लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक; शांततेची परंपरा कायम राखत प्रशासनाला सहकार्य करा – स.पो.नि. शेख मुस्तफा यांचे आवाहन

लिंबागणेश(डॉ गणेश ढवळे):कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पुर्वपदावर आल्यामुळे यावर्षी मोठ्याप्रमाणात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे सुतोवाच असुन गणेशोत्सवात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करावेत मात्र याचवेळी लिंबागणेशकरांनी शांततेची परंपरा कायम राखावी कुठलेही गालबोट लागु देऊ नये उत्सव शांततेत साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो. नि.शेख मुस्तफा यांनी आज दि.२५ ऑगस्ट गुरूवार रोजी लिंबागणेश येथील हनुमान मंदिरात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेकनुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.शेख मुस्तफा यांनी लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी……उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शेख मुस्तफा बोलत होते,गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलीस अधिक्षक बीड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध सुचना करताना जबरदस्तीने कोणाकडुनही वर्गणी मागु नये,सर्व नियम कायद्यांची माहिती देऊन सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट दिसुन आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे संपर्क साधावा,महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी, ईतर स्वच्छतेबाबत काळजी घेतानाच ध्वनी प्रदुषणाबाबतही काळजी घ्यावी तसेच मंडळाचे ठिकाणी दाखविण्यात येणारे देखावे आक्षेपार्ह अगर सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच गणेशमंडपामुळे रहदारीस अडथळा होणार नाही,गणेश मंडळाचे ठिकाणी स्वयंसेवक नेमुन मंडळांच्या पदाधिका-यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे. आदि सुचना करण्यात आल्या याचवेळी पदाधिका-यांनी मांडलेल्या समस्या संदर्भात माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना बाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बैठकीत नेकनुर पोलीस स्टेशनचे सफौ. निकाळजे,पो.हे.राऊत,पोलीस नाईक मुंढे,पोलीस अंमलदार ढाकणे,ग्रामसेवक राठोड,उपसरपंच शंकर वाणी,माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे ,सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, विक्की आप्पा वाणी,गणपति मंदिर विश्वस्त,चिंतामण जोशी, पुजारी श्रीकांत जोशी,जीवन मुळे,श्रीकृष्ण कानिटकर,गणेश थोरात,बाळकृष्ण थोरात ,बाळासाहेब जाधव,दादासाहेब गायकवाड,संतोष भोसले,विठ्ठल कदम,मोहन कोटुळे,विनायक मोरे,संतोष वाणी,सुरज कदम,औदुंबर नाईकवाडे,सौरभ कानिटकर,चेतन कानिटकर,गणपत दाभाडे,कचरू थोरात आदि उपस्थित होते.

मांजरसुंभा-पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ डी वर मोटारसायकल स्वार अपघातात जागीच ठार

