ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन

कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने 500 रु. ची तपासणी मोफत!

डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त माध्यमातून उपक्रम

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांची कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व श्रवणयंत्राचे मोफत वाटप उद्या रविवारी 22 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून यावेळी बीड येथील डॉ.जयशंकर तामसेकर व डॉ.मोहन मुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती नंदागौळ ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे,मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे,परंतु सध्या अनेक नागरिकांची मागणी येत असल्याने गावातील नागरिकाना गावातच तपासणी व जाग्यावर श्रवणयंत्रांचे वापट करण्यात येणार आहे,कर्णबधिर असलेल्या नागरिकांच्या कानाची प्रत्येकी 500 रुपयांची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी करण्यात येणार आहे,यासाठी रविवार दि 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत,नंदागौळ च्या वतीने करण्यात आले आहे.

दीनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड.राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली, त्यानंतर बॅकेच्या उपाध्यक्ष पदावर परळीतील ॲड. राजेश्वर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्यासह नंदू सेठ खानापूरे, रवि कांदे भाजपा तालुका सरचिटणीस व इतर उपस्थित होते.

पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने माजी सरपंच खुदुस पठाण यांचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- परळी पंचायत समिती येथे उपसभापती यांच्या दालनात तालुक्यातील सिरसाळा येथील माजी सरपंच खुदुस पठाण यांचा पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सोमवार दि.31 जानेवारी रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच खुदुस पठाण यांचा पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्यासह पंचायत समिती सदस्य मोहनराव आचार्य, संगम ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, अजय बळवंत, मुदसिर पठाण व इतर उपस्थित होते.

सारडगाव येथे दिव्यांग मनोज गायकवाड यांचे दुकान आगीत भस्मसात ; डॉ. संतोष मुंडे यांची घटनास्थळी भेट ; दिव्यांग कुटुंबाला दिला आधार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- तालुक्यातील मौजे सारडगाव येथे दिव्यांग बांधव यांचे मनोज राजेंद्र गायकवाड यांच्या किराणा व जनरल स्टोअर्सला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधवांचा आधार असलेल्या कुटुंबाचे दुकान संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व अंदाजे 2 लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले. ही माहिती समजताच दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी आज रविवार, दि.30 जानेवारी रोजी तातडीने घटनास्थळी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी यांच्या मार्फत पंचनामा करून घेतले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विकास महामंडळाच्या वतीने लवकरच दिव्यांग बांधवांस मदत दिली जाणार आहे. असे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. तसेच दिव्यांग कुटुंबाला आधार दिला.
सारडगाव येथे दिव्यांग मनोज राजेंद्र गायकवाड यांचे अचानक लागलेल्या आगीत किराणा व जनरल स्टोअर्स आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांचे किराणा व जनरल सटोअर्स या दुकानाचे अंदाजे दोन लाख रुपये पेक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये दुकानातील ,सर्व भरलेला माल व फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी सारडगाव येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी केली. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांना धीर दिला. तसेच डॉ. संतोष मुंडे यांनी तातडीने तलाठी यांच्या मार्फत तात्काळ पंचनामा करून घेतला तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विकास महामंडळाच्या वतीने लवकरच दिव्यांग बांधवांस मदत दिली जाणार आहे. असे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. तसेच दिव्यांग कुटुंबाला आधार दिला. यावेळी डॉ. संतोष मुंडे यांच्यासह युवा नेते संजय आघाव,ज्ञानेश्वर मुंडे, संजय तांदळे, रामभाऊ बोबडे, राहुल आघाव, भगवान आंधळे, अनंत गायकवाड, दिलीप तांदळे, राम बोबडे, भानुदास तांदळे, दगडू अघाव,दिलीप गायकवाड,मनोज गायकवाड,आमोल गोलेर, आश्रुबा गवळी,रजेभाऊ सतभाई,दगडू अघाव,दिलीप गायकवाड,मनोज गायकवाड,आमोल गोलेर, आश्रुबा गवळी,रजेभाऊ सतभाई व इतर उपस्थित होते.

