मांजरसुंभा-पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ डी वर मोटारसायकल स्वार अपघातात जागीच ठार

पाटोदा(प्रतिनिधी): आज दिनांक १४ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता मांजरसुंभा ते पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ -डी वर सासवड फाट्यावर मोटारसायकल स्वार मुकींद पवार रा. हिंगणी हवेली तालुक्यातील.गेवराई जि.बीड हे पाटोदा येथुन होंडा मोटारसायकल (क्रमांक एमएच.एच.-४२ ए.डी.९६६५) गावी जात असताना सासवड फाट्यावर कंटेनर (क्रमांक एम.एच.४६ बीड.बी.४६८)ड्रायव्हर सुनिल लक्ष्मण नाकाडे रा.जाटदेवळा ता.पाथर्डी जि.अहमदनगर मांजरसुंभाकडुन पाटोद्याकडे जात असताना अपघात होऊन अपघातात मुकींद पवार जागीच ठार झाले. नेकनुर पोलीस व मांजरसुंभा महामार्ग पोलीस प्रशासन यांनी स्थळ पंचनामा केला.

पाटोद्याजवळ बामदळ वस्ती येथे भिषण अपघात अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

बीड (नानासाहेब डिडूळ): आज रविवार रोजी सकाळी पाटोदा येथील मांजरसुंभा रोङ वरील बामदळ वस्ती जवळ स्विफ्ट डिजायर क्रमांक एम.एच.१२के.एन ९७६१ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.२६ बी.ई.५९४५ चा भिषण अपघात झाला या अपघातात आयशर टेम्पो खाली स्विफ्ट अडकलेली असुन गाडीमधील लहान मुलासह एकुण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भिषण होता की अपघात ठिकाणी रक्ता मासाचा सदा पडला होता क्रेन च्या साहाय्याने आयशर टेम्पो खाली अडकलेली स्विफ्ट गाङी काढण्यात आली
हे कुटुंब केज तालुक्यातील जिवाची वाङी येथे पुणे येथुन लग्नासाठी जात असताना हा अपघात झाला अपघात एवढा मोठा होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
घटना घडतात पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हे घटनास्थळी हजर झाले व मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली व मृतदेह शासकीय रुग्णालय पाटोदा येथे नेण्यात आले.

शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती.सीमा टकले-काळे यांना उच्च न्यायालयाचा अतरीमं दिलासा

बीड:नानासाहेब डिडुळ― जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून आष्टी येथे कार्यरत असणाऱ्या श्रीमती सीमा खंडू टकले काळे यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदनावती करण्याची कारवाई केली होती. श्रीमती. टकले या विस्ताराधिकारी म्हणून आठ वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांची मूळ नियुक्ती मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार झालेली आहे . त्यांच्या नियुक्ती बाबतचे प्रकरण हे अपर आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सुरू होते. अप्पर आयुक्तनी टकले यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता कोणत्याही कागदपत्राची शहानीशा न करता एकतर्फी निर्णय दिला होता. त्या विरोधात टकले यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. सदर प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच जिल्हा परिषदेने कारवाई केली . त्याविरुद्ध श्रीमती टकले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान युक्तिवाद झाला यामध्ये श्रीमती टकले यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले की श्रीमती टकले यांची विस्ताराधिकारी पदावर आठ वर्षे सेवा झालेली आहे. तसेच त्यांनी विस्तार अधिकारी पदाची विभागीय परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. त्यांना विस्तार अधिकारी पदावर कायम केलेले असून त्यांचे सेवा जेष्ठता यादी मध्ये पाच वर्षापासून नाव समाविष्ट आहे. विस्तार अधिकारी पदाचे विभागीय प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. वास्तविक श्रीमती टकले यांची मूळ नियुक्ती ही वेळोवेळी दिलेले आदेश हे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नियुक्ती दिलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा रिव्हर्स करण्याचा अधिकार नसल्याचा पुरावा सादर करण्यात आला त्यानुसार जिल्हा परिषद यांना कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे निदर्शनास आणून दिले. वरील सर्व बाबी पाहता असे निदर्शनास आले की श्रीमती टकले यांनी विस्तार अधिकारी पदाबाबतच्या सर्व पात्रता पूर्ण केलेल्या आहेत सर्व बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन माननीय न्यायालयाने श्रीमती टकले यांच्या नियुक्तीच्या कारवाईस अंतरिम स्थगिती दिली आहे. श्रीमती टकले यांच्या वतीने अँड महेश भोसले वअन्य विधीतज्ञांनी काम पाहिले. सीमा टकले ह्या सुरेश काळे यांच्या पत्नी आहेत

