पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

बीड जिल्ह्यात ३ ऑगस्ट रोजी ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह ; पाटोदा तालुक्यातील अंमळनेरचा १ पॉझिटिव्ह

बीड दि.०३ ऑगस्ट:आठवडा विशेष टीम― आज (दि.०३ ऑगस्ट २०२०) रोजी सायंकाळी ०९.४५ वाजता आलेल्या कोविड-१९ चाचणी अहवालात बीड जिल्ह्यातील ५६ जण कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह निघाले आहेत.आज एकूण ३४८ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी २८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत.तसेच ०८ जणांचे अहवाल अनिर्णित स्वरूपात आहेत.

पाटोदा तालुक्यातील ०१ जण – ३७ वर्षीय पुरुष (रा.अंमळनेर ता.पाटोदा) पॉझिटिव्ह आहे. बीड तालुक्यातील ११ जण – ४९ वर्षीय पुरुष (रा पंडीत नगर ,ग्रामसेवक कॉलनी,नगररोड,बीड शहर) ८२ वर्षीय महिला (रा.राष्ट्रवादी भवन समोर,बीड शहर) १० वर्षीय महिला (रा.कृष्णमंदीर परिसर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २० वर्षीय पुरुष (रा शाहशाह नगर,लेंडी रोड,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ४५ वर्षीय पुरुष (रा.कामखेडा ता.बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ६९ वर्षीय महिला (रा.शहंशाह वली दरगाह रोड,बीड शहर) ३१ वर्षीय महिला (रा .सोमेश्वर नगर, बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४० वर्षीय पुरुष (रा.तेलगाव नाका,बीड शहर ,पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे) ५३ वर्षीय पुरुष (रा.चौसाळा ता.बीड) ६२ वर्षीय पुरुष (रा.पालवण ता बीड पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २५ वर्षीय पुरुष (रा.सम्राट चौक, शाहुनगर,बीड शहर). परळी तालुक्यातील १६ जण पॉझिटिव्ह आहेत– ३५ वर्षीय महिला (रा.लक्ष्मी मार्केट,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ५८ बर्षीय महिला (रा. लक्ष्मी मार्केट, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४५ वर्षीय महिला (रा.प्रेमप्रज्ञा नगर,मोंढा मार्केट परळी शहर) १८ वर्षीय पुरुष (रा.गांधी मार्केट,परळी शहर) ३५ वर्षीय महिला (रा.पदमावती कॉलनी,परळी शहर) ३८ वर्षीय पुरुष (रा.लटपटे हॉस्पिटल जवळी ,परळी शहर) ३६ वर्षीय पुरुष (रा. पदमावती कॉलनी परळी शहर) ३२ वर्षीय महिला (रा.भिमवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २७ वर्षीय पुरुष (रा भिमवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४० वर्षीय पुरुष (रा.कन्हेरवाडी ता.परळी) २६ वर्षीय पुरुष (रा.नाथनगर,परळी शहर) ३५ वर्षीय महिला (रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) १७ वर्षीय महिला (रा धर्मापुरी ता .परळी पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २२ वर्षीय महिला (रा.विद्यानगर परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ४५ वर्षीय पुरुष (रा.स्वातीनगर,परळी शहर) ५० वर्षीय पुरुष (रा हमालवाडी ता.परळी). अंबाजोगाई तालुक्यातील ०७ जण पॉझिटिव्ह आहेत– ४५ वर्षीय पुरुष (रा.रमाई नगर,अंबाजोगाई शहर) ५१ वर्षीय पुरुष (रा.पारीजात कॉलनी,अंबाजोगाई शहर) ३४ वर्षीय पुरुष (रा.सावरकर चौक, मंगळवारपेठ,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) २५ वर्षीय महिला (रा.सदर बाजार, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ०५ वर्षीय पुरुष (रा ,प्रशांतनगर,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) ०७ वर्षीय महिला (रा.प्रशांतनगर,अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ५३ वर्षीय पुरुष (रा मोदीशाळे जवळ,अंबाजोगाई शहर).केज तालुक्यातील ०६ जण पॉझिटिव्ह आहेत– ३९ वर्षीय पुरुष (रा ढाकेफळ ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत ) २२ वर्षीय पुरुष (रा.आरणगाव ता.केज पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ३५ वर्षीय पुरुष ( रा .आनंदनगर,धारुर चौक,अंबाजोगाई रोड,केज शहर पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासीत) ४८ वर्षीय पुरुष (रा.समर्थ मठ, देशपांडे गल्ली,केज शहर, पॉझिटिव्ह रुग्णाची सहवासीत) ६२ वर्षीय पुरुष (रा.माधवनगर केज शहर) ६० वर्षीय पुरुष( रा गांजी (शेलगाव) ता केज.).धारूर तालुक्यातील ०५ जण पॉझिटिव्ह आहेत– ०३ वर्षीय पुरुष (रा.स्वाराज्य नगर,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) ३१ वर्षीय महिला (रा. स्वाराज्य नगर,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) ३० वर्षीय पुरुष (रा.मठ गल्ली ,कसबा,धारुर शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) २१ वर्षीय पुरुष (रा घागरवाडा ता.धारुर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत) ७६ वर्षीय पुरुष (रा आर्यसमाज मंदीरच्या जवळ,काशीनाथ चौक).अशी बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेल्या ५६ जणांची माहिती आहे.