गोपाळ आंधळे यांच्याकडुन वाल्मीकअण्णा कराड यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देवुन सत्कार

परळी (प्रतिनीधी):
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांचे खंदे शिलेदार न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येडशी ते तुळजापुर पायी दिंडी काढत ही दिंडी परळीत आल्यानंतर शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी वाल्मीकअण्णांचा वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला दि.27 रोजी तुळजाभवानीची प्रतिमा भेट देत तुळजापुर येथील प्रसाद देवुन सत्कार केला यावेळी दिंडीतील सहकार्यासह कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी येडशी ते तुळजापुर अशी पायी दिंडी काढत वाल्मीकअण्णांच्या उदंड आयुष्यासाठी तुळजाभवानीची पुजा व गोंधळ कार्यक्रम करत साकडे घातल्यानंतर तुळजाभवानीच्या दरबारातुन घेतलेली प्रतिमा तसेच प्रसाद वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला गुरुवार दि.27 रोजी जगमित्र कार्यालयात शाल,श्रीफळ,फेटा बांधून तुळजाभवानीची प्रतिमा व महाप्रसाद देत सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पायी दिंडीत सहभागी हनुमान आगरकर,अर्जुन साखरे,सोमनाथ आंधळे, टाक मामा ,विजय पोखरकर, नामदेव पाथरकर यांच्यासह पत्रकार संजय खाकरे,धनंजय आढाव,दत्तात्रय काळे,धीरज जंगले,महादेव गित्ते,बालासाहेब फड,अभिमान मस्के,रामेश्वर महाराज कोकाटे,महादेव शिंदे, रवी मुळे, माऊली मुंडे, आदी उपस्थित होते.

बीड येथे होणाऱ्या काँग्रेस पक्षाचे डिजिटल सदस्य नौदणी अभियान राबविण्यासंदर्भात ; बैठकीस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे- काँग्रेस नेते अँड. प्रकाश मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला महाविद्यालय,बीड येथे मंगळवार,दि.२५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे कसे राबवायचे याबाबत मान्यवर नेते हे काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा करून संवाद साधणार आहेत.आणि मार्गदर्शन ही करणार आहे.तरी या बैठकीस परळी तालुक्यातील काँग्रेस कमेटीच्या सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे नेते अँड. प्रकाश मुंडे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हा कमेटीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सेलचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून थेट संवाद साधण्यात येणार आहे.तसेच काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील,माजी मंञी अशोकराव पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष डिजीटल सदस्य नोंदणी अभियान ग्रामीण आणि शहरी भागात कसे राबवायचे,याचे नियोजन आणि पूर्वतयारी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील सर्वांना सोबत घेऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करणार आहोत.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नुकतेच डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.केवळ “मिस कॉल” देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून काँग्रेस पक्षाचे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान हे अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह सदस्यता नोंदणी अभियान आहे.आपण सर्वजण एकत्रितपणे हे अभियान यशस्वी करण्याकरीता बीड जिल्ह्यातून मोठे योगदान देऊयात.दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया देशात घातला.त्याचे पुढचे पाऊल म्हणजे हे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान आहे.ऍप आणि मोबाईलच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी करता येणार असून,अत्यंत जलदगतीने होणारी ही प्रक्रीया विश्वासार्ह आहे.डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान अत्यंत महत्वाचे असून यातून बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होणार आहे.प्रत्येक बुथवर दोन स्वयंसेवक,एक महिला व एक पुरूष यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन ऍपच्या माध्यमातून ही सदस्यता नोंदणी केली जाणार आहे.सदस्य नोंदणी होताच त्या सदस्याला ‘एसएमएस’ येईल आणि या सदस्यांना ओळखपत्र (आयडी कार्ड) ही देण्यात येणार आहे.डिजीटल सदस्यता अभियान कसे चालवले जाईल या बाबतची सविस्तर माहिती बैठकीतून देण्यात येईल.एक सदस्य नोंदणी करण्यास एक मिनीटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.१०० टक्के विश्वासार्ह सदस्य नोंदणी असून निवडणूक आयोगाच्या डेटासोबत ही माहिती पडताळून पाहिली जाईल.मोबाईच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी अत्यंत जलदगतीने होणार आहे. तरी परळी तालुक्यातील सर्व काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस नेते अँड प्रकाश मुंडे यांनी केले आहे.