पाटोदा(प्रतिनिधी): आज दिनांक १४ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता मांजरसुंभा ते पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५४८ -डी वर सासवड फाट्यावर मोटारसायकल स्वार मुकींद पवार रा. हिंगणी हवेली तालुक्यातील.गेवराई जि.बीड हे पाटोदा येथुन होंडा मोटारसायकल (क्रमांक एमएच.एच.-४२ ए.डी.९६६५) गावी जात असताना सासवड फाट्यावर कंटेनर (क्रमांक एम.एच.४६ बीड.बी.४६८)ड्रायव्हर सुनिल लक्ष्मण नाकाडे रा.जाटदेवळा ता.पाथर्डी जि.अहमदनगर मांजरसुंभाकडुन पाटोद्याकडे जात असताना अपघात होऊन अपघातात मुकींद पवार जागीच ठार झाले. नेकनुर पोलीस व मांजरसुंभा महामार्ग पोलीस प्रशासन यांनी स्थळ पंचनामा केला.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निकृष्ट रस्त्याप्रकरणात व ठेकेदाराच्या मनमानी कारभार विरोधात मुळुकवाडी- मसेवाडीकरांचे चक्काजाम आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड प्रतिनिधी: बीड तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड व ठेकेदाराने संगनमतानेच बोगस रस्ता करत मनमानी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१५ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी मुळुकवाडी फाट्यावर रस्त्याची गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी तसेच आधिकारी-ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत निवेदन उप-अभियंता (प्रमंग्रासयो) महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड, मंडळ आधिकारी वंजारे, एपीआय नेकनुर पोलीस स्टेशन शेख मुस्तफा, पीएसआय विलास जाधव, एएसआय निकाळजे,पोना. ढाकणे, पो.ना. सय्यद अब्दुल, पो.ना.डिडुळ, यांना देण्यात आले.
यावेळी आंदोलनात मुळुकवाडी सरपंच कृष्णा पितळे , गजानन रंदवे, भास्कर ढास, कृष्णा ढास, अविनाश रंदवे, सुधाकर मांडवे,अवधुत ढास, हौसराव मोरे, जयराम मांडवे, तुकाराम मांडवे, पंकज मांडवे, दिनकर मोरे, संतोष मांडवे, सुभाष मांडवे, चांगदेव मांडवे, शहादेव मांडवे, महादेव मोहीते, दिपक मांडवे, विजय सोनावणे, भिमराव मांडवे, विठ्ठल जाधव, तुळशीराम काटकर,महादेव मांडवे आदि सहभागी होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड अंतर्गत रा.मा.५६ ते मुळुकवाडी-ते मसेवाडी रस्ता सुधारणा कि.मी.०/०० ते ०२/८०० पॅकेज क्रमांक RDBEE-25 ,अंदाजित किंमत १ कोटी २६ लाख रूपये अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात येत नसुन अत्यंत निकृष्ट रस्ता करण्यात आला असून जागोजागी अर्धवट रखडलेला रस्ता असून रस्त्याची जाडी,रूंदी अंदाजपत्रकाप्रमाणे नसुन भोसले वस्तिवरील रस्त्यालगत विहीरीला संरक्षण भिंत नाही तसेच मसेवाडी गावामध्ये ठेकेदार जुन्या डांबरी रस्त्यावर रस्ता न करता मनमानी कारभार करत गोरगरीब ग्रामस्थांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.

ग्रामिण भागात दर्जेदार रस्त्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता सुरू असतानाच अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्याची दक्षता घ्यावी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
ग्रामिण भागातील दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था आधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून थातूरमातूर रस्ता करून निधीचा अपहार करण्यात येत असून अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी ग्रमस्थांनी दक्षता घेणे गरजेचे असुन रस्ता सुरू असतानाच लक्ष देणे गरजेचे आहे.

महसुल प्रशासनातील आधिका-यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष
___
रस्त्यासाठी वापरली जाणारी खडी अवैध खडीक्रशर द्वारे तसेच मुरूम रस्त्याशेजारील खोदकाम करून साईडपट्ट्यासाठी वापरण्यात येतो मात्र वाहतुक खर्च दुरून आणल्याचा दाखवून शासनाची दिशाभूल व संबधित शासकीय आधिका-यांशी अर्थपुर्ण हितसंबंध जोपासत शासनाचा महसुल बुडवून कोट्यावधी रूपयांचे नुकसान करण्यात येते संबधित प्रकरणात तक्रार केल्यानंतर सुद्धा चौकशी अथवा कारवाई करण्यास आधिकारी उत्सुक नसतात.


ग्रामिण रस्ते ग्रामस्थांसाठी की आधिकारी-ठेकेदार पोसण्यासाठी ? ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड(आठवडा विशेष प्रतिनिधी): बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बीड येथील प्रशासकीय आधिकारी यांनी संगनमतानेच ठेकेदार यांच्याशी निकृष्ट दर्जाचे रस्ते, गौणखनिज चोरी, रस्त्याची कामे वेळेत पुर्ण न करणे, दंड आकारणीचे आदेश असुन सुद्धा दंड न भरणे आदि प्रकरणात शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसुल बुडवून कोट्यावधी रूपयांचे नुकसान व ग्रामस्थांची अडचण आदि प्रकरणात संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी ठेकेदार यांच्या कंपन्या काळ्या यादीत टाकण्यात येऊन संबधित आधिकारी व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी आदि मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२१ मार्च २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे ,मोहम्मद मोईज्जोदीन बीडकर, शेख मुबीन, किस्किंदा पांचाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,पांचाळ प्रमोद, आरूण खेमाडे, गायकवाड जे.एन.,यल्लु रजपुत सहभागी असून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद,लाचलुचपत प्रतिबंधक विभागीय औरंगाबाद यांना निवेदन देण्यात आले.
बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत करण्यात आलेले निकृष्ट रस्त्याप्रकरणात कार्यकारी अभियंता यांच्या व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी तसेच वेळेत काम पुर्ण न करणे व अतिशय निकृष्ट रस्त्याप्रकरणात गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी व ठेकेदार यांच्या कंपन्या काळ्या यादीत टाकुन गौणखनिज चोरी प्रकरणात आर्थिक दंड आकारण्यात यावा.