हर घर तिरंगा साठी धनगरजवळका गावात जि.प.प्राथमिक शाळेची प्रभात फेरी

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव च्या निमित्ताने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ला हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा ) चे फलक घेऊन जि.प.प्राथमिक शाळा धनगरजवळका येथील 1 ली ते 4 थी  च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव भर प्रभात फेरी काढून गावकऱ्यांना 13 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा फडकविण्यासाठी
सदैव राखु तिरंग्याचा मान जगात आपली वाढेल शान …

भारतमातेचे गीत गाऊ तिरंगा घरोघरी  लाऊ

अशा घोषणाही देण्यात आल्या यावेळी जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ सोंङगे ,सुनिल जाधव , विजय सरगर यांनी मोठे परीश्रम घेऊन गावभर प्रभात फेरी काढली यावेळी विद्याथ्यान मध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले.

बीड: डोंमरी येथील युवकाने काही दिवसासाठी ‘मुख्यमंत्री’ बनवा अशी राज्यपालांकडे केली मागणी

बीड: नानासाहेब ङिङूळ― सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटापालट झाली असून प्रत्येक पक्ष हा स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसापासून आपापसात चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आसून इतर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या डोंमरीतील मा.महेश भोंडवे यांनी थेट राज्यपाल साहेबांकडे मला काही दिवसासाठी मुख्यमंत्री करा अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या खूप मोठा बदल झाला आहे. सर्व पक्षाचे लक्ष्य आपली सत्ता स्थापन करण्यासाठी जे ते नेते आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे व जनतेकडे कोणत्याही पक्षाचे अथवा कोणत्याही नेत्याचे लक्ष राहिले नाही. परंतु माननीय महोदय सध्या महाराष्ट्रात. विशेषत: मराठवाड्यात मान्सूनच खूप उशिरा आगमन झाल्यामुळे माझा सर्व शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तसेच महाराष्ट्रातील धरून बेरोजगार वर्गाला २०१९ पासून कोणतीही स्पर्धा परीक्षेची जाहिरात निघाली नाही. आणि ज्या जाहिराती निघाल्या त्याच्या परीक्षा योग्य झाल्या नाहीत. जो तो पक्ष आणि जो ते नेते सत्ता स्थापन करण्याच्या नादात माझ्या शेतकरी बंधू कडे आणि बेरोजगार तरुणाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे भविष्यात माझ्या शेतकरी बंधू च्या आत्महत्या रोखण्यासाठी माननीय मेहरबान राज्यपाल साहेबांनी मला जोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कराव. अशी मागणी पाटोदा तालुक्यातील डोमरी गावच्या मा. महेश भोंडवे यांनी राज्यपाल साहेबांकडे मागणी केली आहे.

वीर निखिल कांकरिया च्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पाटोदा:आठवडा विशेष टीम― दिनांक ५ जून रोजी पाटोदा येथील प्रतिष्ठित व्यापारी कांकरिया क्लास सेंटरचे मालक निखिल कांकरिया यांनी त्यांचा मुलगा वीर च्या वाढदिवसानिमित्त गरजू गरीब वंचित मसनजोगी वस्तीवरील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी शाळेच्या शिक्षिका सुरेखाताई खेडकर यांचा देखील वाढदिवस संयुक्त केक कापून सर्व विद्यार्थी च्या उत्साही वातावरणात साजरा केला यावेळी निखिल कांकरिया यांनी माणुसकीची भिंतीला ११०० रुपये मदत केली . यावेळी ३०विद्यार्थ्यांना वही ,पेन, कंपास शैक्षणिक साहित्य देण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन माणुसकीची भिंत यांनी केले होते. यावेळी उपस्थित युवा नेते युवराज जाधव ,त्रिमूर्ती मंडप चे मालक पप्पू शेठ जाधव , हजारे, आकाश ,अजय शिरवटे ,सरपंच व माणुसकीची भिंतचे दत्ता देशमाने, रामदास भाकरे उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी सर्व बालगोपाळांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पैशाच्या हव्यासापायी बांधला स्विविंगपुल घेतला बालकाचा जिव ,पाटोद्यात प्रशिक्षकाविनाच सुरू होते जलतरण !

नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी .

पाटोदा:नानासाहेब डिडुळ– पाटोदा शहरातील पारगाव रस्ता परिसरातील एका अत्याधुनिक जलतरण तलावात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. ७ मे रोजी दुपारी घडली. हा जलतरण तलावावर प्रशिक्षकही नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात असुन,कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
अजिंक्य मोहन कोठुळे वय वर्षे १२ रा. जवळाला ता. पाटोदा जि. बीड असे या मयत मुलाचे नाव असून अजिंक्य हा आपले आजोबा (आईचे वडील) तात्यासाहेब महादेव वीर रा. क्रांती नगर पाटोदा यांचाकडे आपल्या आईसह मागील काही दिवसांपासून राहत होता. पाटोदा शहरात पारगाव रस्त्या नजीक डॉ. दत्ताञय रोहीदास ड़िडूळ यांचे हॉस्पिटल असून त्याच परिसरात त्यांनी जलतरण तलाव बांधला आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे बच्चे कंपनीसह अनेक जण दुपारच्या वेळी याठिकाणी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी येतात . शनिवारी दुपारी एक च्या दरम्यान अजिंक्य हा आपल्या काही मित्रांसह याठिकाणी आला होता जलतरण तलावात हे सर्व मित्र पोहत असताना अजिंक्य हा अचानक पुढील बाजूस साधारणतः आठ ते दहा फुट खोली असलेल्या भागाकडे गेला व प्रत्यक्ष दर्शीच्या म्हणण्यानुसार त्यावेळी अचानक त्याने परिधान केलेली ट्यूब निसटली व तो खोल पाण्यात बुडाला. सर्व जन पोहण्यात व्यस्त असल्याने तो बुडत असल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही तसेच त्याठिकाणी देखरेखी साठी असणारा कर्मचारी देखील त्याच वेळी काही कामा निमित्त बाहेच्या दालनात गेला होता त्यामुळे अवघ्या काही क्षणातच अजिंक्य चा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला ही बातमी कुटुंबियांना व नागरिकांना समजताच डॉ. डीडूळ यांच्या दवाखाण्याच्या परिसरात मोठा जमाव जमा झाला. यावेळी संतप्त जमावाने या जलतरण तलावासाठी योग्य प्रशिक्षक नसताना तसेच सुरक्षितते साठीची कोणतीही उपाय योजना नसताना मुलांना पोहण्यासाठी कसे सोडले जाते असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर पोलीस निरीक्षक डी.बी. कोळेकर, पीएसआय आर.व्ही . पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत तात्यासाहेब महादेव वीर यांनी दिलेल्या फियादिवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास आर.व्ही. पतंगे हे करत आहेत.
पाटोदा शहरात असलेल्या या जलतरण तलावाकडे नगरपंचायतचे पुर्णतः दुर्लक्ष आहे तर येथे कोणताही प्राशिक्षक नसताना प्रवेश निश्चित कसा केला जातो. परिणामी बारा वर्षाच्या मुलाचा जिव गेला असुन यात दोषी असणाऱ्या वर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
चौकट …..
अवघ्या 11 गुंठ्यातच महोदय ड़ाॅ. ड़िड़ूळ यांनी आपला स्वतःहाचा व्यवसाय दवाखाना चालु त्यातच व्यसनमुक्ती केंद्र,मेड़ीकल , मंगलकार्यालय ,जिम,आणि जलतरण तलाव किती पैशाची हाव या ड़ाॅक्टर ला अशी चर्चा पाटोदा तालुक्यात नागरींकान मधुन होत आहे. …

पाटोदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेल्या पाचंग्री सेवा सोसायटीवर भाजपचा झेंडा