नाथ्रा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिम्मित भव्य रक्तदान शिबीर संपन्न

भारतरत्न डाॕ.बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करणे ही सर्वांची जबाबदारी-डॉ.संतोष मुंडे

परळी वैजनाथ (महादेव गित्ते):- भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वांना समान संधी, स्वातंत्र्य दिले आहे.संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुभाव निर्माण केला आहे. त्यांच्या विचाराप्रमाणे आचरण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाथ्रा येथे 30 जणांनी रक्तदान केले. विशेष महिलांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

सोमवार, दि,६ डिसेंबर रोजी नाथ्रा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. तसेच धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष. डॉ. संतोष मुंडे व युवा नेते अभय मुंडे उपस्थित होते. यावेळी सुरेश मुंडे, श्रीहरी मुंडे आदी उपस्थित होते. महापरिनिर्वाणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबीरात अनेकांनी रक्तदान केले. यामध्ये महिला मंडळीनी ही रक्तदान केले. या रक्तदान शिबीरास युवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवून अनेक युवकांनी रक्तदान केले. यावेळी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. संतोष मुंडे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना खरी आदरांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या विचारानुसार चालणे हे असून,तळागाळापर्यंत, जगातल्या अंधारा पर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवणे,माणसा माणसाच्या मनातली जातीय विषमता, अंधश्रद्धा नष्ट करून,अज्ञानातून ज्ञानाकडे,अंधारातून प्रकाशाकडे नेणारी विचारप्रणाली आम्ही आत्मसात करावी हिच वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली असेल अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले.‌‌ यावेळी संतराम किरवले, बाबासाहेब किरवले, सूनिल किरवले, अनिल किरवले, विकास तुपसमुद्रे, बाळू उपाडे, प्रकाश तुपसमुद्रे, ज्योतिनाथ उपाडे, शुभम घोरपडे, सिध्दार्थ पैठणे, सौरभ पैठणे, सुशिल घोरपडे, मुंजा मस्के, अक्षय हरबडे, नाना मुंडे, भिमराव किरवले, अभिमान किरवले, सुयोग किरवले, प्रतिक वाघमारे, समीर शैख, अनवर शेख, तसेच क्रांती मस्के, इंदुबाई हरबडे, विमलताई शिंदे, सविता किरवले, कविता पैठणे व नाथ्रा येथे अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेळंब येथे श्री खंडोबा यात्रोत्सव 9 ते 11 डिसेंबर ; यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): तालुक्यातील हेळंब येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबाची यात्रा दि. 9 ते 11 डिसेंबर रोजी होत असून यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील भाविक येत असल्याने ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.

हेळंब येथे श्री खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत असते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा अवघ्या काही दिवसावर आली असुन यात्रेची नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानाची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावो गावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छते सह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये दि.9 ते 11 डिसेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु आदींसह कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. यात्रे दरम्यान भाविकासह व्यापाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

श्री खंडोबाचे मंदिर हे हेळंब पासुन १ किलोमिटर अंतरावर असुन रस्त्याची डागडुजी व सुशोभिकरण करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत. श्रींच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगल होणार आहे. गावातील युवक व खंडोबा भक्त यात्रेच्या तयारीला लागले आहेत. घरोघरी माहेर वासियांनी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु आहे. कामानिमित्त बाहेर गावी गेलेले नागरिकही यात्रेनिमित्त आवर्जुन गावाकडे येतात. दरम्यान पंचक्रोशीतुन मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने ग्रामीण पोलिसांच्या वतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी कोविड नियमांचे पालन करत यात्रात्सव.साजरा होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार ; नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा – डॉ. संतोष मुंडे