बीड जिल्ह्य़ातील निकृष्ट रस्ता कामे
_____
अ) बीड तालुक्यातील
१)बीड तालुक्यातील मौजे मुळुकवाडी ते मसेवाडी रस्ता सुधारणा लांबी २:८०० किमी अंदाजे किंमत १ कोटी २६ लाख मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड
१) बीड तालुक्यातील पालवण भाळवणी- बेलेश्वर- लिंबागणेश १३ कोटी रूपये
२)बीड तालुक्यातील पिंपरनई ते बांगरवाडा रस्ता, अडीच कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत
२)बीड तालुक्यातील लिंबागणेश-अंजनवती-घारगाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत
३)बीड तालुक्यातील उमरद-नागापुर-ब-हाणपुर ४ कोटी ग्रामिण रस्ते विकास संस्था
४)म्हाळसजवळा ते चौसाळा रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग
५)बीड तालुक्यातील मन्यारवाडी-आंबेसावळी,ढेकणमोहा,ब-हाणपुर ,-नागपुर ते उंबरी फाटा
६)बीड तालुक्यातील मौजे पाटोदा (बेलखंडी)ग्रांमपंचायत अंतर्गत पाटोदा (बेलखंडी)ते हनुमानवस्ति
७)बीड तालुक्यातील इजिमा ११४ ते मौजे धुमाळवाडी रस्ता सुधारणा
८)बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव ते मानेवाडी मार्गे तेलपवस्ती रस्ता जुन्या रस्त्यासह पुलाची डागडुजी, नोंद मात्र नव्या कामाची

ब) पाटोदा तालुक्यातील
१)मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे ढाळेवाडी ते पाटोदा ६ किमी अंदाजे किंमत ३ कोटी २२ लाख
२)पाटोदा तालुक्यातील मांजरसुंभा पाटोदा ते सौंदाणा १:७ किलोमीटर अंदाजे किंमत ८२ लाख रूपये

क) आष्टी तालुक्यातील
१)आष्टी शहरापासुन आयटीआय काॅलेज रस्ता-शिंदेवाडी फाट्यापर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरण
२) आष्टी तालुक्यातील आष्टी ते शेकापुर-देसुर बांधकाम विभाग मार्फत रस्ता अडीच कोटी किंमत
३)आष्टी तालुक्यातील धानोरा ते घोंगडेवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास

ड) गेवराई तालुक्यातील
१) उमापूर ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मारूतीची वाडी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत.
२)गेवराई तालुक्यातील मौजे टाकरवन ते टाकरवन फाटा रस्ता

कार्यकारी अभियंता बेद्रे यांची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा

महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था, कार्यकारी अभियंता, ए.एम. बेद्रे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोटीस बजावली गौणखनिज कंत्राटदाराने कोठुन आणले?याची तपासणी न करताच देयके, कंत्राटदाराने गौणखनिज पावत्या आणि माहीती दिली नसतानाच देयके अदा केले, शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता असुन शासकीय कामात जाणुनबुजुन निष्काळजीपणा केल्याचे नोटीसीत म्हटले आहे, जोगदंड यांच्या डी. बी. कन्स्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच तत्कालीन कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था ए.एम.बेद्रे यांची व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी.

डी. बी. कन्स्ट्रक्शन दंड आकारणीचे आदेश, वसुली मात्र नाही

-डाॅ.बाबु जोगदंड यांच्या डी .बी कन्स्ट्रक्शने रस्त्याची कामे वेळेत पुर्ण केली नाहीत म्हणून ग्रामिण रस्ते विकास संस्थेने ठेकेदार जोगदंडच्या डीबी कन्स्ट्रक्शनला १ ऑक्टोबर २०१९ पासुन प्रतिदिवस १००० रूपये दंड ठोठावला, त्या दंडाची रक्कम १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ४ लाख ४४ हजार रूपये होती, मात्र वसुलीच करण्यात आली नाही संबधित प्रकरणात दंड वसुल करण्यात यावा.

