पाचोरा येथे सेवा पंधरवाडा पंतप्रधानांच्या जन्मदिवशी रक्तदान पिशव्यांचे संकलन

पाचोरा दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा जन्म दिवस ते राष्ट्रपिता म.गांधी यांची जयंती म्हणजे १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर हा कालावधी संपुर्ण देशात सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. पंधरवाड्याची सुरूवात आज पाचोरा येथील भाजपा कार्यालयात रक्तदान शिबीराने आयोजित करण्यात आली.

यानंतर 25 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्ताने वृक्षारोपण तर त्यानंतर २ आक्टोंबर पर्यंत स्वच्छता अभियानाने पंधरवड्याची सांगता करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिवशी ७५ रक्त पिशव्या संकलन करण्यात आले.प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे सेवा पंधरवाडा तालुका संयोजक सुनिल पाटिल युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश पाटील शहराध्यक्ष समाधान मुळे यासह एकूण 75 दात्यांनी रक्तदान केले .शिबिराला खा.उन्मेष पाटिल जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा पाटिल विधास सभा क्षेत्र प्रमुख हिमंत निकुंभ बाजार समिती सतिश शिंदे ता सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटिल रमेश वाणी परेश पाटिल युवा मोर्चा ता अध्यक्ष मुकेश पाटिल समाधान मुळे गणेश पाटिल सैनिक आघाडीचे भरत पाटिल दिपक माने व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन अनिल चांदवाणी अॅड राजा वासवाणी राकेश कोळी बाळू धुमाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रप्रेमी रक्तदाते उपस्थीत होते.
रेडप्लस ब्लड बॅंकचे डॉ.भरत गायकवाड डाॅ.कैलास कैलास पेखले सीमा सावळे अंतिम मालाकार पायल कुंभारे प्रतिक्षा तूल प्राजक्ता टेंभरे यांनी संकलन केले.

आदर्श सरपंच व्याख्यान व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाडी शेवाळे भुमिपूजन सोहळा संपन्न ,भास्करराव पेरे यांची प्रमुख उपस्थिती

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर आदर्श सरपंच व्याख्यान व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाडी शेवाळे भुमिपूजन सोहळा झाला संपन्न –भास्करराव पेरे यांची प्रमुख उपस्थिती

तसेच पहिल्यांदा शेवाळे गावातील ग्राम पंचायत ला भेट देऊन पेरे साहेबांनी गावाचे सरपंच व गावाची ओळख करतांना गाव आदर्श गावाच्या वाटेवर असल्याचे नमूद केले, आणि सरपंच योगेश पाटील यांचे विशेष कौतुकही केले, त्या नंतर शेवाळे गावात साईबाबा मंदिर परिसरात निंब, पिंपळ, वड रोप लाऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला व वाडी शेवाळे येथे येऊन समशान भुमिचे परिसरात निंब, पिंपळ, वड, असे वृक्षरोपण करून, ग्रा.प.वाडी-शेवाळे यांच्या वतीने मा.श्री.आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील साहेब यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, पेरे यांनी अतिशय योग्य पद्धतीने व सुटसुटीत मुद्दे मांडून गावाचा विकास कसा करता येईल हे समजून सांगितले,

पेरे सरांच्या व्याख्यानाने गावाचा विकास करण्यासाठी वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. या प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, खासदार उन्मेष दादा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यासह जि.प.सदस्य मधुकर काटे, जि.सदस्य पदमबापू पाटील. पंचायत समितीचे सदस्य, सुनिल पाटील,
शेवाळे गावचे सरपंच श्री. योगेश कौतिक पाटील उपसरपंच शांताराम वाघ, ग्रामपंचायत सदस्य लताताई विश्वासराव भोसले, भागाबाई मांगगारोडी, सुनीता पाटील, अनिल पाटील, श्रीकांत पाटील, जयश्री भगूरे, नपिसा तडवी, ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, पो.पा.अरुण पाटील, भगवान पांडे, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते, तसेच वाडी गावचे सरपंच रेखाताई नंदू पाटील, उपसरपंच सोपान ठोबरे, ग्रा.प.सदस्य प्रकाश भाऊ पाटील, गणेश गव्हांडे, dr.शेखर पाटील, प्रवीण मिसाळ, समाधान देवरे, सीमा जगदीश पाटील, संध्या प्रकाश पाटील, लताबाई गणेश पाटील, नंदुभाऊ वामन पाटील, ग्रामसेवक संजय चौधरी, माजी सरपंच रमेश नाना पाटील, तसेच आर्मी ग्रुप व कर्मचारी विवीध गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच,पंचक्रोशीतील कार्यकर्ते ,ग्रामस्थ उपस्थित होते.