परळी वैजनाथ (महादेव गित्ते) :- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळणार आहे. तरी नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. याने केंद्राला आदेश दिले होते. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड- 19 मुळे मृत्यू” याप्रमाणे नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे 50,000 रुपये मदत देण्यात येईल. नातेवाईकांना ही मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, मृत्यू प्रमाणपत्र, इतर नातेवाईकाचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे. कोणाला मिळणार मदत? 1) राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. 2) कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात क्लिनिकल डायग्नीसिसच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे.3) कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. 4) जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रक जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली मेडिकल सर्टीफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ 4 व 4 मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. 5) मेडिकल सर्टीफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथमध्ये कोव्हिड- 19 मुळे मृत्यू याप्रमाणे नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे 50,000 रुपये मदत देण्यात येईल. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळणार आहे. जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर सर्व नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

नवीन मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत शिवनेरी प्रतिष्ठानचे वैजनाथ माने यांचे आवाहन

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
शहरात व तालुक्यातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी आपले नावे हे मतदार यादीत नोंदवावीत असे आवाहन शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथ माने यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने दि. 15 नोव्हेंबर पासून नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू केले आहे. याकरिता नवीन मतदारांनी आपले आधार कार्ड , जन्म दाखला (टी.सी.) पासपोर्ट साईज फोटो वडील आई यांचे मतदान कार्ड व सहा नंबरचा फॉर्म सोबत जोडणे आवश्यक आहे सदरील कार्यक्रम मंगळवार दि. 15 डिसेंबर रोजी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. तरी लोकशाहीचे हात बळकट करण्यासाठी नव युवक-युवतींनी आपले 18 वर्ष पूर्ण झालेले असलेल्या असलेल्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी तहसील कार्यालय व आपल्या भागातील बुथावर जाऊन येथे संपर्क साधावा. शहर व तालुक्यातील सर्व नव युवक-युवतींनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे हे असे आवाहन शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथ माने यांनी केले आहे.

सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील सुधारीत विज कायदा 2020 खाजगी करणाच्या धोरणा विरुद्ध परळी औष्णिक विद्युत केंद्रात वर्कर्स फेडरेशन संघटनेचा संप यशस्वी

आमचा सरकारला विरोध नसून सरकारने अवलंबवीलेल्या धोरणाला विरोध आहे.कायदा रद्द नाही झाल्यास संघटनेच्या माध्यमातुन या पेक्षा तिव्र अंदोलन करू – कॉ.सुधीर मुंडे