गौणखनिज चोरी प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात यावी

________
बीड जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या आधिकारी व ठेकेदार यांनी संगनमतानेच गौणखनिज चोरी करून रस्ते कामासाठी वापर केला असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच शासनाची दिशाभूल व कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडवून आर्थिक नुकसान केल्याबद्दल आवश्यक कारवाई करण्यात यावी.


जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन – डॉ गणेश ढवळे

बीड:प्रतिनिधी― बीड जिल्ह्य़ातील महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहे, मुलींचा घटता जन्मदर, नोंदणी व प्रसुति आकडेवारीत तफावत तसेच कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने असुरक्षिततेचे वातावरण ,सामाजिक महिला कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव, सॅनिटरी नॅपकीनचा तुटवडा, कोविड दरम्यान कुटुबप्रमुखाच्या मृत्युनंतर बालसंगोपण योजनेंतर्गत लाभ न मिळणे आदि आरोग्य विषयक समस्या, अल्पवयीन मेघा आटोळेचा कोविड लसीकरण दरम्यान वैद्यकीय आधिकारी-शालेय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्युप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस,मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन, नितिन सोनावणे, डाॅ.संजय तांदळे, अड. संगीता धसे, संजीवनी राऊत, किस्किंदा पांचाळ ,भिवराबाई पांचाळ, शिवकन्या कागदे, वशिष्ठ साबळे, मोहीनी पाटील,माजी सैनिक अशोक येडे, रामधन जमाले, सादेक सय्यद, शिवाजी आटुळे आदि सहभागी होते, निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, आरोग्य मंत्री, अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था ढासळली, महिला असुरक्षित:-अड.संगीता धसे
____
बीड शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असुन महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असुन पोलीस प्रशासनातील आधिकारी पीडीत महिलांच्या केसेस दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले असुन गुन्ह्याचा वाढता आलेख चिंतेची बाब असून महिलांवरील अत्याचार प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाची वेळ यावी ही दुर्दैवी बाब असून भविष्यात हा अन्याय सहन केला जाणार नाही.

निष्काळजीपणामुळू मेघाच्या मृत्युप्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:-शिवाजी आटोळे
______
माझी मुलगी मेघाचे १५ वर्ष वय नसताना तसेच तिला एसएलई आजार असल्याचे शालेय व्यवस्थापनाला लस देऊ नका असे कळवुन सुद्धा मुलीला लस घेतली नाहीतर परिक्षेला बसु दिले जाणार नाही असा धाक दाखवून दिलेल्या कोविड लसीकरण दरम्यान माझी मुलगी मेघा ईयत्ता नववीत शिकत होती, लसीकरणानंतर तिची तब्येत खालावली आणि त्यातच तिचा बळी गेला, वैद्यकीय-आधिकारी, शालेय व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

भ्रष्टाचार दडपण्यासाठी राजकीय दबाव, पदाचा दुरूपयोग:-किस्कींदा पांचाळ
_____
महिला बचतगटामार्फत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर राजकीय पदाधिकारी यांनी महिला आयोग सदस्यपदाचा महिलांना न्याय देण्याऐवजी दडपशाहीचा वापर करत दैनिकात दिशाभूल करून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून महिला आयोग सदस्य पदावरून हटवण्यात यावे.

मुलींचा मृत्युदर; नोंदणी व प्रसुती दरम्यान तफावत, सॅनिटरी नॅपकीनचा तुटवटा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
___
बीड जिल्ह्य़ातील मुलींचा जन्मदर कमी असल्याचे पीसीपीएनडीटी कायदा १९९४ च्या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डाॅ.आशा मिरगे यांनी पत्रकार परीषदेत जाहीर करत कोरोना कालावधीत आरोग्य विभागाचे सोनोग्राफी सेंटर कडे दुर्लक्ष झाल्याचे नमुद केले होते त्याच दरम्यान जिल्ह्य़ातील नोंदणी व प्रसुतिच्या आकडेवारीत मोठ्याप्रमाणात तफावत असुन गर्भवती मातानोंदणी ४८,८३८ आणि एकुण प्रसुतिची संख्या ४५,४१५ असुन एकुण ३००० गर्भांची तफावत असुन आरोग्य विभागातील आधिका-यांकडुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असून संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी.तसेच वर्षभरापासुन सॅनिटरी नॅपकीनचा असलेला तुटवडा दुर करण्यात येऊन किशोरवयीन मुलींचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. तसेच बीड शहरातील नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत.

