराडे, टाकरखेडा उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पूनम ढेपले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा तंबाखुमुक्त करण्यात आली. शाळा तंबाखुमुक्त झाल्याबद्दल टाकरखेडा शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टाकरखेडा जि.प मराठी शाळेत बालदिन उत्साहात साजरा

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― टाकरखेडा ता जामनेर जि जळगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती तथा बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता तिसरीतील विद्यार्थी देवेंद्र रविंद्र सुरळकर हा होता. त्याच्या हस्ते तसेच उपस्थितांच्या हस्ते पंडीत नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी १४ विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच शिक्षक देवाजी पाटील, श्रीमती ज्योती उंबरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी निकीता साळुंखे यांनी केले व आभार मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी मानले व त्यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक रविंद्र चौधरी, श्रीमती छाया पारधे यांनी परिश्रम घेतले.

सकल मराठा समाज जामनेर वधु वर परिचय मेळावा ; बायोडाटा पाठविण्याचे आवाहन

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सकल मराठा समाज जामनेर वधु वर परिचय मेळावा संदर्भात आयोजित पत्रकार परिषद दिनांक 16/12/2020 रोजी विशाल लॉन्स भुसावळ रोड जामनेर येथे पार पडली.
या वेळी समाजातील सर्व पक्षीय मान्यवर सामाजिक क्षेत्रातील राजकीय व प्रशासकीय सेवेतील मान्यवर उपस्थित होते 22/12/2020 पर्यंत सर्वांनी बायोडाटा द्यावेत नविन रंगीत पासपोर्ट फोटो बायोडाटा अपेक्षित वधू-वर घटस्फोटीत विधवा विधुर दिव्यांग काही कारणाने लग्न रखडले अशा सर्वांनी बायोडाटा द्यावेत प्रसंगी श्री दिलीप खोडपे सर वंदनाताई चौधरी प्रकाश पाटील डि एन चौधरी श्रीराम पाटील डॉक्टर प्रशांत भोंडे डॉक्टर नंदलाल पाटील बोरसे चंद्रकांत बावस्कर किशोर खोडपे अशोक चौधरी विश्वजीत राजे पाटील सुनील चौधरी प्रफुल पाटील दशरथ पाटील
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील सर प्रास्ताविक एस टी चौधरीसर यांनी केले तर आभार भगवान भाऊ शिंदे यांनी मानले.

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटाइजरचे वाटप

जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेत आज दिनांक २ अॉक्टोबंर रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी गजानन कडू पाटील हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते भगवान पुंडलिक पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पुंडलिक पाटील, सदस्य शिवाजी डोंगरे, नाना सुरळकर, पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी सहकार महर्षी गजानन कडू पाटील यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पाटील परिवाराने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्क तसेच अंगणवाडी व शाळा यांना सॅनिटायझरचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक देवाजी पाटील यांनी केले व आभार उपशिक्षक विकास वराडे यांनी मानले.
मयुरी सुरळकर, नाना सुरळकर, देवाजी पाटील, भगवान पाटील, समाधान पाटील,मयुर पाटील, पी.टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण गजानन पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विद्याधर पाटील, दिलीप पाटील, रामचंद्र पाटील, मयुर पाटील, रूपेश पाटील, अथर्व पाटील, दिपक पाटील, तेजस पाटील, दिनेश पाटील, बापु लोहार, आनंदा कोते, अंगणवाडी सेविका बेबाबाई पाटील, कविता डोंगरे, रूपाली आगळे शाळेतील शिक्षक रविंद्र चौधरी, विकास वराडे, श्रीमती छाया पारधे, रामेश्वर आहेर व विद्यार्थी उपस्थित होते.

जामनेर: टाकरखेडा ग्रामपंचायतने रोवली प्रथमच शिक्षक सन्मानाची मुहूर्तमेढ

जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जामनेर तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचायतने प्रथमच शिक्षक दिन शाळेत सोशल डिस्टींगचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान पुंडलिक पाटील हे होते सुरूवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील. पदवीधर शिक्षक देवाजी पाटील, उपशिक्षक रविंद्र चौधरी, विकास वराडे, जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, छाया पारधे, रामेश्वर आहेर यांचा यथोचित सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, रुमाल, टोपी,गुलाबपुष्प देवून करण्यात आला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतने प्रथमच शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेतील सर्व शिक्षकांच्या सन्मानाची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांनी ग्रामपंचायतीचे कौतुक करून धन्यवाद दिले.
यावेळी शाळेतील शिक्षक देवाजी पाटील, जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, मुख्याध्यापक पी.टी.पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नाना सुरळकर यांनी मनोगत व्यक्त केले व अध्यक्षिय भाषण समाधान पाटील यांनी केले. . या कार्यक्रमात समीक्षा पांडुरंग भोई या विद्यार्थीनीने १० वी च्या परिक्षेत ८४ टक्के गुण मिळवून यश मिळविले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सरपंच समाधान पुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर सुरळकर, पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजी डोंगरे, अमृत दांडगे, नाना सुरळकर, सौ. वैशाली गाडीलोहार, सौ. रुपाली उघडे, सौ. सविता भोई,सौ. सुनीता गाडीलोहार आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पी.टी.पाटील यांनी केले व आभार जयंत शेळके यांनी मानले.

