पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

नंदूरबार: सहा वर्षांच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

नंदुरबार दि.०१:आठवडा विशेष टीम― जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकलीसह 66 वर्षीय वयोवृद्धाने कोरोनावर मात केली आहे. या दोघांसह एकूण 9 रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते सह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.भोये यांनी कोरोना रुग्णाना पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला. कोविड संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात रजाळे येथील चिमुकलीसह 28 वर्षीय व 55 वर्षीय महिलांचा तसेच 31, 35 आणि 66 वर्षे वयाच्या पुरुषांचा समावेश आहे.

शिंदखेडा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारीदेखील संसर्गमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 28 असून 3 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अन्य 3 कोरोना बाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

कोरोना हा रोग उपचाराअंती बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

#CoronaVirus नंदुरबार येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये फवारणी

नंदूरबार:आठवडा विशेष टीम― शहरातील कोरोना योद्धा (पोलीस कर्मी) यांना आपल्या नंदुरबार संस्थेद्वारा खारीचा वाटा म्हणून प्रतिकार क्षमता वाढविण्यातही आयुष्य मंत्रालयाने सुचविलेला काढा(५ दिवस) वितरित करण्यात आला.उपनगर पोलीस स्टेशन येथे ८५, नंदुरबार शहर ट्रॅफिक १८५ तसेच नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन येथे १०५ पोलीस कर्मचाऱ्यांना काढा देण्यात आला. या वेळी एपीआय निळे, वाणी (ट्रॅफिक), पीआय पाटील, संस्थेचे सचिव डॉ. कृष्णा गांधी, विश्वस्त योगेशभाई पारेख, धनराज कातोरे, प्रशासकीय अधिकारी अनिल पाटील व सहयोगी उपस्थित होते. आपल्या कोरोना योध्याप्रती समाजाचे प्रेम पाहून भावनिक वातावरण निर्माण झाले होते. तसेच सचिव, डॉ. हेडगेवार सेवा समिती यांनी पोलीस कर्मी हे आपला जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सोशल डिस्टन्स पाळून सहकार्य करावे, असे आवाहन केले.


नंदुरबार: व्यवसायिकांना दुकानभाड्यात सवलत द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नंदुरबार:आठवडा विशेष टीम―घरभाड्यप्रमाणे व्यवसायिकांना दुकान भाडे माफ करण्यात यावे किंवा त्यामध्ये काही सवलत मिळावी. अशी मागणी व्यवसायिक भाडेकरुंकड़न करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरात अनेक लोक दुकान भाडेतत्त्वावर घेऊन उपजीविका चालवतात. लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. दुकानांना ४ हजारांपासून ४० हजारांपर्यंत दुकानभाडे आहे. लाईट बिल वेगळे असते. दुकाने बंद असल्याने छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. निवेदनावर संजय बारी, समीर चौधरी, विजय बारी, राकेश तांबोळी, जगदिश किशनचंद आदींच्या सह्या आहेत.

नंदुरबार: लॉकडाउन काळात आदर्श विवाह सोहळा

नंदुरबार:आठवडा विशेष टीम―नानाभाऊ ओंकार माळी यांची पुतणी व कैलास सुखदेव माळी (माळी समाज पंच) रा.नंदुरबार यांची बहीण चि.सौ.कां.आशा शांतीलाल सुरजन बिरारी यांचे चिरंजीव चेतन यांचे लग्न हे हंडा व कुठल्याही देवाण-घेवाणी शिवाय तब्बल दोन महिने अगोदर ठरले होते. पणकोरोनाच्या संकटातही दोन्ही कुटंबीयांनी प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे ठरविले. व वरपक्षाच्या धुळे येथील राहत्या घरीच ठरलेल्या तारखेस दि.१२ मे रोजी पाहणे मंडळींना आमंत्रित न करता दोन्ही कटंबातील मोजकेच ज्येष्ठ व्यक्तींच्या व या सोहळ्यासाठी दोन्ही बाजूने सकारात्मक वातावरण घडवून आणणारे विजय यादव माळी (कोषाध्यक्ष माळी समाज पंचनंदुरबार) यांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने हा विवाह पार पडला. त्यांच्या या समाज हिताच्या निर्णयाचे समस्त माळी समाज, नंदुरबार व धुळे तसेच माजी आ.चंद्रकांतजी रघुवंशी व उद्योजक मनोजभैया रघुवंशी यांनीही स्वागत करुन नववधुवरांस फोनवरून शुभेच्छा दिल्या.