गर्भपातासाठी शासनाच्या मंजुरीनंतरही एसओपीची अंमलबजावणी का नाही ?

अॅड.. सोनिया गजभिये यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर दि. २५/६ : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आता २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपात करण्याच्या मानक मार्गदर्शक कार्यपद्धतीस (एसओपी) राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य शासनाने हायकोर्टाला मागील सुनावणीत दिली होती. पीडितेने दाखल केलेल्या याचिकेवर राज्य शासनाने एसओपी आरोग्य विभागासह इतर सर्व संबंधित विभागांना पाठविली नसल्याचे हायकोर्टाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हायकोर्टाने सरकारी वकिलांना विचारणा केली की, राज्य शासनाने ३ जून रोजी एसओपी जारी केली असताना या एसओपीची अंमलबजावणी आजपर्यंत का करण्यात आली नाही? एसओपी पोलीस विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व आरोग्य विभाग, सरकारी रुग्णालये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासह सर्व संबंधित विभागांना पाठवावी, असे आदेश हायकोर्टाने दिले. हायकोर्टाने येत्या १६ जुलैपर्यंत राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

 
       २६ आठवडे सहा दिवसांचा गर्भ नष्ट करण्यासाठी महिलेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टाने दाखल याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्याचे आदेश हायकोर्टाच्या रजिस्ट्रीला दिले होते. तसेच २० ते २४ आठवड्यांपलीकडील गर्भ राहिल्यास तो नष्ट करण्यासाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करावी, असे आदेशही राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध प्रशासन विभागाला दिले होते. यानुसार राज्य शासनाने एसओपी तयार करून या अंतर्गत २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपात करण्यास मान्यता दिली आहे.

       दरम्यान लग्नाचे आमिष देऊन युवतीला गर्भवती केल्याप्रकरणी हायकोटनि मेडिकल बोर्डासह डीन व जिल्हा आरोग्याधिकारी यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. सावनेर येथील बावीस वर्षीय युवतीचे डब्ल्यूसीएलच्या एका कर्मचारी युवकासोबत प्रेमसंबंध होते. युवकाने तिला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे युवती गर्भवती राहिली. तिने ९ जून २०२४ रोजी तपासणी केली असता २६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे तिला समजले. गर्भ नष्ट करण्यासाठी फिर्यादी युवतीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

      मेडिकल बोर्डाने युवतीला गर्भपात करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे हायकोर्टाने याचिका निकाली काढत तत्काळ सर्व संबंधित विभागांना एसओपी पाठविण्याचे आदेश दिले. युवतीतर्फे अॅड. सोनिया गजभिये, राज्य शासनातर्फे अॅड. देवेंद्र चव्हाण, अॅड. आशिप कडूकर व केंद्र सरकारतर्फे अॅड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.

हायकोर्टाची विचारणा:

तत्काळ सरकारी रुग्णालयांसह सर्व संबंधित विभागांना एसपीओ जारी करा

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

Maharashtra Police Bharti – महाराष्ट्र पोलीस भरती होणार १० हजार जागांची ,लवकरच भरती होण्याचे संकेत ?

मुंबई:वृत्तसंस्था/आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस ( Maharashtra Police ) दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात १० हजार (10 thousands) तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी तसेच ग्रामीण युवकांना होईल, त्यांना पोलीस दलात Maharashtra Police सेवेची संधी मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार Ajit Pawar यांनी दिली आहे. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री अजित दादांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात महत्त्वाची बैठक झालेली असल्याचे वृत्त आहे. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, SRPF एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस भरती Police Bharti प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई Police Shipayi Bharti पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही Police Bharti भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही अजित दादा पवार यांनी व्यक्त केला असल्याचे वृत्त आहे.

राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन

महाराष्ट्र राज्यात १० हजार पोलीस शिपायांची Police Shipayi भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या बटालियनसाठी १ हजार ३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे तीन टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही महिला बटालियन स्थापन करण्यात येणार असल्याचेदेखील वृत्त आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या SRPF या केंद्रासाठी नागपूर ची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलीस सेवेत दाखल होण्याची मोठी संधी मिळेणार आहे. त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल असाही विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा―रामदास आठवले

नागपूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांना ना.रामदास आठवलेंनी दिले निर्देश

मुंबई दि.8:आठवडा विशेष टीम― नागपूरच्या नरखेड मधील पिंपळधरा गावातील यूपीएससी चा विद्यार्थी तरूण कार्यकर्ता अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी; आरोपींवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करावी तसेच क्राईम ब्रँच च्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी नागपूर चे ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ राकेश ओला यांना केली आहे.

अरविंद बनसोड यांचा संशयास्पद मृत्यू म्हणजे हत्या असल्याचा आरोप होत असून या हत्येचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध ना रामदास आठवले यांनी केला आहे.

आंबेडकरी तरुण अरविंद बनसोड (32 ) यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी आज नागपूर ग्रामीण च्या पोलिस अधीक्षकांना दूरध्वनी करून याप्रकरणी लक्ष देऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली.

अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपींवर ऍ ट्रॉ सिटी ऍक्ट तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा. त्यांचा अटक पूर्व जमीन रद्द करावा किंवा त्याची मुदत संपताच आरोपींना त्वरीत अटक करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.दिवंगत अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.


‘लॉकडाऊन’ मध्ये बचत गटाच्या बँक सखींनी केला दोन कोटी रुपयांचा बँक व्यवहार! ; 6 हजार 600 खातेदारांना घरपोच मदत

नागपूर, दि. 8:आठवडा विशेष टीम― बचत गटाच्या बँक सखींनी ‘लॉकडाऊन’च्या काळातही ग्रामीण भागातील महिलांना बँकेत पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार अत्यंत सुलभपण सुरु ठेवले आहेत. मागील तीन महिन्यात 6 हजार 605 खातेदारांना तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँक व्यवहार पॉस मशिनच्या सहाय्याने पूर्ण केला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ‘उमेद’ अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहायाने बचत गटाच्या बँक सखींनी बॅंकेचा व्यवहार पूर्ण करुन ग्रामीण भागातील बँकेच्या खातेदारांना मदत केली आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळातील सामाजिक अंतर ठेवत तसेच सॅनिटायझरचा वापर करुन ग्रामीण जनतेला बँकेच्या सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध करुन दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिलांना बँकेच्या व्यवहारासाठी शहरापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातच काम करणाऱ्या ‘उमेद’च्या बी.सी. सखींनी बँकेचे व्यवहार करुन मागील तीन महिन्यात तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँकिंग व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

बचत गटाच्या बँक सखींनी बँकेचे व्यवहार पूर्ण केले असून बी.सी. सखींनी व्याहाड येथील श्रीमती द्रोपदी टापरे यांनी ‘उमेद’ अभियानामुळे रोजगार मिळाल्याचे सांगताना बँकेच्या व्यवहारासंदर्भात काम करताना नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली. या काळात तब्बल 2 हजार 120 खातेदारकांची बँकेचा व्यवहार यशस्वी पूर्ण करुन 75 लक्ष 76 हजार रुपयांची देवाण-घेवाण पूर्ण केली आहे. गोंडखैरी येथील सिंडीकेट बॅंकेमार्फत बी.सी. सखी म्हणून ग्रामीण महिलांना ‘लॉकडाऊन’च्या कठीण काळातही मदत करण्याचा आनंद मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘उमेद’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बचत गटाच्या सदस्यांची बी.सी. सखी म्हणून निवड केल्या जाते. निवड केलेल्या सख्यांना बँकिंग व्यवहाराबाबत प्रशिक्षण दिल्यानंतरच संबंधित बँकेच्या शाखेमार्फत गावातील खातेदारांना बँकेतून पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते.

‘लॉकडाऊन’च्या काळात बँक सख्यांनी विशिष्ट कार्य केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व प्रकल्प संचालक विवेक इंदणे यांनी दिली. जिल्हा अभियान व्यवस्थापक रविंद परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बँक सखी’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

तुकाराम मुंढेंविरोधात नागपूर पोलिसांत तक्रार दाखल; सरकारी नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप

नागपूर दि.०७:आठवडा विशेष टीम कर्तव्यनिष्ठ, कडक, मेहनती अशी अनेक बिरुदे मिरवणारे अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाडीच्या कामामुळे ओळखले जातात. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये त्यांनी नागपूर येथे केलेली कामे आपण सर्वजण जाणतोच. अशात नागपूर येथे एका नागरिकाने गणेशपेठ पोलिसात तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या महापालिका आयुक्तांनी 200 लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप, तुकाराम मुंढे यांच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलिस आयुक्तांनी चौकशी सुरू केली असून यामुळे खळबळ उडाली आहे.मनीष प्रदीप मेश्राम रा. सिरसापेठ, नागपूर या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये व्हिडिओही सादर केला गेला आहे, ज्यामध्ये आयुक्त तुकाराम मुंढे दिसत आहेत. हॉटेल राजवाडा पॅलेसच्या हॉलमध्ये 31 मे, 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात, 200 लोकांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून भाषण करताना तुकाराम मुंढे दिसत आहेत. मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन झाले नाही.कोरोना साथीच्या काळात जेव्हा भारत सरकारने कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी दिली नाही, अशावेळी या कार्यक्रमात मुंढे यांनी उपस्थित राहून सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले. यासोबतच मुंढे यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून, 200 लोकांचे जीवन धोक्यात आणले असल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. मेश्राम पुढे म्हणतात, ज्या अधिकाऱ्याला शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक होण्यापासून, नागरिकांचे संरक्षण करण्याचे काम सोपविण्यात आले आहे, त्याच अधिकाऱ्याने अशा नियमांचे उल्लंघन करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यांतर आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

पोलिसांच्या उत्कृष्ट कार्यासाठी ७५ हजार रुपयांचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुपूर्द

नागपूर दि.५:आठवडा विशेष टीम― सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु व साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस विभागाने केलेल्या अत्युकृष्ट सेवेबद्दल पोलिस कल्याण निधीसाठी ७५ हजार रुपयांचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज दिला.
कोरोनाच्या संदर्भात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात पोलिस यंत्रणेने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून अहोरात्र सेवा बजावली. कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. सी. डी. मायी यांनी केंद्र शासनाकडून मिळणारी दोन महिन्यांची पेन्शन रुपये ७५ हजार पोलिस कल्याण निधीला दिली आहे. यावेळी पोलिस आयुक्त डॉ.भूषण कुमार उपाध्याय यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते कृतज्ञता निधी स्वीकारला.