पी.टी.पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जामनेर तालुक्यातील टाकरखेडा जि.प मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी कोरोना युद्ध – जन्य परिस्थिती मध्ये केलेल्या समाजसेवे बद्दल शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्या तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे. एस. एम. उज्जैनकर फाऊंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष विनायक वाडेकर, सचिव प्रमोद पिवटे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जळगाव: पहुरपेठ जिल्हा परिषद शाळेच्या अॉनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी गुगल फाॅर्मची निर्मीती

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―संतोषीमातानगर पहूरपेठ जि. प. प्राथमिक शाळेने सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षांकरीता अॉनलाइन प्रवेश प्रक्रियासाठी गुगल फाॅर्मची निर्मीती केले आहे. शाळेतील तंत्रस्नेही आदर्श शिक्षक दिनेश दत्तु गाडे यांनी त्यांचे तंत्रज्ञान वापरून गुगल फाॅर्म तयार केलेला आहे.
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव चालू आहे. आणि या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाॅकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात आदेशान्वये शाळा बंद ठेवून शिक्षकांना *वर्क फ्राॅम होम* चे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार सन २०२०-२०२१ ची प्रवेश प्रक्रिया संकटात सापडली आहे. म्हणून या समस्येवर उपाय शोधून काढत जि. प प्राथमिक शाळा संतोषीमातानगर पहूरपेठ शाळेने *गुगल फाॅर्म* ची निर्मिती केली आहे. सध्या बहुतांश पालक मोबाईल वापरतात. पालक सदर गुगल फाॅर्म वर घरबसल्या माहिती भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकतात. तसेच सदर माहिती भरताना काही अडचण आल्यास लिंकवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणिरी तसेच विद्यार्थ्यांचे हित जोपासणारा शाळा म्हणून पहूरपेठ परिसरात संतोषीमातानगर जि.प. शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेची स्थापना ३ जून १९९९ रोजी झालेली आहे. शाळेत ६ उपशिक्षक व १ ग्रेडेड मुख्याध्यापक असे एकूण ७ शिक्षक कार्यरत आहे.शाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावातील पालक, पदाधिकारी, माता-पालक , शिक्षक -पालक, शालेय व्यवस्थापन समिती यांचे लक्ष व सहकार्य असल्याने शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागलेली आहे. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. परिपाठाच्या वेळी मूल्यशिक्षणावर विशेष भर दिला जातो. दर शनिवारी सकाळी कवायत व व्यायामाचे प्रकार विद्यार्थ्यांना स्वतः मुख्याध्यापक करून दाखवतात व प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली जातात. “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, हाच शाळेचा ध्यास”. हे शाळेचे ब्रीदवाक्य आहे.
प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती दिली जाते. डिजिटल शाळा म्हणून शाळेला नावलौकिक आहे. शाळेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळालेले आहे. ३०/११/२०१९ रोजी तंबाखुमुक्त शाळा म्हणून घोषीत करण्यात आली आहे. सन २०१९ पासून पहिली पासून सेमी वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. दरवर्षी शैक्षणिक सहल काढली जाते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वर्गशिक्षकांचे वैयक्तिक लक्ष असते. माता-पालक, शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात येते. शाळेत अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक आहेत. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी लाभाच्या योजना शाळेत राबविल्या जातात.

विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांची फिराफिर तसेच कोणत्याही प्रकारची अडचण होवू नये यासाठी शासनाच्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अॉनलाइन गुगल फाॅर्मची निर्मीती केली आहे.
―दिनेश गाडे (उपशिक्षक)

अॉनलाइन प्रवेश प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी गुगल फाॅर्मची निर्मिती शाळेतील तंत्रस्नेही आदर्श शिक्षक दिनेश गाडे यांनी केली आहे. १०० टक्के पालक अॉनलाइन प्रवेश फार्म भरतील याचा मला आत्मविश्वास आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू.
―पी.टी.पाटील (मुख्याध्यापक)

जामनेर: संतोषीमातानगर जि.प.शाळेत वृक्षदिंडी व पालकसभा उत्साहात संपन्न

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पहूरपेठ ता.जामनेर येथील संतोषीमातानगर जि.प.प्राथमिक शाळेत वृक्षदिंडी व पालकसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सुरुवातीला शाळेच्या परिसरात वृक्षदिंडी टाळ मृदुंग सहित ‘झाडे लावा ,झाडे जगवा’ घोषनामाच्या गजरात काढण्यात आली.मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी स्वत: मृदुंग वाजविले.पालखीची उत्कृष्ट सजावट व विद्यार्थ्यांचा आकर्षक असा पोशाख आणी प्रत्येक मुलाच्या डोक्यातील टोपी यामुळे वृक्षदिंडी लक्षवेधी ठरली. वृक्षदिंडी नंतर पालकसभा मुख्याध्यापक पी.टी.पाटील … Read more