ऑक्सिजन उपलब्धतेसाठी वृक्ष लागवड…मोठ्या बंधूच्या मृत्युनंतर केली वृक्ष लागवड

पिंपळगाव(हरे) ता.पाचोरा जिल्हा परिषद गटाच्या सदस्यांनी राबविला सोयगाव तालुक्यात उपक्रम

पाचोरा,ता.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांना ऑक्सिजनची टंचाई भासत असतांना मोठ्या भावाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागी पाच वृक्षांची लागवड करून ऑक्सिजनची उपलब्धतेचा संदेश पिंपळगाव(हरे) ता,पाचोरा जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.पिंपळगाव(हरे) गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर कांटे यांचे गाव सोयगाव तालुक्याच्या हद्दीला घोसला स्गीवरला लागून आहे.त्यांचे मोठे बंधू भागवत काटे यांचे निधन झाल्यावर मधुकर काटे यांनी बंधूच्या निधनानंतर सोयगाव तालुक्याच्या हद्दीत बंधूच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर पाच वृक्षांची लागवड करून सध्या होणार्या ऑक्सिजनची टंचाई भविष्यात दूर व्हावी यासाठी हा उपक्रम सोयगाव हद्दीत राबविला असून नागरिकांना वृक्ष लागवड करून ऑक्सिजन वाढविण्याचा संदेश दिला आहे.या लागवड केलेल्या पाच वृक्षांवर निगराणीसाठी दोन व्यक्तींना निवड करून या वृक्षांची देखभाल करून त्या वृक्षांना पाणी घालून या वृक्षांचे वटवृक्ष करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील सदस्य मधुकर काटे यांच्या मोठे बंधू भागवत काटे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार होताच त्यांच्या सोयगाव हद्दीतील अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर मधुकर काटे यांनी पाच वृक्षांची लागवड केली या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारीही देण्यात येवून बंधूच्या तिसऱ्याची राख नदीपात्रात न विसर्जित करता त्यांनी या राखेला लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या वाढीसाठी खतपाणी म्हणून घातली आहे.

सातगाव येथे हनुमान मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न ; परमपूज्य चिदानंद स्वामींची उपस्थिती

सातगाव तालुका पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील हनुमान (मारूती) मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधलेले असून, आता ते जीर्ण झाल्याने, गावातील मारुती मंदिर पंच कमिटीने त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यासाठी परमपूज्य चिदानंद स्वामी- ज्ञानेश्वर माऊली आणि प्रकाश बाबुलाल परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