बीड तालुक्यातील अंजणवती गावात दोन रात्रीत ऊसतोड मजुर सख्ख्या भावांचे गोठे जळाले; म्हैश गोठ्यातच जळुन खाक

लिंबागणेश(प्रतिनिधी):
बीड तालुक्यातील मौजे अंजनवती गावातील येडेवस्तीवर सलग दोन रात्रीत दोन सख्या ऊसतोड मजुरांचे गोठे आगीत जळुन भस्मसात झाले असून आगीत म्हैस जागीच जळुन खाक झाली असून बैल व म्हैस गंभीर रित्या भाजल्या असुन संशयास्पद प्रकरण असून संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येऊन महसुल प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवशाहु ऊसतोड मजुर कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केली आहे.

जाणीवपुर्वक गोठ्याला आग लावली, नुकसान भरपाई द्यावी:- राजेभाऊ येडे
____
दि.४ मार्च शुक्रवार रोजी रात्री १० वाजता र गोठ्यात आगीचे लोळ उठलेले दिसले मोठ्याप्रयत्नाने आगीतुन गोठ्यात बांधलेल्या जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात एक बैल व दोन म्हशी गंभीर रित्या भाजल्या असून एक गाबण म्हैश गोठ्यातच जागीच जळुन खाक झाली, गोठ्यातच असणारी शेतीची आवजारे जळुन खाक झाली यात एकुण अंदाजे २ लाख रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी एवढीच विनंती.

प्रकरण संशयास्पद असुन शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण, शासनाने नुकसान भरपाई द्यावी:-बाळासाहेब मोरे, प्रदेशाध्यक्ष शिवशाहु ऊसतोड मजुर कामगार संघटना
______
येडेवस्तीवरील दोन सख्या ऊसतोड मजुर भावांच्या गोठ्याला लागलेली आग संशयास्पद असुन शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ऊसतोड मजुर असणा-या येडे बंधुच्या जळालेल्या गोठ्याची अवस्था अत्यंत हद्यद्रावक असून तलाठी आणि पशुवैदकीय आधिकारी यांना कल्पना दिली असून रितसर स्थळपंचनामा, पोस्टमार्टम करून महसुल प्रशासनाने नुकसान भरपाई देऊन आर्थिक हातभार लावावा.


महिलेशी असभ्य वर्तण प्रकरणात डाॅ.अशोक बांगर यांना निलंबित करण्यासाठी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन

बीड(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील नेकनुर कुटीर रूग्णालयातील महिलेशी असभ् य वर्तण करणा-या आयुष विभागातील डाॅ.अशोक बांगर यांच्यामुळे रूग्ण आणि कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पवित्र वैद्यकीय व्यावसायाची बदनामी करणा-या डाॅ.अशोक बांगर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अड.संगिता धसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दि.२१ फेब्रुवारी रोजी डाॅ.सुरेश साबळे यांना भेटून निवेदन देत आंदोलनाचा ईशारा दिला होता परंतु ४ दिवसात त्रिसदस्यीय समिती नेमुन ४ दिवसात अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले होते परंतु ठोस कारवाई न झाल्याने अखेर आज दि.२५ फेब्रुवारी शुक्रवार रोजी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात संजीवनी राऊत, अश्विनी झनझने, किस्किंदा पांचाळ, वर्षा कुलकर्णी, विद्या सेलुकर, शुभांगी कुलकर्णी, डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, स्वप्निल गलधर, युनुस शेख, मोहम्मद मोईज्जोदीन ,शेख मुबीन, परमेश्वर लोंढे,डाॅ.संजय तांदळे, श्रीकांत गदळे आदि सहभागी होते. आंदोलनस्थळी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आज चौकशी समितीची बैठक असून सोमवार पर्यंत ठोस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