CoronaVirus बीड: आज ३ जण पॉझिटिव्ह ,८ स्वॅब अनिर्णित | Three Covid19 cases reported today

बीड जिल्हा कोरोना अपडेट

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज दि.०६ जुलै रोजी १९७ स्वॅब कोविड-१९ RT-PCR चाचणी साठी पाठवले होते.आज पाठवलेल्या सदरील स्वॅब पैकी ३ जणांचे अहवाल कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह आले आहेत.१८६ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.आणखी ८ स्वॅब अनिर्णित स्वरूपात आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण―

  • ०१ -एसबीआय,परळी ३४ वर्षीय पुरुष,
  • ०१ -अशोक नगर,धारूर १० वर्षीय मुलगा(मुंबई हुन आलेला)
  • ०१ – शिक्षक कॉलनी,मोरेवाडी,अंबाजोगाई,४५ वर्षीय पुरुष (एसबीआय बँक,परळी येथील कर्मचारी)

बीड: शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवणीबाबतच्या तक्रारी दाखल करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

बीड, दि.२९:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० सुरु झाला असून सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केलेली आहे परंतु सोयाबीन बियाणे उगवणीबाबत तक्रारी येत आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवणी बाबत तक्रार असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांची लेखी तक्रार संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचेमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावी. सोबत आपल्या बिलाची साक्षांकित प्रत अर्जासोबत कार्यालयात जमा करावी. अशा प्राप्त तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची नोंद सर्व शेतकऱ्यानी घ्यावी. त्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशा प्रकारचे कृत्य करू नये. दोषी आढळलेल्या बियाणे कंपनी तसेच इतर दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तरी अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन योग्य उगवण क्षमता तपासूनच व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड यांनी केले आहे.


Updated: बीड जिल्ह्यात दि.८ सोमवारी ६ जण कोरोना पॉझिटिव्ह ,अहवालात मयत व्यक्तीचा समावेश

बीड दि.८:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज २२ स्वॅब कोविड-१९ RT-PCR चाचणीसाठी पाठवले होते त्यापैकी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर १५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे व १ जणाचा अहवाल inconclusive आहे.

सदरील सहा कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील आहे त्याचे वय १० वर्ष मुलगा अशी माहिती आहे.व दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण वय १८ स्त्री, गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील आहे.तीन पॉझिटिव्ह मसरत नगर, बीड (हैदराबादहून आलेले) येथील आहेत. आणि एक जण मातावळी ता.आष्टी वय ३५ पुरूष (मुंबईहून आलेला) येथील आहे. मतावळी येथील रुग्ण मयत झाला आहे.

बीड: आज दि.८ सोमवारी दोन जण पॉझिटिव्ह ,गेवराई व धारूर तालुक्यातील रुग्ण

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज २३ स्वॅब कोविड-१९ RT-PCR चाचणीसाठी पाठवले होते त्यापैकी २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे व ११ जणांचा अहवाल आणखी प्रतीक्षेत आहे.