सातगाव डोंगरी हे गाव एक वैशिष्ट्यपूर्ण असून, येथून खानदेश व मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले चार किलोमीटरवर अजिंठा पर्वत रांगेत जागृत जोगेश्वरी देवी व इंद्रगढी देवीचे भव्य मंदिरे आहेत. सातगाव ग्रामस्थावर या देवींची मोठी कृपा असल्याची श्रद्धा ग्रामस्थांची आहे. अनेक वर्षापूर्वी सातगाव डोंगरीत मारुती मंदिराची उभारणी झालेली असून, आता मात्र ते जीर्णावस्थेत आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मारुती मंदिर पंच कमिटीने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ७१ फूट उंची असलेल्या कळस रुपी मंदिर निर्माण साठी नुकतेच परमपूज्य चिदानंद स्वामी- ज्ञानेश्वर माऊली व प्रकाश बाबुलाल परदेशी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पूर्ण करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी नोकरी अथवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक व्यक्ती या कार्यक्रमास हजर होत्या. बाहेरगावावरूनही अनेक श्रद्धाळू यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. आर. वाघ यांनी तर सूत्रसंचालन उत्तमराव मनगटे पाटील यांनी केले.
यावेळी पंचकमिटी अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष विक्रम वाघ, महादू बोरसे, त्र्यंबक पवार, लक्ष्मण अश्रू पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र बोरसे, प्रल्हाद शेळके, भागवत पाटील, प्रल्हाद वाघ, शेखर पाटील, जगदीश गरुड, अण्णा मराठे, शंकर बोरसे, गणेश मराठे, अशोक पाटील, भगवान मंदाडे, बाबूलाल मनगटे, सुनील मराठे, गजानन लाधे, वाल्मीक पाटील, गजानन वाघ, रमेश पाटील, सतीश लोहार, विजय चौधरी, सुरेश गायकवाड, आबा पाटील, गोकुळ परदेशी, सुधीर बच्छे, जनार्दन मुठ्ठे, कैलास मराठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

लिंबाच्या झाडामध्ये आवतरले बाप्पा…

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील नवनाथ महाराजांच्या मंदिराच्या आवारात अनेक वर्षांपासून लिंबाच्या झाडामध्ये बाप्पाच आवतरल्यासारखे चित्र आहे.. झाडामध्ये गणपतीसारखा आकार व चक्क सोंडही असल्याने या झाडाची गावातील व परिसरातील भाविक पूजा करतात. याबाबत पुजारी सखाराम नथ्थु भिल्ल, सरपंच विजय दत्तात्रय पाटील भाविक पंकज पाटिल आदींनी भक्तीपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पाचोरा रुग्ण हितासाठी रुग्ण हक्क परिषदची बैठक संपन्न

पाचोरा दि.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा आरोग्य सेवा रुग्ण हितासाठी ‘रूग्ण हक्क परिषदची’ शाखा पाचोरा येथे सुरू करीत असून आज रविवार ९ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकं येथे रुग्ण हक्क परिषदचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र मोरे सदस्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित ,करण्यात होती ही बैठक रुग्ण हक्क परिषदेने आखून दिलेल्या नियमानुसार कामकाज कसे करावे आणि वेळोवेळी रुग्णासाठी काम कसे करावा गोरगरिब रुग्णासाठी त्याच्या हिताचे निर्णय घेऊन हॉस्पिटलमध्ये डॉक्टराना कसे सहकार्य करून गोरगरिबांना कसा उपचार मिळवता येईल शासकिय हॉस्पिटलमध्ये व रुग्णांच्या गरजा पाहून.आरोग्य विभागाच्या “रुग्ण कल्याण समितीकडून पेशंटसाठी औषध खरेदी, बाहेरून करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा तपासणी खर्च, अत्यावश्‍यक पेशंटसाठी संदर्भसेवा, माता व बाळासाठी कपडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था या गोष्टी मागण्या परिषदने पूर्ण करणे अपेक्षित आहे. यासाठी आज ही बैठक घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले,यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला रुग्णसेवा मिळावी या बाबत बैठकीत चर्चा करण्यात आली या आदी आज ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त क्रांती दिवस साजरा करण्यात आला आणि गोरगरीबाच्या आरोग्य सेवे साठी आरोग्यसेवक म्हणून काम करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद तयार करून क्रांतीकार्य कामाची सुरुवात या बैठकीत सुरुवात केली .या बैठकीत मार्गदर्शना करण्यासाठी रुग्ण हक्क परिषचे जिल्हाप्रमुख जयेंद्र मोरे जळगाव .व जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्थांचे अध्यक्ष गणेश शिंदे होते. या गणेश पाटील बैठकीत सोशल डिस्टन पालन करण्यात आले .या वेळी सचिन पाटील सोमेश पाटील अमजद खान सगीर शेख समाधान जाधव सागर सोनवणे समाधान भोई विशाल परदेशी मुकेश तुपे रामचंद्र जाधव ज्ञानेश्वर महाजन अनिल भोई रवी ठाकूर पपू जाधव गोकुळ पाटील यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

युवा समाजसेवक सागर पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वावर सेवक सेवाभावी संस्था जळगांव यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार निंभोरी ता पाचोरा येथील रमेशतात्या युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री सागर रमेश पाटील यांना जाहीर करण्यात आला.
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोरोना योध्द्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला हा पुरस्कार देण्याचे सेवक सेवाभावी संस्था अध्यक्ष विशाल शर्मा तसेच या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सागर पाटील यांचे सेवाभावी कार्य पाहून निश्चित केले.