जिल्हाप्रशासनाला घटनेचे गांभीर्य नाही , चौकशी समितीचा निव्वळ फार्स –डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_____
नेकनुर कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय आधिकारी डाॅ.अशोक बांगर यांनी महिलांशी असभ्य वर्तण करण्याची ही पहिलीच वेळ नसुन त्यांच्याविषयी यापुर्वीही तक्रारी आलेल्या असून कर्तव्यावर मद्यपान करण्यासहीत असभ्य वर्तणाची तक्रार २० दिवसापुर्वी प्राप्त होऊन सुद्धा राजकीय वरदहस्त असल्याने तसेच पिडीत महिला व वैद्यकीय आधिका-यांवर दडपण आणुन प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न असून जिल्हाप्रशासनाला या विषयांचे गांभीर्य नसुन दि.२१ फेब्रुवारी रोजी त्रिसदस्यीय समिती गठीत करून ४ दिवसात अहवाल सादर केल्यानंतर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी देऊन सुद्धा ठोस कारवाई न केल्यामुळे धरणे आंदोलन करण्याची वेळ आली, तात्काळ ठोस कारवाई द्वारे संदेश जाऊन महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे.

भ्रष्टाचाऱ्यांची संरक्षक कवच – बोगस क्रिडा प्रमाणपत्र अभय योजना रद्दबातल करा अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार: डॉ गणेश ढवळे

लिंबागणेश(वार्ताहर):
बोगस प्रमाणपत्र वितरीत करणारी टोळी महाराष्ट्र राज्यात कार्यरत असुन कोट्यावधी रूपयांची उलाढाल करत प्रामाणिकपणे कष्टकरणारांच्या हक्कावर गदा आणत केवळ आर्थिक गैरव्यवहार करत मोठ्याप्रमाणात पैसा कमावणे उद्दीष्ट्य असणारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्र शासन भ्रष्टाचार करणारांचे संरक्षक कवच बनत असुन त्याचाच भाग म्हणून बोगस क्रिडा प्रमाणपत्र अभय योजना लागु केली असून ही योजना तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा उच्च न्यायालयात संबधित प्रकरणात जनहीत याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे निवेदन ईमेलद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रिडा विभागाने बोगस क्रिडा प्रमाणपत्र प्रकरणात “अभय योजना “लागु केली असून सदर प्रमाणपत्र शासनाकडे प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्याने जमा केली तर त्यांच्या विरोधात कसलीही कारवाई केली जाणार नाही शिवाय त्यांच्याकडे कसलीही चौकशी देखील केली जाणार नाही असे आदेशात नमुद केले असून बोगस प्रमाणपत्र वितरीत करणा-या राज्यभरातील टोळीचे संरक्षण करण्यासाठी व भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करण्यासाठीच ही योजना लागु केली असून याचप्रकारे,बोगस हिवताप प्रमाणपत्र, तसेच बोगस टीईटी प्रमाणपत्र तसेच अन्य कोणत्याही बोगस प्रमाणपत्र आधारे कोट्यावधी रूपये कमावणा-या व हक्काच्या उमेदवारांवर अन्याय करणा-या टोळीचे संरक्षण कवच असुन संबधित आदेश तात्काळ मागे न घेतल्यास आपणाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असे निवेदन ईमेलद्वारे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, क्रिडा मंत्री, प्रधान सचिव यांना पाठवले असल्याचे डॉ ढवळे यांनी सांगितले आहे.

शहजानपुर चकला अल्पवयीन मुलांच्या मृत्युप्रकरणात प्रशासकीय आधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; तोडलेल्या कडुनिंबाच्या झाडाला श्रद्धांजली

बीड (प्रतिनिधी): मौजे शहजानपुर चकला ता. गेवराई जि.बीड येथिल सिंदफणा नदीपात्रातील अवैध वाळु उत्खनामुळे ४अल्पवयीन मुलांचा बळी गेला असून संबधित प्रकरणात केवळ वाळुमाफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेस जबाबदार संबधित स्थानिक ग्रामविकास यंत्रणा, महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ६० वर्षीय कडुनिंबाचे झाड प्रशासनाने तोडल्यामुळे आंदोलकांची गैरसोय झाली असून “निवारा शेड “उभारण्याची रोटरी सेंट्रल क्लब बीड यांना परवानगी देण्यात यावी या मागण्यांसाठी आज दि. १४ फेब्रुवारी सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येऊन तहसिलदार महसुल जि. का.बीड मनिषा लटपटे यांना निवेदन देण्यात आले, आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, अशोक कातखडे, शेख मुबीन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे आदि सहभागी होते.

