दिपक केदार यांच्यावरील गुन्हे मागे घ्या – संदीप जाधव ;आष्टी तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले

कडा | शेख सिराज―
ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या अटकेच्या निषेधार्थ तहसिल कार्यालय आष्टी येथे निवेदन सादर करण्यात आले .या विषयी सविस्तर माहीती अशी की दि . ६ डिसेबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन असतो.त्या ठिकाणी ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार अभिवादन करण्यासाठी जात असताना तेथील प्रशासनाने त्यांना घेराव घातला आणि त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर 353 सारखे खोटे गुन्हे दाखल केले आहे त्यामुळे दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आष्टीतालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार पंढरपूर साहेब यांच्याकडे रीतसर निवेदन देण्यात आले आहे. यावेळी ऑल इंडिया तालुकाध्यक्ष संदीप जाधव उपाध्यक्ष गोरख निकाळजे सचिव अभिषेक शिंदे सरचिटणीस अशोक वाघमारे गौतम कांबळे अजय बोराडे सुनील खंडागळे डॉ आश्राजी खंडागळे नागेश लोंढे सुनील काळे संतोष जाधव सह सर्व पॅंथर सैनिक उपस्थित होते.

अवकाळी व गारव्यामुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करा ― अजीमोद्दीन शेख

आष्टी/प्रतिनिधी(शेख सिराज): दि.6 रोजीआष्टी तालुक्यात अवकाळी व गारव्यामुळे झालेल्या शेती पिकाचे पंचनामे महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ करण्यात यावी. तालुक्यात प्रामुख्याने कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते सध्या अवकाळी पाऊस ,गारा आणि धुके या दूषित वातावरणामुळे सर्व शेती मालाचे नुकसान झाले आहे. तरी आपण तात्काळ महसूल विभाग कृषी विभाग यांना प्रत्यक्षात शेतात पाहणी करून शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत. या सततच्या निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हवालदिल झालेला आहे. संपूर्ण रब्बी पीक धोक्‍यात आले व कांदा पिकाचे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघटना बीड जिल्हा अध्यक्ष शेख अजोमोद्दिन यांनी केली आहे.

जनआधार मिडिया प्रमुख पदी रफीक शेख व शिवा म्हस्के याची निवड

कडा प्रतिनिधी (शेख सिराज)― जन आधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचा विस्तार व पद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

संघटनेचे पद निवड कार्यक्रम पार पडला या वेळी अनेक खांदे पलट संघटनेत झाले. या संघटनेच्या जिल्हा मिडिया प्रमुख पदी रफीक शेख व शिवा म्हस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी सामाजिक कार्यत पत्रकारिता मध्ये नेहमी अग्रेसर असणारे शिवा म्हस्के यांची संघटनेच्या जिल्हा प्रमुख पदी निवड झाली आहे. तसेच रफीक शेख यांची सोशल मीडिया प्रमुख पदी निवड झाली आहे.या मुळे सर्व स्तरातून या निवडीच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. जन आधार संघटना सामान्य माणसाचा खर्या अर्थानं आधार झाली आहे. कुठं हि अन्याय होईल तिथे जन आधार संघटनेच्या माध्यमातून आवज उठवण्याच काम जन आधार स़ंघटना करत आहे.
संघटनेच्या विस्तारा वेळी जन आधार संघटनेच्या अध्यक्ष प्रकाश पोटे, उपआध्यक्ष,शिवा म्हस्के, रफीक शेख. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आष्टी तालुक्यात रासायनिक खते चढ्या भावाने विक्री – शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