पाटोदा:प्रतिनिधी― पाटोदा तालुक्यातील राजकीय दुष्ट्या अत्यंत महत्वाची असलेल्या पाचंग्री सेवा सोसायटीवर भाजपने विजयाचा झेंडा फडकवला आहे.सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन औटे आणि बोधले यांचा खासदार,डॉ प्रितमताई मुंडे यांनी केला सत्कार केला. नुकतेच पाटोदा तालुक्यातील सोसायटीच्या निवडीचा कार्यक्रम तालुका भरात सुरू असुन पाटोदा तालुक्यातील पाचंग्री ,बोडखेवाडी मंझरी ब्राह्मणवाडी अतंर्गत पाचंग्री सेवा सहकारी सोसायटी पाचंग्री अगट आणि पाचंग्री ब गट यांच्या चेअरमन आणि व्हाइस चेअरमन निवडी बिनविरोध प्रक्रिया पार पडली यामधे पाचंग्री अगटाच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर बोधले महाराज तर व्हाईस चेअरमन पदी सौ निलावती नवनाथ मुंडे तर पाचंग्री ब गटाच्या चेअरमन पदी शाहुराज औटे तर व्हाइस चेअरमन पदी दिलीप कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवडणूक प्रक्रिया माजी सरपंच गणेश मुंडे आणि जेष्ठ नेते अंकुशराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दोन्ही चेअरमन ज्ञानेश्वर बोधले आणि शाहुराज औटे हे भारतीय जनता पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते गेली अनेक वर्षा पासुन आहेत तसेच सक्रीय पक्षाचे काम करतात त्यामुळे पाचंग्री सेवा सोसायटीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला असुन त्यांच्या निवडी बद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचीव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे ताईसाहेब तसेच महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे आमदार सुरेश आंण्णा धस, भाजपचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच दोन्ही चेअरमन यांचा आज खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी सत्कार केला यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी तालुकाध्यक्ष अँड सुधीर घुमरे नगरसेवक अँड सुशील कोठेकर आदी उपस्थित होते.

पाटोदा: नागेशवाडीत केमिकल पासून बनावट दूध ; ४९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

बीड़ (नानासाहेब ड़िड़ूळ): पाटोदा तालुक्यातील पारनेर जवळील नागेशवाडी येथे केमिकलपासून बनावट व आरोग्याला हानिकारक असे दूध तयार करून ते दुधात मिसळून ते डेअरीवर विक्री करीत असल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने कार्यवाही केली.

या बाबतची माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील नागेशवाडी येथे पावडर पासून दुध आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे केमिकल पावडर पासून मानवी आरोग्याला धोकादायक असे दूध तयार करून ते बनावट दूध त्यांच्या जवळील दुधात मिसळून दूध डेअरीवर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, महिला पोलीस नाईक आशा चौरे यांना कार्यवाहीचे आदेश दिले.

आदेश मिळताच दि. २५ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७:०० वा. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलीस पथकाने नागेशवाडी येथे आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हे त्यांच्या घरी बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध बनवीत असलेल्या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी वरील अप्पासाहेब थोरवे हा आपले राहते घरी केमिकल पावडर पासून दूध तयार करत असताना तयार केलेले १६० लिटर दूध व केमिकल पावडर तसेच दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्नभेसळ अधिकारी गायकवाड यांच्या मदतीने ते बनावट व मानवी आरोग्यास धोकादायक दूध व मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाई अन्न भेसळ अधिकारी गायकवाड हे करीत आहेत.

पाटोदा तालुक्यातील रोड लगत केलेले वृक्षारोपण बोगस तर नाही ना ?

बीड़ (नानासाहेब डिडुळ): पाटोदा तालुक्यातील बहुसंख्य गावामध्ये रोड़ लगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे परंतु याकड़े प्रशासणाचे कसल्या ही प्रकारचे लक्ष नाही असे या रोड़ लगत लावलेल्या वृक्षाकड़े पाहुन वाटते .
जर हे वृक्षारोपण महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतुन होत असेल व बोगस मस्टर काढण्याचा धड़ाका चालु असेल तर हे बोगस मस्टर भरणे वेळीच थांबवावे जेणे करून सरकारी तिजोरी खाली होणार नाही .
मोठ्या प्रमाणात केलेल्या वृक्षारोपण मध्ये पिंपळवंड़ी घाटातील बहुतांश झाड़े जळुन गेली आहेत त्याकड़े कुणाचेही लक्ष नाही .
हे झाड़े कोणी लावली कुढल्या योजणेतुन आहेत ते प्रशासनाने गाव निहाय पहाणी करावी व झाडांची काळजी न घेणार्यावर कठोर कारवाई करावी जर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतुन ही झाड़े असतील तर मस्टर भरणे थांबवावे.