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सागर पाटील यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पाचोरा: मधुकर भाऊ काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

  • कोरोना रूग्ण सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ.भुषण मगर यांच्यासह कोरोना लढ्यात सहभागी विविध क्षेत्रातील कोरोणा योद्धांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

  • 54 आशा वर्कर्सना मानधन प्रत्येकी 1000 रू आणि प्रशस्तीपत्र वितरण

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शिंदाड पिंपळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे यांचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमित्ताने वरखेडी आरोग्य केंद्राच्या सभाग्रूहात आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त जिप सदस्य मधुकर भाऊ काटे यांचे दवाखाना प्रशासन व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लढ्यात अल्प मानधनावर काम करणाऱ्या 54 आशा आरोग्य सेविकांना एक हजार रुपये मानधन व कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्याचबरोबर पाचोरा तालुक्यात कोरोना लढ्यात प्रशासनासोबत धडाडीने कार्य करणाऱ्या व कोविड संसर्गित रुग्णांच्या उपचार कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डाॕ.भुषण मगर यांना निखिल यावेळी सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून डॉ भूषण मगर यांचा सन्मान करण्यात आला.प्रसंगी उपस्थित पत्रकार,पोलीस पाटील तसेच सरपंच आणि अंगणवाडी सेविका व आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात कोरोणा योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास सनेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ डॉ. शेखर पाटील महिला व बालकल्याण विभागाचे पर्यवेक्षक पाटील पंस सदस्य ज्ञानेश्वर सोनार डॉ.शांतीलाल तेली परेश पाटील ,डॉ शेखर पाटील डॉ मयुर पाटील, डॉ दीपाली सोनवणे , पोलीस पाटील वाणेगाव नितीन जमजाळे, ग्रा. वि .अधिकारी पी एन मोरे , सतीश सत्रे , निंबोरी सरपंच बाळू धुमाळ, आदी . मान्यवर यावेळी उपस्थित होते. समाजातील वंचित घटकांना न्याय देणे व राजकीय क्षेत्रात काम करताना सामाजिक जाणिवेच्या अंगाने काम करायला आपण नेहमीच प्राधान्य देतो त्यामुळेच आज वाढदिवसाच्या निमित्ताने कुरणा युद्धात सहभागी त्यांचा सन्मान व आशा वर्कर्सना आर्थिक मदत असा उपक्रम राबवला असल्याचे मधुकर काटे यांनी मनोगतात सांगितले. तर आरोग्य सेवा ही सर्वोच्च सेवा असून कुठलीही प्रशंसा किंवा टीका-टिप्पणी चा विचार न करता यानंतर देखील रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर राहणार असल्याचे मनोगत डॉ भूषण मगर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी डॉक्टर शेखर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.

पाचोऱ्यातील विघ्नहर्ता हॉस्पिटल कोविंड सेंटर ३ जुलैपासुन बंद होणार – डॉ.भुषण मगर

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रही कोरोना विषाणुचा सामना करत आहे. या संसंर्गजन्य विषाणुवर मात करण्यासाठी पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल हे गेल्या तीन महिन्यांपासुन कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी कोविड – १९ सेंटर म्हणून प्रशासनाने ताब्यात घेतले होते. परंतु प्रशासनातर्फे पुरविण्यात येणार सुविधा देण्यात येत नसल्याने व काही असंतुष्ट महाभाव हे हाॅस्पिटल बद्दल जनतेसमोर चुकीची माहिती देऊन बदनामी करत आहे. व प्रशासनाची दिशाभुल करण्याचे काम करित आहे. यामुळे डॉ. भुषण मगर यांनी दि. २७ जुन रोजी पत्रकार परिषद घेत सदरील कोविड – १९ सेंटर हे येत्या ३ जुलै पासुन पुर्णतः बंद करण्याचे सांगितले आहे.