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
केंद्र सरकारच्या उर्जा क्षेत्राच्या खाजगीकरण धोरणाविरुध्द.विज (सुधारणा) कायदा २०२० रद करण्याच्या मागणी करीता.वीज कर्मचारी याचा २६ नोव्हे.२०२० रोजी संपाचा निर्णय
महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यातील कामगार, कर्मचारी यानी केंद्र सरकारच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरूध्द व वीज कायदा २०२० रद्द करण्याच्या मागणी करीता व्यवस्थापणाला नोटिस देउन गुरूवार दि.२६ नोव्हेंबरच्या शुन्य तासापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्युत (संशोधन) कायदा २०२० या कायद्यादारे केन्द्र सरकारने उर्जा क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचे व भांडवलदारांच्या कंपन्या,कार्पोरेट घराणे आणि मर्जीतील विशिष्ट व्यक्‍तींना फायदा देण्याच्या उद्देशाने लोकसभेत पारित करून घेतले त्याच प्रमाणे केन्द्रिय उर्जामंत्री वीज कायदा,करण्याच्या प्रयत्नांत आहेत*
१)उर्जा उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या उद्देशाने काढलेला वीज कायदा (संशोधन) २०२० आणिस्टॅन्डर्ड बिडीग डाक्युमेंट रद्द करा.
२)अस्तित्वात असलेल्या सर्व फ्रॅन्चाईसी रद्द करा व भविष्यात नियुक्‍ती बंद करा.
३) सर्व कंपन्यांचे केरळ व हिमाचल राज्याप्रमाणे एकत्रीकरण करा.
४) सर्व कंत्राटी कामगारांना तेलंगाना उर्जा उद्योगात जसे कायम केले तसे कायम करा.
५) सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करा,
६) उर्जा उद्योगातील सर्व रिक्‍त जागांवर भरती करा.
प्रस्तावित कायद्यामुळे राज्य सरकारचे उर्जा उद्योगाबाबतचे अधिकार कमी करण्याचा व देशांतील संपुर्ण उर्जा उद्योगावर केन्द्राचे नियंत्रण आणण्याची तरतुद करण्यांत आली आहे. वीज ग्राहक, सामान्य जनता, शेतकरी व वीज कामगार यांच्या करीता हा कायदा अत्यंत घातक असून खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त फायदे देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केला आहे. जनतेच्या हजारो हजार कोटी रूपयाच्या गुंतवणुकीने उभारलेले महाराष्ट्रांतील वीजेचे जाळे व संपत्ती खाजगी भांडवलदारांना कोणतिही गुंतवणूक न करता सुपुर्द करण्याची केन्द्रीय उर्जा खात्याने या कायद्यात तरतुद केली आहे.केंद्र सरकारने देशातील सर्व सरकारी वीज कंपन्या व केंद्र शासित प्रदेशातील वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे व त्या नुसार काही राज्यात कार्यवाही सुरु केली आहे. या करीता वीज बिल कायदा २०२० चे प्रारूप तयार करून ते लोकसभेत पारीत करून घेण्याची प्रक्रिया पुढील काळात सुरु करणार आहे. त्यासंदर्भात देशभरातील अनेक राज्य व केंद्र शासित प्रदेश यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामध्ये आपल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यानेही विरोध दर्शविला आहे. सदर कायदाच्या बदल हा खाजगीकरणाला समर्थनीय असून या कायद्याला देशभरातील आयटक,इंटक,तसेच महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील नामांकित व विज क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी वर्कर्स फेडरेशन संघटनेने या कायद्याला तीव्र आक्षेप घेवुन देशव्यापी संपाची हाक दिली. देशभरातील व महाराष्ट्रातील वीज क्षेत्रामधील फ्रांचाईजी चा अनुभव चांगला नाही.ग्राहक सेवा व प्रत्येक राज्याच्या विकासाच्या दृष्टीने उर्जा क्षेत्र महत्वाचे आहे.त्यामुळे सदर केंद्र सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील खाजगीकरण धोरणाविरुद्ध व वीज (सुधारणा) कायदा २०२० च्या विरोधात महाराष्ट्रातील परळी औ.वि.केन्द्राच्या मुख्य अभियंता कार्यालया समोर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी वर्कर्स फेडरेशन परळी येथे केन्द्रीय नेते कॉ.सुधीर मुंडे याच्या नेतृत्वा खाली दि.२६/११/२०२० रोजी निर्देशने करून संप करण्यात आला.या संपात केंद्रीय कार्यकारीणी सदस्य कॉ. सुधीर मुंडे, झोन अध्यक्ष कॉ.श्रीगणेशजी मुंडे, झोन सचिव कॉ.संदीप पाटील झोन कॉ. बालासाहेब गर्जे उपाअध्यक्ष कॉ.रूषीकेश मुंडे *झोन सल्लागार कॉ.संदीपजी काळे, कॉ.मुजाभाऊ सोनवने कॉ. संजय मुंडे कॉ.तात्या बिडगर कॉ.रमाकांतजी शिंदे, कॉ.मोहनजी बिडगर, कॉ.संतोष मुंडे,कॉ.प्रदीप फड, कॉ.संतोष ढाकणे, कॉ.प्रकाश बोंबले, कॉ.जनार्धन बोंबले, कॉ. राहुल जाधव, कॉ.तुकाराम पाटील, कॉ.विकास ढाकणे, कॉ.अजय भोपे,कॉ.दिगंबर शिंदे,कॉ.कृष्णा मुंडे, कॉ.पी बी सगर,कॉ.मदन बिडगर कॉ.शेख जाफर,कॉ सविता कदम कॉ.मिलीद क्षिरसागर कॉ.विजय गुट्टे यानी संपात सहभाग नोंदवला होता.