कडा:शेख सिराज―
अधिच कोरोना सारख्या जागतीक महामारीने व निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे आष्टी तालुक्यात कांदा हे मुख्य पिक आहे. आता कांद्याला रासायनिक खते देण्याच्या वेळी खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
ज्या ठिकाणी खते मिळतात तेथे चढ्या भावाने म्हणजे कंपनीच्या सुधारित भावापेक्षा २०० ते २५० रूपये किंमत जास्त मोजावी लागते. पक्या बीलाची मागणी केली तर खत शिल्लक नाही असे उत्तर येते ज्यांना वीस पंचवीस बॕग ठेवण्याचे परवाना आहे त्यांच्याकडे चारशे ते पाचशे बॕगेचा साठा आहे. हि परिस्थिती आष्टी तालुक्यात सर्रास दिसून येते यावर कुठंलही अधिकारी वर्गाचे वचक दिसून येत नाही.
रोज संध्याकाळी साडेसात वाजता टिव्हीवर आर सी एफ सुफला मुबलक प्रमाणात आहे अशी जाहिरात येते ती फक्त शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच..!
हि सर्व परिस्थिवर कृषी विभागाने लवकरात लवकर किंवा प्रशासकिय यंञणेने शेतकर्यावरील होणारा अन्याय व शेतकर्यांचे होत असलेले शोषण कुठल्याही परिस्थित थांबले पाहिजे.दोषी कृषी सेवा केंद्रावर तत्काळ दंडात्मककार्यवाही केली पाहिजे. तसेच क्रूषीसहाय्यक यांनी उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा मूख्यालयी राहुन काम पहावे याविषयी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री शेख आजमोद्दीन व सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी तालूका क्रूषी अधिकारी यांचेकडे फोनवर संवाद साधत तक्रार केली आहे त्यांना अशाप्रकारे कुणी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे परत तक्रार आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ऊंदरखेल येथे भोन्याआई मंदिरात घटस्थापना

कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथील जागृत देवस्थान तुळजापूरचे उपस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोन्याआई मंदिरात गुरुवार दिनांक.7 ऑक्टोबर रोजी विधिवत पुजाअर्चा करून मोठ्या उत्साहात ऊंदरखेल ग्रामस्थ व देवीभक्तांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.निसर्गरम्य वातावरणात असलेले देवीचे मंदिर हे पंचक्रोशीत प्रख्यात आहे. भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.भोन्याआईच महात्म्य प्रसिद्ध आहे.दरवर्षी ऊंदरखेल येथील तरुण श्री क्षेत्र तुळजापूर ते ऊंदरखेल हेअंतर पायी चालत देवीची ज्योत घेऊन येतात.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी असुन सुध्दा तरुण पायी ज्योत आणली जात आहे. ही ज्योत ऊंदरखेल ते तुळजापूर पायी चालत घेऊन यायचे गेल्या सहा वर्षांपासूनची परंपरा कायम आहे.यामध्ये जवळपास दिडसे ते दोनशे तरुण सहभागी होतात.ऊंदरखेल आणि परिसरात भोन्याआई मातादेवीचे महात्म आहे.संपूर्ण पंचक्रोशीत ही देवी नवसाला पावते म्हणून तिची ख्याती आहे.ऊंदरखेल ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेभावाने नवरात्र महोत्सव साजरा करतात. नऊ दिवस विविध कार्यक्रमाने नवरात्री साजरी करण्यात येते.

सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी पाच कोटी निधी मंजुर ;सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके व युवा सेना दिपक डहाळे यांच्या आमरण उपोषणाला यश

कडा:शेख सिराज―
(आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडुन आमदार आजबे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामसाठी पाच कोटी निधी मंजुर करून आरोग्य विभाग व प्रशासनाने दिले लेखी पत्र) आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी पाच कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांच्या सह युवा सेना तालुका अध्यक्ष दिपक डहाळे यांनी आमरण उपोषणाला चार दिवसांनी मागधी मंजुर झाला.आरोग्य केंद्राची इमारत हि गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त झाली असून या संदर्भात या विभागास वेळोवळी निवेदन देऊन सुध्दा नवीन आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू न केल्यास स्वातंत्र्यदिनी 15आगस्ट रविवार पासुन सामाजिक कार्यकर्ते व युवा सेना तालुका अध्यक्ष यांच्या सह गावातील ग्रामस्थ व त्रेचालिस गावातील नागरिकांचा पाठींबा या उपोषणाला दिसून आला.
आज दि18आगस्ट बुधवारी उपोषणाचा चोथा दिवस आमरण उपोषण करांच्या मागनिला येश मिळाले. आमदार बाळासाहेब आजबे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडुन पाच कोटी निधी केला असल्याचे लेखी पत्र संबंधित उपोषण करते यांना देण्यात आले.व आमदार बाळासाहेब आजबे यांनी उपोषण करते यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पुर्ण करुन देण्याचे आश्वासन दिले.
तसेच या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड सह , तालुका आरोग्य अधिकारी शिंदे मॅडम, तहसीलदार दळवी मॅडम ,गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी मोरे साहेब, यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आश्वासन दिले. उपोषणकर्त्यांनी ग्रामस्थांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे आमदार बाळासाहेब आजबे ‌ आरोग्य अधिकारी व प्रशासनाचे आभार मानले.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत अमोल दहातोंडे यांनी केली पूरग्रस्तांना मदत

कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील ऊंदरखेल येथील अमोल दहातोंडे या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या वाढदिवस साजरा न करता आपल्या समाज बांधवांनवर नैसर्गिक आपत्ती आली असून त्यामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून दहातोंडे याने पूरग्रस्तांसाठी मदत केली
‌ गेल्या आठवड्यात कोकण विभागातील रायगड ,रत्नागिरी,सिंधुदुर्ग ,जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे शेकडे लहान मोठी वयोवृद्ध माणूस बेघर झाली. मात्र या काळात सामाजिक बांधिलकी जपत अमोल दहातोंडे या तरुणांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत पूरग्रस्तांना पार्ले बिस्कीटचे बॉक्स पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून या तरुणाने मदत केली.

धानोरा- हिवरा रोडवर भिषण अपघात दोन ठार तर एक गंभिर जखमी

कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील दि 29 रोजी धानोरा -हिवरा रोडवर भिषण अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकिंची समोरा-समोर धडक झाल्याने अपघातात घडला.दोघे दुचाकी चालक जागिच ठार झाले तर महीला संगीता घोडके गंभिर जखमी झाल्या असुन त्यांना उपचारासाठी अ.नगर येथे नेहण्यात आले.धानोरा -हिवरा रोडवल वरती धोंड काॅलेज जवळ हा भिषण अपघात घडला.वाळके वस्ती,सु.देवळा येथिल एकनाथ घोडके व त्यांच्या पत्नी संगिता घोडके हे दवाखान्यत चालले होत र्‍यांचा दुचाकी बाॅक्सर क्र.MH 14 Y 6252धानोर्‍या कडे जात असताना समोरून येत असलेल्या पल्सर क्र.MH 12 PQ 4359 ची भरधाव वेगाने जोरदार धडक झाली.यामध्ये बाॅक्सर चालक एकनाथ घोडके व पल्सर चालक गणेश भोसले हे जागिच ठार झाले तर संगिता घोडके गंभिर जखमी. पि. ए.म साठी कडा रुग्णालयात नेण्यात आले.

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी बबलू सय्यद

कडा /प्रतिनिधी:शेख सिराज―
डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे बीड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन तेजवार्ता न्यूज नेटवर्क चे संपादक बबलूभाई सय्यद यांची बीड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संतोष मानकर यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली यामध्ये आष्टी तालुक्यातील तेजवार्ता हे डिजिटल प्रिंट मिडीया माध्यम चालवणारे बबलू सय्यद हे राज्यभर सुपरिचित आहेत .त्यांच्या सार्थ निवडीबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला. सय्यद बबलू यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा शिवसंग्राम चे नेते गणेश पांडुळे ,जनता कॉलेजचे प्राचार्य विक्रम बांदल ,मुख्याध्यापक भाऊसाहेब लांडगे ,उपप्राचार्य नामदेव चव्हाण ,उपमुख्याध्यापक उत्तम गव्हाणे, तसेच सर्व शिक्षक वृंद मित्रपरिवार, कवी प्रेम (प्रीतम) पवळ ,सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके. आष्टी पोलीस दादासाहेब उदावंत .पत्रकार अनिल मोरे, संदीप जाधव ,आयुब मोमिन ,अनिस मोमिन, महादेव वामन, हमजान शेख ,राहुल आडकर, शेख सिराज ,कासम शेख ,राजू शेख ,तसेच तेजवार्ता टीम व सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वाहिरा गावात घातला पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ

कडा/ प्रतिनिधी:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे घातला पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ, गावातील मैनीनाथ झांजे, केसरबाई आटोळे मा.सरपंच , प्रतिभा झांजे , यांना कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले.
मैनीनाथ झांजे हे रात्री दहाच्या सुमारास घराच्या बाहेरील पढवीमध्ये झोपले असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावरती त्यांच्या तोंडाला खूप मोठा चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्यावर ते ओरडले त्यानंतर त्याला मारण्यासाठी त्यांच्या सूनबाई प्रतिभा झांजे या बाहेर आल्या असताना कुत्र्याने त्यांच्यावर सुद्धा चावा घेतला. केसरबाई आटोळे यांच्यावर सुद्धा चावा घेऊन पूर्ण गावात धुमाकूळ घातला जनावरांना चावा घेतला.
सकाळी मैनीनाथ झांजे, केशरबाई आटोळे, प्रतिभा झांजे ,यांना आष्टी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असताना ते खूप जखमी असल्यामुळे त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेता आला नाही त्यामुळे त्यांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपच्यारा साठी नेण्यात आले.

बीड: शौकत पठाण यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड

कडा/प्रतिनिधी शेख सिराज― राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभाग बीड जिल्हा सरचिटणीस पदी युवानेते शौकत पठाण यांची निवड करण्यात आली आहे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष पठाण यांनी दि. 15 जुलै रोजी बीड येथे निवडीचे पत्र दिले आ. संदीप शिरसागर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सय्यद जफर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली .त्यावेळी राजू माळी, जफर सय्यद ,अरबाज शेख ,सतीश गव्हाणे समीर पठाण शिवा शेकडे ,हौसराव शिरसाठ ,दादा जपकर ,आदी उपस्थित होते
तालुक्यातील तागडखेल येथील युवा नेते शौकत पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदावर काम करताना चुनुक दाखवल्याने अल्पसंख्यांक विभागाने त्यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड केली . पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळून पक्षाध्यक्ष मा.खा.शरद चंद्रजी पवार साहेब यांचे विचार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असे पठाण यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल आमदार बाळासाहेब आजबे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी डॉक्टर शिवाजी राऊत ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे,प.स. सदस्य संदीप अस्वर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा उपाध्यक्ष बाळासाहेब गर्जे ,शहराध्यक्ष नाजिम शेख ,अक्षय हळपावत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यांच्या निवडीनचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सर्वशाखीय सोनार युवा सेनेच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी दिपक डहाळे यांची निवड

आष्टी:शेख सिराज― आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील दिपक बाबासाहेब डहाळे यांची सर्वशाखीय सोनार युवा सेनेच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे यांनी निवड केली. दिपक डहाळे हे सध्या आष्टी तालुका युवा सेना कॉलेज कक्ष प्रमुख म्हणून काम करीत असून त्यांचे राजकीय सामाजिक कार्य हे उल्लेखनीय असल्यामुळेच त्यांची सर्वशाखीय सोनार युवा सेनेच्या आष्टी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. समाजाच्या न्याय व हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडवणे त्या समस्या सोडवुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देणे.
समाजाला वेगवेगळया योजनाची माहिती देणे, त्या योजना त्यांच्यापर्यत पोहचुन त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणे,लोकांना काही शासकिय अडचणी येत असेल त्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे अशी विविध कामे या संघटनेद्वारे केली जातात. त्यांची निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख प्रशांत टाक रवि माळवे मराठवाडा प्रमुख विनोद चिंतामणी जगदीश काजळे अनिल उंबरकर आदींनी अभिनंदन केले आहे.