या तीन महिन्याच्या काळात विघ्नहर्ता हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी व सर्वच टिमने कोरोना संसंर्ग झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा देत अनेक रुग्णांना या भयावह आजारापासुन मुक्तता दिली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यापासून विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भुषण मगर दिवस – रात्र रुग्णांची सेवा करीत आहेत व आपल्या परीवारा पासुन कुटुंबापासुन दुर राहुन सेवा देत आहे.

भडगाव रोड वरील हॉटेल्स स्वप्नशिल्प याठिकाणी वास्तव करत आहे फक्त रुग्णसेवा हेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवुन सेवा करत आहे. दि. ३ जुलै २०२० पासून पाचोरा शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल कोविंड सेंटर बंद होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ.भुषण मगर यांनी दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी पाचोऱ्यात पुन्हा जनता कर्फ्युची आ.किशोर पाटील यांचेकडून घोषणा

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा शहरात व तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी शनिवार दिनांक २७ ते मंगळवार दिनांक ३० जून अखेर चार दिवस जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले असून आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी व्यापारी असोसिएशन व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूला सहमती दर्शवली आहे, यावेळी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जिल्हा उपप्रमुख अँड अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील,शहर प्रमुख किशोर बारावरकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास पाटील, शहराध्यक्ष सतीष चौधरी सह शहरातील विविध व्यापारी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते,
पाचोरा शहरात गेल्या चार महिन्यांपूर्वी अमळनेर व जळगांव नंतर कोरोना व्हायरसचा प्रसार झाला होता,नागरीकांनी व व्यपारी बांधवांनी स्वयंमस्पूर्तिने दोन वेळा जनता कर्फ्यूला सहमती देवून उत्स्पूर्तपणे प्रतिसाद दिल्याने इतर तालुक्याच्या मानाने कोरोना व्हायरसचा प्रसार कमी प्रमाणात झाला, मात्र यापुढे ही संख्या आटोक्यात रहावी यासाठी वेळीच दक्षता म्हणून तालुका वासियांकडून व जनतेकडून तालुका वासियांचे आरोग्य चांगले रहावे या दृष्टिकोनातून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी येत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगून शहरातील भाजीपाला, कृषी सेवा केंद्र, मेडिकल व दुध डेअरी वगळता इतर सर्व व्यवहार कडकडीत बंद पाळण्यात यावे असे आवाहन करून शक्यतो भाजीपाला विक्रेत्यांनी चार दिवस सहकार्य करावे अशी विनंती ही आमदार किशोर पाटील यांनी केली, यावेळी पाचोरा तालुक्यात ७४ कोरोना व्हायरचे रुग्ण असून ४४ रग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे,तर सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी मृत्यू झाला आहे,कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी बांबरुड महादेवाचे येथील केव्हिड सेंटरमध्ये १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, दुर्देवाने भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास ५०० खाटांची व्यवस्था करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे,मागिल काळात शासनाकडून लॉकडाऊन उघडण्यात आल्याने अनेक बेजबाबदार नागरीक कोरोना व्हायरसचे गांभीर्याने विचार न करता बिनधास्त पणे वागू लागले आहेत,अशा नागरीकांनी स्व:चा व इतर नागरीकांचा आयुष्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे यामुळे पुन्हा एकदा जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले, यावेळी व्यापारी जगदीश पटवारी, गोपाल चिंचोले,संजय वाणी,परशराम मंगलवाणी, राजेंद्र कोदवाणी, ग्यानचंद ललवाणी,खेमचंद केसवाणी, रविंद्र अग्रवाल,प्रदिपकूमार संचेती, अनूप अग्रवाल, अनुराग भाटिया,अनिल चंदवाणी, दौलत केसवाणी, किरण पाटील,हुशेन नागरीया,मुर्तूजा भारमल,होजेफा लोखंडवाला,सुरेश जैन,प्रविण दायमा, रविंद्र भोई,सलीम बागवान सह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.