बीड: परळी-अंबाजोगाई रस्त्यावर आता आझाद चौक ते कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत होणार चौपदरीकरण

चौपदरी रस्त्याची लांबी दोन किमी वाढविण्याचे मुंडेंचे निर्देश

परळी शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचेही होणार चौपदरी रुंदीकरण

मुंबई दि.२५:आठवडा विशेष टीम― बहुप्रतिक्षित परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे काम सध्या वेगाने प्रगतीपथावर असून, परळी शहरातील मौलाना आझाद चौक ते सपना हॉटेल इथपर्यंत मूळ आराखड्यानुसार चौपदरी रस्ता प्रस्तावित आहे, या परिसरातील रहदारीचा विचार करत चौपदरी रस्त्याची लांबी आणखी दोन किलोमीटर वाढवून कन्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत करण्याचे निर्देश आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

परळी – अंबाजोगाई रस्त्याच्या कामाची गती वाढविणे व अन्य रस्त्यांच्या कामांसंदर्भात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक घेऊन सूचना दिल्या. या बैठकीस राष्ट्रीय महामार्गचे सचिव विनयकुमार देशपांडे, कार्यकारी अभियंता स्वामी, सहसचिव रहाने, संबंधित एजन्सीचे कंत्राटदार आदी अधिकारी उपस्थित होते.

परळी शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीच्या दृष्टीने लहान पडत असून या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण करण्याचीही आवश्यकता असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात याव्यात असेही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

अंबाजोगाई रस्त्यावर येणाऱ्या कन्हेरवाडी गावात नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना रहदारीचा त्रास होऊ नये यासाठी येथे रेक्युलर अंडरपास बांधण्यात यावेत असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी संबंधित यांना या बैठकीत दिले आहेत.

दरम्यान परळी ते अंबाजोगाई या रस्त्याचे आझाद चौकापासून चौपदरीकरण आणखी दोन किलोमीटर वाढवत कण्हेरवाडी येथील पेट्रोल पंपापर्यंत वाढवून, परळीच्या बाजूने अधिक वेगाने काम करण्यात येणार असून, श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