बीड: लाच मागणारा पाटोदा चा फौजदार एसीबीच्या जाळ्यात

बीड़ (नानासाहेब डिडूळ): तक्रारदाराच्या गुन्हात जप्त केलेला मोबाईल तसेच आरोपीला अटकपुर्व जामिनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा उपनिरीक्षकाने 50 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती . तड़जोड़ीअंती 40 हजार रूपयांची स्विकारण्याचे पंचसमक्ष मान्य केले या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही कारवाई शुक्रवार (दि.11) रोजी बीड एसीबीने केली.
अफरोज तैमीरखाॅ पठाण हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांनी तक्रारदाराकड़े गुन्हातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रारदाराच्या भावास अटकपुर्व जामीन मंजुर झालेली रद्द न करण्यासाठी जप्त गाड़ी व पिस्टल सोड़वण्यासाठी अहवाल चांगला देण्यासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली व तड़जोड़ीअंती 40 हजार रूपये स्वीकारण्याचे पंचासमक्ष व साक्षीदारांच्या समक्ष मान्य केले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल खाड़े ,अप्पर पोलीस अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड़चे उपअधिक्षक शंकर शिंदे ,सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष यांनी कारवाई केली.

पाटोदा: धनगरजवळका शिवारात कंटेनर पलटी

पाटोदा (नानासाहेब डिडुळ): बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका पासुन व चुंभळी फाटा लगत कंटेनर पलटी झाले आहे ही घटना गुरूवार रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली आहे.
गुजरात वरून आंध्रप्रदेश कड़े केबल घेऊन जात असताना धनगरजवळका शिवारात समोरून येणाऱ्या ढंपर व ट्रक यांच्या ओव्हरटेक मुळे कंटेनर पलटी झाले. माहतरदेव गर्जे (ड़्रायव्हर ) यांनी कंटेनर रोड़ खाली घेण्याचा प्रयत्न केला परंतु अरूंद पुल असल्याकारणाने कंटेनर पलटी झाला या मध्ये माहतरदेव गर्जे यांना मुका मार लागला आहे.
हा कंटेनर हातोला येथील शिवाजी भास्कर आघाव (वाहन क्र.MH16CD9797) यांच्या मालकीचा असुन कंटेनरचे अंदाजे दीड़ लाखापर्यंत नुकसान झाले आहे.
घटनास्थळी पाटोदा पोलीस उशीरापर्यंत पोहचले नसल्याचे समजते.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती पाटोदा तालुका कार्यकारणी घोषित ; ड़ॅशिंग पञकार नानासाहेब डिडूळ कोषाध्यक्ष पदी

पाटोदा (प्रतिनिधी): अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती ची पाटोदा तालुका कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अब्दुल कादर मकराणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत निवडण्यात आली
उपाध्यक्षपदी बाळासाहेब घुमरे तर सचिवपदी सय्यद खदिर सहसचिव संजय जावळे यांची तर ड़ॅशिंग पञकार नानासाहेब ड़िड़ूळ यांची कोषाअध्यक्ष पदी नियुक्त्या झाल्या आहेत नवनिर्वाचित समितीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
माननीय अण्णा हजारे यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समितीची स्थापना करण्याचे आदेश समितीचे विश्वस्त वकील अजित देशमुख यांना दिले होते त्यानुसार पाटोदा तालुका अध्यक्षपदी कादर मकराणी यांची नियुक्ती करून पाटोदा तालुका समिती निवडण्याचे सुचना वकील देशमुख यांनी अध्यक्ष कादर मकरानी यांना दिले होते
यानुसार गुरुवारी दिनांक 14 रोजी पाटोदा शासकीय विश्रामगृहामध्ये तालुक्यातुन सदर समितीत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्याची बैठक अध्यक्ष कादर मकराणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सर्वानुमते पुढील कार्यकारणी निवडण्यात आली
यावेळी कादर मकराणी यांनी सर्व नवनिर्वाचित समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून माननीय अण्णा हजारे यांच्या व तसेच राज्य समितीचे विश्वस्त वकील अजित देशमुख व जिल्हाध्यक्ष वकील मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे काम करण्याचे आवाहन केले.