जळगाव: पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा नजिक प्रेमीयुगुलाची किटनाशक पिऊन आत्महत्या

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा पी. जे. रेल्वेच्या मोठ्या पुलाकडे जाणाऱ्या मार्गा जवळील शेताजवळ एका ३५ वर्षीय पुरूष व ३० वर्षीय महिलने कीटकनाशके औषधे प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. दि.१७ जून बुधवार रोजी दुपारी एक वाजेपुर्वी गोराडखेडा पाचोरा – जामनेर रेल्वे गेट पासून मोठ्या रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील शंभर मीटर अंतराच्या अलीकडे ३५ वर्षीय उमेश हरी शेळके वय अंदाजे ३५ व ३० वर्षीय पिंकी (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी शेतीसाठी वापरले जाणारे विषारी किटक नाशक औषधी घेऊन आत्महत्या केल्याचे जवळील एका शेतकऱ्याला दिसून आले. घटनेची माहिती गोराडखेडा येथील माजी सरपंच मनोज पाटील व संजय पोलिस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना कळवली.मयतांच्या गळ्यात झेंडूच्या फुलाच्या मळा आहे. बाजुला किटक नाशक औषधीचा डब्बा व प्लास्टिकचे डिसपोजल ग्लास पडलेले होते. मयत पुरुष व महिला रा. घाणेगाव तालुका सोयगाव, जि.औरंगाबाद येथील असल्याचे मयत इसमाच्या पाचोरा येथील एक महिला नातेवाईकांकडून माहिती मिळाली आहे. दोघ मयतांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मयतांचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत पुरूष हा शेतीकाम करीत असल्याचे व विवाहीत असल्याचे कळते. आत्महत्येचे कारण पोलिस चौकशीनंतरच निष्पन्न होणार आहे.

पाचोरा: वीज पडल्याने सातगांव येथील गायीचा मृत्यू

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील वामन शेनफडू पाटील यांच्या मालकीची गाय आणि वगार दि. १० रोजी रात्री १ वाजता वीज पडून ठार झाल्याची घटना धडली. निसर्गाच्या सानिध्यात आणि आकाशाच्या छताखाली बळीराजा जीवन जगत असतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. सध्या मृगनक्षत्र असल्याने, विजांच्या कडकडाने वादळ आणि पावसामुळे वीज पडल्याने सातगाव (डोंगरी) येथील वामन शेनफडू लोखंडे यांच्या मालकीची गाय आणि वगार निंबाच्या झाडाखाली बांधलेली असतांना दि. १० रोजी रात्री १ वाजता जोरदार विजेचा आवाज होऊन लोखंडे यांच्या निंबाच्या झाडाखाली बांधलेल्या गाय आणि वगार यांच्यावर पडली. यावेळी दोन्ही जनावरे ठार झाली. यावेळी पन्नास फुटावर पत्राच्या शेडमध्ये झोपलेले वामन लोखंडे, ज्ञानेश्वर तुळशीराम डांबरे, संजय शामराव सोमासे, प्रमोद वामन लोखंडे, कासम फरीद तडवी हे झोपलेले होते. ज्यावेळी वीज पडली त्या वेळेला सर्वजन झोपी गेलेल्या शेडमधील लाईटच्या बोर्डात मोठा आवाज झाला. त्यावेळी सर्वजण जागे झाले. आवाज कशाचा झाला हे लक्षात न आल्याने बाहेर येऊन पाहतात तर गाय ओरडत असल्याचा आवाज आला. गाईला बघितले तेव्हा गाय तळमळत होती. आणि काही मिनिटातच गाय व वगार ठार झाल्याचे वामन लोखंडे यांनी सांगितले. तलाठी रूपाली रायगडे व कोतवाल उमेद चव्हाण यांनी पंचनामा केला असून ४० हजार रुपये किंमतीची गाय आणि दहा हजार रुपये किंमतीची वगार ठार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पाचोरा: आयटीएस स्पर्धा परिक्षेत इयत्ता पहिलीच्या प्रणय गणेश शिंदेचे यश