डॉ. सी. डी. मायी हे जगप्रसिद्ध कापूस शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. श्री.मायी ॲग्रिकल्चर फायनान्स कार्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष असून भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात कृषी आयुक्त, कॉटन रिसर्च सेंटरचे डायरेक्टर, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्डाचे अध्यक्ष, आयएसएएए व एबीएनई या आंतरराष्ट्रीय संस्थेवर डॉ.मायी यांनी काम केले आहे.

#Philippines महाराष्ट्रातील जवळपास 200+ MBBSचे विध्यार्थी अडकलेत फिलिपीन्स देशामध्ये ; लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं !

पुणे:आठवडा विशेष टीम― एमबीबीएस (परदेशातील एमडी-डॉक्टर ऑफ मेडिसिन) या डिग्री कोर्स साठी फिलिपीन्स या देशातील दवावो,मनिला आणि सेबु या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यातील विध्यार्थी वैदयकीय शिक्षण घेत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपुर्ण जगावर होत आहे.अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा उपचार निघालेला नाही.फिलिपीन्स मध्ये आजच्या डीओएच च्या माहितीनुसार 2633 पॉसिटीव्ह केसेस आहेत तर 107 जणांचा मृत्यू … Read more

‘संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नाही’ ; स्मृती इराणींवर ‘जयदीप कवाडे’ यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

नागपूर : सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणूका जवळ आल्या आहेत काही जागेवर प्रचारही सुरू आहे.मात्र नागपूर मधून एक नवीन वादग्रस्त विधान समोर आलं आहे.पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. “स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही” असं वक्तव्य जयदीप कवाडे यांनी केले आहे.

काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांची प्रचारसभा नागपूरमधील बगडगंज भागात झाली. या सभेत जयदीप यांनी भाषणादरम्यान स्मृती इराणींना उद्देशून खालच्या पातळीवर टीका केली. जयदीप यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीप कवडेंना बाजूला बसवून शाबासकीही दिली.

निवडणूका जवळ आल्या की टिका होतच असतात परंतु टीका करताना सर्वच नेत्यांनी वक्तव्य करताना मर्यादा पाळल्या पाहिजेत. कारण काही अक्षेपार्ह टीकांनी वाद निर्माण होण्याची शक्यता आसतात.


लोकसभा निवडणूक 2019: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुर मध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले आमने सामने

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर झाली आहे. 21 उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील 5 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली आहे. या दुसऱ्या यादीत उर्वरित सर्व 16 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी लढत रंगणार आहे.आणखी दुसऱ्या यादीतही प्रियांका गांधी यांचं नाव आलेले नाही.

काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या यादीत नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

खुलताबादच्या डॉक्टरला एटीएस ने केली अटक

औरंगाबाद :इसिस (ISIS) या दहशतवाद पसरवण्याऱ्या संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने खुलताबाद येथील डॉक्टरला अटक केली आहे.इसिसच्या संपर्कात राहून घातपात घडवून आणण्याच्या संशयावरून एटीएसने जानेवारी मध्ये मुंब्रा व औरंगाबाद येथून 9 संशयितांना अटक केली होती.सदर डॉक्टर त्यांंच्या संपर्कात होता.असा दहशतवाद विरोधी पथकाचा संशय असून, डॉ.मोनीश असे अटकेतील डॉक्टरचे नाव असल्याचे समजते.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात इसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या काही तरुणांचा लग्न समारंभ अथवा अन्य गर्दी जमविणाऱ्या समारंभातील अन्न व पाण्यात विष कालवून घातपात करणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.यावरून त्यांनी मुंब्रा आणि औरंगाबाद येथे एकाचवेळी छापे मारले.या छाप्यात मुंब्रा येथून मझहर शेख , जम्मन खुठेउपाड , सलमान खान , फरहद अंसारी व एक अल्पवयीन तसेच औरंगाबाद येथून मोहम्मद सिराज उल्लाह खान , मोहम्मद लकी उल्लाह सिराज खान , काजी सर्फराज आणि मुशाहेद उल इस्माईल उर्फ तारेख अशा एकूण नऊ संशयितांना अटक करण्यात आली होती.ते सर्व सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यांंची तपासात बारकाईने चौकशी केली असता,खुलताबाद येथील एक डॉक्टर त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली.यावरून डॉ.मोनीश यांना सोमवारी बोलावून दिवसभर कसून चौकशी केली.आज सकाळी त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रानुसार समजते.