अंबड: लॉकडाऊन काळात जिवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री ; दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी

अंबड:नवनाथ चिंतामणी―मौजे साष्ट पिंपळगाव ता.अंबड लॉकडाऊन आणि संचारबंदी ची संधी साधत काही किराणा दुकानदार जीवनावश्यक वस्तुंची चढ्या दराने विक्री करत आहे.या संबंधी गावातिल अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाने आशा संधी साधू दुकानदार वर कडक कार्यवाही करवी.

आज संपुर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान पसरविले आहे.जवळ पास दोन महिन्या पासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली याची संधी साधु दुकानदार चढ्या दराने माल विक्री करत अडवनुक करत दुकानदार ग्रहाकास हवी असलेली वस्तू न देता दुसऱ्या कंपनीची वस्तू दिली जात आहे.

सहा महिने धान्य तुटवडा भासनार नाही असे निर्देश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यानी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांना अशा संधी साधु दुकानदारांवर कार्यवाही करत थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे ( छापे मारण्याचे ) आदेश द्यावेत. अशी मागणी जिजाऊ सेवाभावी संस्थेचे संस्थापक नवनाथ चिंतामणी, लक्ष्मण वैद्य व गावकरीदादासाहेब नजन, संदीप औटे, सम्रराट बोचरे , अंबदास औटे, सदाशीव बोचरे ,भिमा मारकड, बळी बोचरे, सचिन औटे, नानासाहेब जाधव व दिलीप माने यांच्या वतीने करण्यात येत आहे.