निवडलेली कार्यकारनी पुढीलप्रमाणे

अब्दुल कादर मकराणी (अध्यक्ष)
घुमरे बाळासाहेब सूर्यभान (उपाध्यक्ष)
सय्यद खदिर सय्यद रऊफ. (सचिव)
जावळे संजय गहिनीनाथ (सहसचिव)
नानासाहेब मोतीराम डिडुळ (कोषाध्यक्ष)
दिलीप नारायण डोरले. (सदस्य)
भागवत रंगनाथ गोरे (सदस्य)
जायभाय राजेंद्र गेनबा (सदस्य)
तनपुरे बाबासाहेब श्रीपती. (सदस्य)
संतोष बाळू गाडेकर (सदस्य)
जाधव लखुळ बाबुराव (सदस्य)
येवले सुभाष पांडुरंग (सदस्य)
मोठ्या संख्येने अण्णा हजारे यांना मानणारा वर्ग उपस्थित होता नवनिर्वाचित समितीच्या सर्वस्तरातुन पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे अभिनंदन होत आहे.

वीज महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्याचे चुंभळी फाटा येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन – कॉ.महादेव नागरगोजे

पाटोदा:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपचे डी. पी. वरील कनेक्शन तोडलेले असून अनेक गावात कनेक्शन तोडण्याचे काम चालू आहे. कनेक्शन तोडण्यापूर्वी शेतकऱ्यांना सात दिवस अगोदर नोटीस देणे आवश्यक होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी तसे न करता अचानक कनेक्शन तोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांकडील जनावरे पिण्याच्या पाण्या अभावी तडफडत असून तालुक्यातील काही जनावरे पाण्या अभावी दगावले आहेत हा शेतकऱ्यावर घोर अन्याय असून एकदरित या तालुक्यातील शेतकऱ्यावर गेल्या दोन वर्षांपासून चे कोरोना संकटाला जिल्ह्यातील व तालु्यातील शेतकरी शेतमजूर उधवस्त होऊन देशोधडीला लागला. ह्या कोरोना संकटाला सावरण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरलेले असून पुन्हा तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने व ओमायक्रोन नावाच्या विषाणूची लागण या देशात होऊ लागलेली आहे आणि दुसरे असे की गेल्या सप्टेंबर -ऑक्टोंबर 2021 मध्ये अतिवृष्टीचा महकोप यात शेतकऱ्यांची पिके जमिनी सहित वाहून गेली, सडली, जनावरे मेली, मनुष्यहानी झाली तरी अद्याप पर्यंत जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या पिकाच्या नुकसान भरपाई चे अनुदान मिळाले नसून जे अनुदान मिळाले ते अत्यंत तुटपुंजे असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे आणि वर पुन्हा या महावितरण कंपनीच्या आडमुठे पणामुळे तालुक्यातील शेतकरी दुहेरी तिहेरी संकटात आलेले असताना शासनाने सहकार्य करणे ऐवजी सरकार व महावितरण कंपनी सूडाच्या भावनेने वागत असून आपण शेतकऱ्यांकडील थकित विज बिल माफ करून शेतकऱ्याचे वरील कनेक्शन डी,पि वरील त्वरित जोडून द्यावे अन्यथा खालील मागण्यावर गुरुवार दि.16/12/2021 रोजी ठीक 11 वाजता चुंबळी फाटा या ठिकाणी तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल त्यामध्ये हजारोंच्या संख्येने सहभाग करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
मागण्या:-
1) शेतकऱ्यांच्या डी.पी वरील कनेक्शन त्वरित जोडण्यात येऊन शेतकऱ्याकडील थकित विज बिल माफ करावे.
2) शेतकऱ्यांना तोंडी किंवा लेखी सूचना न देता कनेक्शन तोडले त्या संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी.
3) तालुक्यातील उद्योग धंद्यावाली कारखानदार नेते अधिकारी यांच्याकडील थकित व वसुलीच्या वीज बिलाची यादी द्यावी.
4) वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्याचाबचाव होण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. ( उदा. रानडुक्कर, बिबट्या, सर्पदंश, ई.)
5) विज महावितरणचे खाजगीकरण रद्द करून एम. एस. ई. बी. मार्फत वीज पुरवठा करावा.
7) महावितरण कंपनी व त्याच्या कर्मचाऱ्यांनी गावातील दळणवळण व पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाही करण्यात यावी.
अशा प्रकारचे प्रसिद्धीपत्रक
कॉ. महादेव नागरगोजे, भाई विष्णुपंत घोलप, डॉ. गणेश ढवळे, कॉ. भगवानराव जावळे, मोहन सोनवणे, ज्ञानोबा माऊली जगदाळे, आश्रू पवळ, राजेंद्र येवले, त्रिंबक पठाडे, कॉ. आत्माराम राख, कॉ. सुधाकर देवराव शिरसाठ, कॉ. विठ्ठल दादा पवळ, कॉ. दत्तू शिरसाट, कॉ.डॉ.लक्ष्मण विघ्ने, रमेश देशमाने, सखाराम पेचे, प्रल्हाद भोरे, कॉ. आशरफ भाई, कॉ. हसन बाबा, भागवत नागरे, गंगाराम तांबे, कॉ. अरुण येवले, कॉ.अतुल देवडे, कॉ.बबन हुळजुते, कॉ.श्रीरंग नागरगोजे, को.नामदेव नाईकवाडे, को.सुधाकर फाटे, कॉ.तात्या नागथई इत्यादींनी दिलेले आहे.