सदरील दोन कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील आहे त्याचे वय १० वर्ष मुलगा अशी माहिती आहे.व दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण वय १८ स्त्री, गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील आहे.

बीड जिल्ह्यात आज २ महिला कोरोना पॉझिटिव्ह ; धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रुग्ण

बीड दि.६:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातून आज शनिवारी पाठवण्यात आलेल्या ५३ स्वॅबपैकी २ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील आणि मुंबई वरून आलेल्या असलेल्या दोघांचा त्यात समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ३२ व २५ वर्षे दोन्ही महिला- रा.आंबेवडगाव ता.धारूर – मुंबईहून आलेले अशी आजच्या कोरोनाग्रस्थाची माहीती आहे.

५३ पैकी २ पॉझिटिव्ह तर ४७ निगेटिव्ह आले असून उर्वरित ४ अनिर्णित असल्याचे प्रशासनाने सांगितले. यापूर्वीही आंबेवडगाव येथे १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला होता.सर्वांनी सोशल डिस्टन्स ,साबणाने हात धुणे ,मास्क लावून बाहेर पडणे इत्यादीचे कोरोनापासून बचावासाठी पालन करणे गरजेचे आहे.

बीड : आता धारूरमध्ये देखील कोरोना रुग्ण ,आज जिल्ह्यात १३ अहवाल पॉझिटिव्ह

बीड दि.२१:आठवडा विशेष टीम काल बुधवारी (दि.२०) रोजी पाठलिलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी प्रलंबित असलेल्या १३ जणांचे कोविड-१९ अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने बीड जिल्ह्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आज आलेल्या अहवालात १२ कोरोनाग्रस्त माजलगाव तालुक्यातील असून १ जण धारूर तालुक्यातील आहे.

आजच्या कोविड-१९ चाचणी अहवालानुसार माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील ११, सुर्डी येथील एक आणि धारूर तालुक्यातील कुंडी येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. हे सर्वजण मुंबईहून बीड जिल्ह्यात आले होते.आजच्या अहवाला नुसार धारूर तालुक्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोग्रस्तांची संख्येचा विचार केला असता माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट केंद्र बनला आहे.

कोरोना कोव्हीड 19 – बीड जिल्हा अपडेट
दिनांक21/05/2020
विदेशातून आलेले – 124
होम क्वारंटाईन – 06
होम क्वांरटाईनमधून मुक्त – 118

परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले – 9399
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन – 20

एकूण पाठविलेले स्वॅब – 719
एकूण निगेटिव्ह स्वॅब – 643
एकूण पॉझिटिव्ह स्वॅब – 37
आज पाठविलेले स्वॅब – 32
प्रलंबित रिपोर्ट – 32
Inconclusive sample_07
———
ऊसतोड मजूरांचे प्रवेश – 47136

कंटेन्मेंट झोन

1) इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामधील 4740 नागरिकांचा सर्वे 14 टीम मार्फत करण्यात आला आहे.
2) हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818 घरामधील 3397 नागरिकांचा सर्वे 7 टीम मार्फत करण्यात आला आहे.
3) पाटण सांगवी ता. आष्टी येथील कंटेन्मेंट झोन मध्ये05 गावांचा समावेश असून 1276 घरामधील 6271 नागरिकांचा सर्वे 13 टीम मार्फत करण्यात आला आहे.
4) कवडगावथडी ता. माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1076 घरांमधील 5096 नागरिकांचा सर्वे 07 टीम मार्फत करण्यात आला आहे.
5)चंदन सावरगाव ता कैज येथील कंटनमेंट झोन मध्ये 04 गावांचा समावेश असून 1349 घरामधील 8730 नागरिकांचा सर्वे 04 टीम मार्फत करण्यात आला आहे.
6) केळगाव ता केज येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 05 गावाचा समावेश असून 1276 घरामधील 6835 नागरिकांचा सर्वे 05 टीम मार्फत करण्यात आला आहे.
7) मोमीनपुरा,बीड शहर,येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 173 घरांमधील 1028 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत सर्वे करण्यात आला आहे
8)जयभवानी नगर ,बीड शहर 98 घरांमध्ये 455 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत सर्वे करण्यात आला आहे.
9) वडवणी शहर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 388 घरांमध्ये 2853 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत करण्यात आला आहे.
10) पाटोदा शहर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 2710 घरांमध्ये 19700 नागरिकांचा सर्वे 30 टीम मार्फत करण्यात आला आहे.
11) वहाली येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 804 घरामध्ये 3560 नागरिकांचा सर्वे 08 टीम मार्फत करण्यात आला आहे.