डोंगरगण येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा

कडा/ प्रतिनिधी:शेख सिराज― दि. 11 जुलै रविवार रोजी आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आष्टी पंचायत समितीचे माननीय गट विकास अधिकारी श्री मुंढे साहेब ,अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री कुकलारे साहेब, डोंगरगण गावचे सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ व सर्व तरुण वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व अतिथींचे रोप देऊन स्वागत करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गटविकास अधिकारी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आणि या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले येणाऱ्या काळात वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे आणि आपण सर्वांनी ती जोपासली पाहिजे .या वृक्षप्रेमी युवकांचे माननीय साहेबांनी कौतुक केले .असेच उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक गावातील युवकांनी पुढे आले पाहिजे असे आव्हान त्यांनी सर्व ग्रामस्थांना केले. कार्यक्रमाला उपस्थित अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय कुकलारे साहेब यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश चव्हाण यांनी केले तर काकासाहेब चव्हाण यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांचे आभार मानले.

सुलेमान देवळा येथे मोफत ॲटीजन टेस्ट कॅम्प

कडा:शेख सिराज―
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे मोफत एंटीजन टेस्ट कॅम्प ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की यामध्ये एकूण दिडसे टेस्ट मोफत करण्यात आल्या . यामध्ये 149 टेस्ट निगेटिव्ह आल्या व एक टेस्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली नागरिकांनी टेस्ट कॅम्पला उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने टेस्ट करून घेण्यात आले. व्यक्ती पॉझिटिव निघाली असून त्यांना कामधेनु कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले .असेच सर्वांनी सहकार्य केले तर गाव कोराना मुक्त होण्यासाठी वेळ लागणार नाही असे आव्हान करण्यात आले . गावचे सरपंच नामदेव घोडके , उपसरपंच शरद अंबादास घोडके, आजिनाथ गायकवाड , पांडुरंग घोडके , बाळासाहेब तोरडमल , हरिओम घोडके, माऊली घोडके , शहानवाज पठाण (पत्रकार) ,पंडित घोडके , भाऊसाहेब सुंबे, परमेश्वर घोडके, भरत जालिंदर घोडके, अमोल डहाळे, नंदू घोडके,पवन येवले, अक्षय घोडके, दिपक दहाळे,भिमराव भादवे, आकश खोरदे, सोहेल पठाण, आप्पा वाडेकर,आजिनाथ गडकर, बाबु पठाण, तसेच वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे २०२१ कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित व पञकार कासम शेख यांना जाहीर

कडा:शेख सिराज―
आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील मराठवाडा साथी चे पत्रकार शेख कासम व कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे हे दोघेनां २०२१ कोविड योद्धा पुरस्कार मिळाला अधिक माहिती अशी की,सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले असून त्यातून आपले आष्टी तालुका देखील सुटलेले नाही.गेल्या वर्षी शहरी भागात रुग्ण निघत होते.परंतु ह्या वेळी त्याचे लोन ग्रामीण भागात देखील पहावयास मिळत आहे.कित्येक लोकं अशी आहेत की ते शेजारी कोरोना रुग्ण निघाला तर बोलत सुद्धा नाहीत.अशा संकट समयी आपले समाजाला काही तरी देणं लागतं ह्या नियतीने शक्य होईल तितके कोरोना विरुद्ध लढत आहेत सामाजिक बांधीलकीची जाण ठेऊन कार्य करीत आहेत.याचीच दखल घेऊन अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ विश्वात्मक मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि ९ मे रोजी सांय. ६ वाजता राज्यस्तरीय कोविड योद्धा समाज रक्षक महासन्मान २०२१ हा पुरस्कार कृषिभूषण बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे यांना ऑनलाइन मानपत्र देऊन गौरविण्यात आला आहे.तर १२ मे रोजी सांय ६ वाजता पञकार कासम शेख यांचा सन्मान होणार आहे.ह्या वेळी मार्गदर्शक म्हणून पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा हे उपस्थित राहणार आहेत.ह्या कार्यक्रमाची संकल्पना कृष्णाजी जगदाळे यांची असून पुरस्कार प्राप्त शेख व पिसोरे यांच्यावर मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.