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―येथील सु.भा. पाटील प्राथ.विद्या मंदीरातील विद्यार्थ्यांनी यंदा देखील आयटीएस स्पर्धा परिक्षेत गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा कायम ठेवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली. गुणवत्ता यादीतील इ. १ लीतील जिल्ह्यात तिसरी स्वरा सोनार, जिल्ह्यात चौथा सार्थक पाटील, ओम महाजन तसेच केंद्रात दुसरी आलेली मृणमयी राजपूत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इ. २ रीतील जिल्ह्यात दुसरा अर्णव पाटील व केंद्रातून तिसरा आलेला सिध्देश ठाकरे व शाळेत प्रणय गणेश शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाले.आहे तर .चि प्रणय हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व सायदैनिक साईमतचे पाचोरा भडगाव प्रतिनिधी गणेश जनार्दन शिंदे यांचे चिरंजीव आहे ई १ ली चा विद्यार्थी प्रणय गणेध शिंदे याला २०० पैकी १२६ मार्क मिळाले असून त्याला बोरसे क्लासेसचे बोरसे मेंडयं वर्ग शिक्षक सॊ शीतल ठाकुर व आई सॊ स्वाती गणेश शिंदे डॉ तिलोतर्मा मौर्य चे यांचे खूप मोठे मार्गदर्शन होते .आयटीएस स्पर्धा परिक्षेत गुणवत्ता यादीत प्रणय गणेश शिंदे याला यश मिळाल्या नंतर आ किशोर पाटील ओबीसी नेते अनिल महाजन पिटीसी चेअरमन संजय वाघ मा डॉ भूषण मगर आरोग वेंधकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे डॉ स्वप्नील पाटील डॉ मुकुंद सावणेरकर आ दिलीप वाघ उपनगध्यक्ष शरद पाटे भाजपचे जेष्ठ नेते दत्ता आबा पाटील पोलीस उपअधिक ईश्वर कातकडे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील शिक्षण अधिकारी विकास पाटील साईमतचे संपादक प्रमोद ब्रह्याटे ध्येय न्यूज संपादक संदीप महाजन ऍड अभय पाटील जि प सदस्य मधुकर काटे जेष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी मिलिंद सोनवणे प्रशांत येवले विनायक दिवटे सुरेश तांबे नगरसेवक विकास पाटील डॉ भरत पाटील जितेंद्र जैन डॉ उत्तम चौधरी वीर मराठा मावळा संघटनेचे सचिन पाटील संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील उदयनराजे भोसले ग्रुप सचिन पाटील विशाल परदेशी रवी ठाकूर अनिल भोई पत्रकार राहुल महाजन प्रतीक महाजन यांनी धुरध्वनी वरून अभिनंदन केले आहे .

जळगाव: पाचोरा कोविड-१९ केयर सेंटर मधून १० जणांना डिस्चार्ज

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा कोविड केअर सेंटर मधून आज १० जणांना.कोरोना उपचार पूर्ण करून सुट्टी देण्यात आली यात भडगाव मधील ९ व पाचोऱ्यातील एकाचा समावेश आहे. मात्र पाचोरा कोविड केअर सेंटर हे एका वेगळ्या अर्थाने चर्चेत आले असून ७ महिन्याच्या बालकापासून ते ७० वर्षीय वयोवृद्ध बाधितांवर यशस्वी उपचार करणारे केंद्र ठरले असुन याबद्दल सर्वत्र ‘समाधान’ व्यक्त केले जात आहे. यापूर्वी देखील पाचोरा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अमित साळुंखे यांनी राज्यात सर्वात प्रथम तालुकास्तरावर संशयीत कोरोना बधितांचे स्वब घेण्यास सुरुवात केल्याने कौतुकास पात्र ठरेल होते.त्यानंतर आता पुन्हा ७ महिन्याच्या बालकापासून ते ७० वर्षीय बाधित आजोबांवर यशस्वी उपचार करत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने आनंद निर्माण झाला आहे. उपचारात त्यांना विघ्नहर्ता कोविड केअरचे संचालक डॉ.भूषण मगर, व पाचोऱ्यातील अनेक खाजगी डॉक्टर्स यांची वेळोवेळी मोलाची मदत मिळाली आहे.