आंदोलनकर्त्यांचा साक्षीदार असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला श्रद्धांजली

____

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी असणारे ६० वर्षीय कडुनिंबाचे झाड नगरपरिषद प्रशासनाकडुन तोडण्यात आले असून आंदोलनकर्त्यांची हक्काची सावली हिरावली असुन उन्हातान्हात गोरगरीब जिल्हाप्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी आंदोलनकर्त्यांची गैरसोय झाली असून आजच आंदोलनकर्ते यांना उन्हातान्हात धरणे आंदोलन करण्याची वेळ आली, त्यामुळेच आंदोलनकर्त्यामध्ये जिल्हाप्रशासनाविषयी रोष व्यक्त करण्यात आला.
तत्पुर्वी आयोजित केलेल्या शोकसभेत तोडलेल्या कडुनिंबाच्या झाडाला पुष्पहार, फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार बालाजी तोंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे,ऊसतोड मजुर नेते मोहन जाधव, सामाजिक कार्यकर्ते शार्दुल देशपांडे आदि उपस्थित होते.


बीड: चौसाळा बसस्थानक कधी स्वछ सुंदर बनणार ?

मांजरसुंबा: चौसाळा येथील बसस्थानकामध्ये असलेल्या शौचालय गेल्या ४ महिन्यापूर्वी डागडुजी करण्यासाठी बंद करण्यात आले आहे. ते अद्यापपर्यंत उघडण्यात आले नसल्याने प्रवाशी व नागरिक मुक्तपणे बसस्थानकाच्या चारी बाजूंनी लघुशकेला जात आहेत. त्यामुळे येथील प्रवाशी व नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच महिला व शाळा, कॉलेजसाठी चौसाळा येथे शाळा, महाविद्यालयात ग्रामीण भागातून येत असलेल्या महिला मुलींची कुचंबना होत असून बसस्थानकाची दूरावस्था झाल्याने या ठिकाणी कोणी थांबण्यासह तयार नसते.
बसस्थानकामध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही, कारण की या ठिकाणी असलेल्या सर्व फरशा, कडापे काढून ते अर्धवट सोडून गुत्तेदाराने पोबारा केला आहे. त्या मुळे वयोवृद्ध महिला नागरिकाना उभा रहावे आहे, गुत्तेदाराने काम अर्धवट का ठेवले हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. चौसाळा तालुक्यातील मोठे गाव आहे. मात्र या ठिकाणाहून एकही बस नाही. दिवसभरात ८ ते १० बस येतात, काही बस चौसाळा बसस्थानकात न येता बाहेरू रून बायपासवरून निघून जात आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून येथील बसस्थानकाची दुरूस्ती करून प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर महाजनवाडी फाट्यावर अपघात,४ जखमी १ गंभीर

लिंबागणेश: आज दि.१२ फेब्रुवारी २०२२ वार शनिवार रोजी सकाळी ८ वाजता तुळजापुर येथे दर्शन घेऊन जामखेड कडे जाणारी स्विफ्ट डिझायर लाल रंगाची गाडी (गाडी क्रमांक एम. एच.१३ टीसी २४६ )गाडीवर नियंत्रण सुटल्याने खोल खड्ड्यात पालटली.अपघातात जामखेड येथील अभिषेक अधारे वय २२ वर्षे ,गौरव जाधव वय २४ वर्षे, अक्षय पवार वय २३ वर्षे, अक्षय जाधव वय २३ वर्षे असून त्यातील एकजण गंभीर जखमी झालेला असून गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
उपघातस्थळी महाजनवाडी येथील शिवाजी घरत लिंबागणेश येथिल विक्की वाणी व त्यांच्या सहका-यांनी जखमीला गाडीच्या बाहेर काढण्यास मदत केली .
घटनास्थळी मांजरसुंभा येथील राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्रातील कर्मचारी ठोंबरे, मेह्त्रे, राठोड पोलीस नाईक व थोरात, उबे काॅन्स्टेबल पोहचले त्यांनी सविस्तर माहीती घेतली. जखमींना रूग्णवाहीके द्वारे बीड जिल्हारूग्णालयात पाठवण्यात आले.