साबळे वस्ती वर जाणार्या रस्त्याची दयनिय अवस्था

बीड:आठवडा विशेष टीम– पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथुन तलावाच्या पाटाच्या साईड़ने जाणारा रस्ता आहे अवघे दोन किलोमीटर साबळे वस्ती आहे परंतु येथील नागरीकांना चिखल गाळाने माखलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे बहुतांश वेळा वस्तीवरील नागरीक रस्तावरून पड़ून जखमी ही झाले आहेत परंतू या साबळे वस्ती ला कोणी ही वाली राहीला नाही.अंदाजे वीस मतदान असलेली वस्ती आहे पण येथील नागरीकांना ग्रामपंचायत धनगरजवळका निवड़णुक जवळ येताच आश्वासन देते या धनगरजवळका ग्रामपंचायत निवड़णुक वेळी ही आश्वासन देण्यात आले होते चार वर्षं उलटुन ही कसलाही रस्ता केला नाही.पाठीमीगील काही दिवसात अर्धा एक किलोमीटर वरती खड़ी आणि मुरूम टाकण्यात आला आहे परंतु तो पण निकृष्ठ दर्जाचा रस्ता केला आहे याची चौकशी करण्यात यावी असे नागरीकांचे म्हणणे आहे.साबळे वस्ती वरील नागरिकांचे म्हणणे आहे ग्रामपंचायत निड़णुक जवळ आली आहे तेव्हा आम्ही पण लोकप्रतिनीधींना त्यांची जागा दाखऊन देऊ.

कारेगांव मार्ग पाटोदा ते शिरूर,भगवान गड,औरंगाबाद, बस सुरु करा – एमआयएम

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
कारेगांव मार्गे पाटोदा शिरूर भगवान गड औरंगाबाद जाणारी बस गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे,त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.
खाजगी गाडया आणि खाजगी बस या रस्त्यावर धावू शकतात, मग पाटोदा तालुक्यातून शिरूर,भगवान गड औरंगाबाद कारेगांव मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्राची लाल परी बस का बंद आहे ? रस्त्याचे काम झाले आहे,जर रस्ता खराब होता,तर खाजगी गाडी या रस्त्यावर कशी चालते?कोविड १९ आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात आहेत. व्यवसाय बंद आहे.त्यामुळे नागरिक खाजगी गाडीने प्रवास करू शकत नाही.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता एम.आए.एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मा.असदुद्दीन ओवैसी,एम.आए.एम महाराष्ट्र अध्यक्ष औरंगाबाद खा.मा.इम्तियाज जलील, महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी,मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला,एम.आय.एम बीड जिल्हा अध्यक्ष अॅड शेख शफीक भाऊ, यांच्या सूचनेवरून एम.आए.एम पाटोदा तालुका यांच्या वतीने पाटोदा परिवहन महामंडळाच्या व्यस्थापकांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली नागरिकांसाठी ही मार्ग बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी
जर ही बस सेवा ८ दिवसात चालू झाली नाही, तर एम आय एम पाटोदा तालुका तर्फे पाटोदा बस स्टँडच्या बाहेर या भागातील नागरिकांसह आंदोलन करणार
असा इशाराही एम.आए.एम पाटोदा तालुकाध्यक्ष हाफिज तनवीर सय्यद यानी दिला या वेळी एम.आए.एम चे पाटोदा तालुका युवक अध्यक्ष मुदस्सिर सैय्यद आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.