भडगाव शहरातील शनी चौक भागातील एका केवळ ७ महिन्यांच्या बालकाने कोरोनावर मात केल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला. आता पर्यंत पाचोरा येथील विघ्नहर्ता कोविड केअर सेंटर मध्ये यशस्वी उपचार करून अनेक बधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ.अमित साळुंखे डॉ.भूषण मगर , डॉ सुनील गवळी व होमियो पॅथिकतज्ञ डॉ. यशवंत पाटील यांच्यासह शहरातील विविध डॉक्टर्स या कोविड केअर सेंटर ला रुग्णसेवा देत आहेत.

तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आ.किशोर पाटील,उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहासिलदार कैलास चावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकड़े, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर व सर्वच अधिकाऱ्यांनी उत्तम समन्वय ठेवल्याने कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पाचोरा-भडगाव येथील कोरोना योद्ध्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण व गरजूंना मोफत शैक्षणिक साहित्य

पाचोरा येथील झेरवाल अॕकेडमी चा स्तुत्य उपक्रम

पाचोरा दि.२९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनजन्य परिस्थितीत अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, नगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार, माजी सैनिक यांच्या पाल्यांची शैक्षणिक क्लासेसची जबादारी झेरवाल अॕकेडमी घेणार आहे. यासाठी पालकांनी झेरवाल अॕकेडमीशी संपर्क साधून आपल्या पाल्यांच्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन झेरवाल अॕकेडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

झेरवाल अॕकेडमीच्या वतीने इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी दिली जाणार असून प्रत्येक बॅच मध्ये या पाल्यांना विशेष आरक्षण देण्यात आले आहे. तसेच इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना इंजिनियरिंग व मेडिकल साठीच्या घेतल्या जाणाऱ्या JEE व NEET या परीक्षांच्या तयारीसाठी सुद्धा सवलतीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,वह्या, पुस्तके, पेन इत्यादिंची मोफत वाटप देखील करण्यात येणार आहे. झेरवाल अकॅडमी च्या या स्तुत्य कार्यामुळे पाचोरा व भडगाव शहरातील असंख्य विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे संचालकांनी सांगितले. कोरोनाजन्य परिस्थितीत आरोग्य, पोलीस तसेच नगारपालिका महसूल विभागातील या कर्मचारी योद्ध्यांनी जीवाची बाजी लावून आपले काम प्रमाणिकते केले आहे.त्याबद्दल त्यांचे ऋण फेडले जाऊ शकत नाही मात्र अशा या योजनांमुळे आपण त्यांना मदत करू शकतो.असे मत झेरवाल अॕकेडमी च्या संचालकांनी व्यक्त केले आहे.यासोबतच 2020-21 या शैक्षणिक वर्षात अॕकेडमी मार्फत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात निपुण करण्याचे मानस असल्याचे संचालकांनी बोलून दाखवला आहे.

नाव नोंदणीचे आवाहन

कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या पालकांनी त्यांच्या कुटुंबातील इ.5 वी ते 12 वीत शिक्षण घेणा-या पाल्यांच्या क्लाससाठी लवकरात लवकर अॕकेडमीशी संपर्क करून आपल्या पाल्यांची नाव नोंदणी करावी. प्रत्येक वर्गात या विद्यार्थ्यांसाठी 35 टक्के कोठा आरक्षित ठेवण्यात आला आहे.
―संचालक
झेरवाल अकॅडमी

भाजपा तर्फे पाचोरा शहरात कोविड-१९ संसर्ग निवारणार्थ होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप

पाचोरा दि.२३:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे पाचोरा शहरात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील जि प सदस्य मधुभाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील विविध प्रभागात या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी जय किसान कॉलनी तसेच चिंतामणी कॉलनी व जयराम कॉलनी परिसरातील नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले पूर्ण विश्व संसर्गावर प्रतिबंधात्मक म्हणून शिफारशीत असलेल्या गोळ्यांचे वाटप करताना सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.