कोरोना संकटकाळात उत्कृष्ट सेवेबद्दल एसटी चालक ज्ञानोबा आंधळे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― येथील एसटी आगरातील कर्मचारी तथ चालक ज्ञानोबा आंधळे यांनी कोरोनाच्या संकट काळात व मुंबई येथे मुंबई बेस्ट मध्येही उत्कृष्ट सेवेबद्दल राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससकडुन “कोरोना योध्दा’म्हणून सन्मानपञ देवुन आंधळे यांचा सचिन भांडे यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. या त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोरोना संक्रमन आजाराने सर्वञ थैमान घातले असुन जनजीवनही विष्कळीत झाले आहे. देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. आजच्या या भीषण (कोविड १९) परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी आपण अहोरात्र धडपडत करत आपल्या उत्कृष्ट सेवेच्या कामाची दखल घेऊन राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससच्या वतीने चालक ज्ञानोबा आंधळे यांना कोविड योध्दा पुरस्कार २०२० या सन्मानाने गौरवण्यात येत आहे. तुम्ही समाजासाठी दिलेले योगदान अतिशय कौतुकास्पद आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! असे सन्मान पत्रात नमूद केले आहे. जगातसह संपूर्ण देशात कोरोनाने आहाकार घातला आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार बांधवांचा आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्य करणाऱ्या एसटी चालक तथा तालुक्यातील हेळंबचे ज्ञानोबा आंधळे यांचा गौरव करण्यात आला. एसटी चालक ज्ञानोबा आंधळे यांनी एसटी बस सेवेच्या माध्यमातून त्यांनी प्रवासी यांना कोरोना विषयक जनजागृती करणे, सेनिटायझर, मास्क वापरावे असे आवाहन करणे, अनेक प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपल्या सेवा चांगल्या प्रकारे कार्य केले आहे. तसेच मुंबईच्या प्रवासी सेवेसाठी राज्यातून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. बीड विभागातून परळी आगारातून कर्मचारी पाठविले होते. यात त्यांनीही मुंबई येथे मुंबई बेस्ट सेवेत कार्यरत राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.18 दिवसात या कोरोना विषयक काळजी घेत आपले कार्या बजावले आहे. आपली भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारी पार पाडली आहे. याच उदात्त भावनेतून सामाजीक कार्य ऊल्लेखनिय आहे. या कार्याची ईतरांनीही प्रेरणा घेणे जरुरीचे आहे.कोरोणाविषयक जनजागृती,विविध माध्यमातुन मदत,प्रशासनाशी समन्वय या बाबींची दखल घेवुन राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससकडुन “कोरोना योध्दा’म्हणून सन्मानपञ देवुन सचिन भांडे यांचे हस्ते चालक आंधळे यांना गौरविण्यात आले. कोरोना योध्दा म्हणून चालक ज्ञानोबा आंधळे यांचा गौरव केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत.

आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न

परळी दि.19:अशोक देवकते― मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीशभाउ चव्हाण यांच्या प्रचारार्थ व परळी शहरातील एकूण 7 बुथवरील बुथ समिती तसेच विविध जबाबदारी निश्चित करण्यासाठी आज गुरुवार 19 नोव्हेंबर रोजी परळी शहर कार्यालयात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रास्तविकपर मनोगतात उपस्थित पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून मतदारांना गृहभेट तसेच प्रचार फेरींचे नियोजन,मतदान कसे करावे या बाबत संवाद साधला या बैठकीस राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख,जिल्हा सरचटणीस बाळासाहेब देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे,शहरप्रमुख राजेश विभुते,प्रा.डॉ.विनोद जगतकर, प्रा.डॉ.पी.एल.कराडसर,नगरसेवक शरद मुंडे,अय्युबभाई पठाण,किशोर पारधे, विजय भोयटे,अन्वर मिस्किन,शंकर आडेपवार,अनिल आष्टेकर,महादेव रोडे,जयराज देशमुख,राजेंद्र सोनी,अजीझभाई कच्छी,वैजनाथ बागवाले,कुमार व्यवहारे,रवी मुळे,तक्की खान,बाशीत भाई,ताजखान पठाण,केशव गायकवाड,यांच्यासह विविध सेल चे पदाधिकारी,माजी नगरसेवक व पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.परळी शहराच्या सर्व बुथचे या बैठकीत सुक्ष्म नियोजन या बैठकीत करण्यात येवून मतदानाची टक्केवारी 90% पेक्षाही जास्त करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केला.

भविष्य निर्वाह निधी प्रकरणातील अनावश्यक अटी कमी कराव्यात – पुरोगामी शिक्षक संघटनेची शासनाकडे मागणी

बीड:आठवडा विशेष टीम― जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना आपले भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा केलेले पैसे काढण्याची सुविधा आहे मात्र त्यासाठी अनेक अनावश्यक अटी शर्ती कार्यालयाने लावून ठेवल्याने शिक्षकांना मोठा मनस्ताप होतो त्यामुळे स्वतःचे पैसे कठीण प्रसंगी त्यांना मिळावेत यासाठी अनावश्यक अटी रद्द कराव्यात अशी मागणी म.पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती ने राज्य शासनाकडे केली आहे.