#CoronaVirus बीड: धारूरच्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह

धारूर:आठवडा विशेष टीम― शहरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा होती. त्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात काल एका महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची अफवा शहर व तालुक्यात झपाट्याने पसरली होती. संबंधित महिलेस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चेतन आदमाने यांनी अंबाजोगाई येथे पाठविले. यानंतर तिचा नमुना तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला होता. या नमुन्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला असुन तो निगेटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत तालुक्यातून ६ संशयितांचे नमुने तपासले आहेत.

पंकजाताई मुंडे यांनी आणलेली ग्रामीण रस्त्याची १०८ कोटीची कामे रद्द ,हे तर बीडच्या पालकमंत्र्यांचे अपयश―राजेंद्र मस्के

बीड दि. ०२:आठवडा विशेष टीम― पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बीड जिल्हयासाठी मंजूर केलेली १०८ कोटीची ग्रामीण रस्त्यांची कामे रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. विद्यमान पालकमंत्र्यांचे हे अपयश असून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी ते जिल्हयाला विकासा पासून वंचित ठेवण्याचे पाप करत आहेत अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र … Read more

संपूर्ण देश लाॅकडाऊन असताना कारखान्यांनी कामगारांना वेठीस धरणे, हा कुठला न्याय? – ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली तीव्र नापसंती

ऊसतोड कामगारांविषयी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा मुंबई दि.०२:आठवडा विशेष टीम― भिगवण व खेड येथे ऊसतोड कामगारांना झालेल्या मारहाणीवर पंकजाताई मुंडे यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. ऊसतोड कामगार हे रस्त्यावर विनाकारण फिरणारी मंडळी नाहीत, हे प्रशासनाने ध्यानात घ्यावे असे सांगत सरकारने ऊसतोड कामगारांच्या बाबतीत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. … Read more

बीड: शासनाच्यावतीने विविध अनुदान शेतकरी नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये जमा करणार –जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रक्कम काढण्यासाठी संदेश प्राप्त झाल्यानंतर उद्यापासूनच्या तारखा करण्यात आल्या घोषित खातेदारास एसएमएस’द्वारे पैसे संबंधित खात्यात जमा झाल्याची दिली जाणार माहिती बीड:आठवडा विशेष टीम―शासनाच्या वतीने शेतकरी नागरिकांच्या खात्यांमध्ये विविध अनुदान जमा करण्यात येत असून एस एम एस संदेशाद्वारे खातेदारास याची माहिती कळविले जाईल. स्टेट बँकेच्या वतीने ही रक्कम काढण्यासाठी प्रत्येक खातेदारास साधारणता वेगवेगळी तारीख निश्चित करण्यात … Read more

बीड: रमेशराव आडसकर यांचे पुतणे ऋषीकेश आडसकर यांच्या गाडीला अपघात

धारुर:आठवडा विशेष टीम― माजलगाव मतदार संघातील भाजपचे उमेदवार रमेशराव आडसकर यांचे पुतणे ऋषीकेश आडसकर यांच्या गाडीला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. या अपघातात ऋषिकेश आडसकर किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी धारूर जवळील चोरंबा पाटीजवळ झाला. रविवारी सायंकाळी ऋषिकेश आडसकर हे त्यांच्या मित्राच्या पजेरो गाडीतून धारुरकडे येत होते. त्याचवेळी सना ट्रॅव्हल्स धारुरहून बीडकडे निघालेली … Read more