या बाबतीत राज्यभर वेगवेगळे नियम लावले जातात त्यात एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. शिक्षक कर्मचारी सुख दुःखात अडीनडीला मदत व्हावी म्हणून आपल्या वेतनातून मासिक रक्कम कपात करून भविष्य निर्वाह निधी मध्ये स्वेच्छेने जमा करतात. मात्र त्यांना आपलेच जमा पैसे वेळेवर परत मिळत नाही, ते मिळवण्यासाठी अनेक अनावश्यक अटी शर्ती घातल्या आहेत. अनेक जिल्ह्यात जवळपास 12 ते 18 प्रकारचे कागदपत्र त्यांना कार्यालयात सादर करावे लागतात त्यात अवलंबित प्रमाणपत्र, कुटुंबातील सदस्यांचे प्रमाणपत्र, कुटुंबात अन्य नोकरीत नसल्याचे प्रमाणपत्र, सेवापुस्तक प्रत, पती पत्नी संमती पत्र, जुळवाजुळव प्रमाणपत्र, यापूर्वी पैसे घेतले नसल्याचे प्रमाणपत्र, बाकी रक्कम कुठून आणली, वधू वर अवलंबून असल्याचे प्रमाणपत्र, विवाहित अविवाहित प्रमाणपत्र अशा आजच्या काळाशी सुसंगत नसलेल्या व कागदी पसारा वाढवणाऱ्या एक ना अनेक अटी त्यात घालून ठेवल्या आहेत एवढे सगळे सादर केल्यावर जवळपास 4 विभागातून ह्या प्रस्तावाचा प्रवास होतो, त्यात एकातरी विभागात अनावश्यक त्रुटी निघतेच, उदा. साधी सही सुटली तरी प्रस्ताव परत केल्या जातात यात जवळपास 4 ते 6 महिन्याचा कालावधी वाया जातो.मात्र काही जि.प.मध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शिक्षणाधिकारी यांचे अधिकार दिल्यामुळे सरळ वित्त विभाग अशी भिन्नता त्यामुळे कर्मचाऱ्याला त्याचेच पैसे वेळेवर परत मिळत नाही, कठीण प्रसंगी उधार उसनवारी करून काम भागवावे लागते.
त्यातही चिरीमिरी चालत असल्यामुळे अनेक प्रामाणिक शिक्षकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या चकरा माराव्या लागतात, लिपिकांची मनधरणी करावी लागते. कर्मचाऱ्यांची व त्याच्या जमा रकमेची माहिती कार्यालयाकडे असतेच, कर्मचारी स्थायी असतो नोकरी सोडून जात नाही गेला तरी त्याचेच जमा पैसे तो मागत आहे मग या अटींची गरज काय असा प्रश्न राज्यभरातील शिक्षक प्रशासनाला विचारत आहेत, करिता सर्व अनावश्यक अटी शर्ती रद्द कराव्यात व बँकेप्रमाणे साध्या अर्जावर त्यांना आपले पैसे परत मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते विजय भोगे कर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्य अध्यक्ष अल्का ठाकरे, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य मुख्य संघटक भुपेश वाघ ,जी.एस. मंगनाळे राज्य उपाध्यक्ष ,शिवशंकर सोमवंशी विभागीय अध्यक्ष , सुनंदा कल्याणकस्तुरे महिला राज्य कार्याध्यक्ष रुक्मा पाटील राज्य कोषाध्यक्ष ,बीड जिल्हा नेते एकनाथ कराड जिल्हा अध्यक्ष आसिफ शेख जिल्हा सरचिटणीसी प्रमोद कोल्हे जिल्हा कार्याध्यक्ष हबीब शेख, जिल्हा कोषाध्यक्ष बी.टी.पोळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास आडागले,संजय भुरे जिल्हा मुख्य संघटक आधी पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.