सक्तीची विजबिल वसुली, अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळांच्या अनुदानासाठी शेतक-यांचे बैलगाडीसहीत चक्काजाम आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रझाकारी पद्धतीने कृषिपंपाची विजतोडणी करून कोरोना कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ व तात्काळ विजजोडणी करण्यात यावी तसेच मांजरसुंभा महसुल मंडळातील २३ गावे खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासुन वगळण्यात आली असून त्या गावातील शेतक-यांना अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय मांजरसुंभा येथील राधिका हाॅटेल समोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, , प्रदेशउपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे,भाजपा तालुकाध्यक्ष बीड स्वप्निल गलधर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा बीड बाळासाहेब मोरे,भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष बीड, सौ. वैशालीताई चौरे,उपसरपंच कोळवाडी तुळशीदास महाराज शिंदे, युवा नेते मसु जाधव, सरपंच पालसिंगन विक्रम खंडागळे,सरपंच हिंगणी अंकुश गोरे,उपसरपंच चाकरवाडी, हनुमान चाळक, चेअरमन सेवा सोसायटी सात्रा पोपटराव हावळे, सरपंच बोरखेड बाळासाहेब गावडे, अशोक घोडके, दत्ता जगदाळे, माजी सरपंच शहाजी आण्णा घोडके, बाळासाहेब ढास,नाना चव्हाण, काशिनाथ मांडवे,संभाजी कदम, महादेव नाईकवाडे,विष्णु सुरवसे महाराज, आजिनाथ घरत, दादासाहेब वाघमारे,राहुल खोसे,कल्याण कागदे, आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष बीड माजी सैनिक अशोक येडे, भाजपा युवा नेते अशोकदादा रसाळ,शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक, ऑल इंडीया पॅथर मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, वंचित बहुजन आघाडीचे सहसचिव शेख युनुस च-हाटकर, वंचित नेते संदिप जाधव,आदिंनी आवाहन केले आहे.

जिल्हाप्रशासनाने शब्द न पाळल्यामुळे चक्काजाम आंदोलन
____
३० नोव्हेंबर रोजी बिंदुसरा तलावातील जलसमाधी आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता निकम, व उपअभियंता ग्रामिण गुंजाळ यांनी फोनवरून अधिक्षक अभियंता महावितरण कोलप यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन प्रति रोहीत्र २५,००० रू भरून विजजोडणी करण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु महावितरणच्या आधिका-यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे दि.६ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते परंतु ६ डिसेंबर रोजी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन व” हाय अलर्ट “मुळे पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढु नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे या भुमिकेतुन तूर्तास स्थगित करून दि.९ डिसेंबर गुरूवार रोजी सकाळी ११:३० वाजता मांजरसुंभा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून महावितरण व महसुल प्रशासनातील आधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतरच चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात येईल असे निवेदन महावितरण, महसुल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, तहसिल, पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणकर्ते यांना निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी,शौचालय मुलभुत सुविधांसाठी लाक्षणिक उपोषण ― डाॅ.गणेश ढवळे

बीड(प्रतिनिधी): बीड जिल्ह्य़ातील नागरीकांची विविध मागण्यां संदर्भात लोकशाही मार्गाने न्याय मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आदि ठीकाणी उपोषणकर्ते आंदोलन करत असताना त्यांना पावसाळ्यात, उन्हाळ्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांना निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय आदि मुलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागण्यांसाठी दि.11 ऑक्टोबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, शेख युनुस च-हाटकर, एस. एम.युसुफ पत्रकार,सय्यद ईलियास, पांडुरंग आंधळे, सुदाम कोळेकर,रामधन जमाले,संदिप जाधव ,सय्यद ईलियास,नितिन सोनावणे, सहभागी होते, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषणकर्ते आंदोलन करतात, सर्वसामान्य माणसाला टेंन्ट ऊभारणे आदिचा आर्थिक भार पेलवत नाही, तसेच 4 वर्षापुर्वी उपोषण करणा-या पारधी कुटुंबियांवर झाडाची फांदी कोसळल्याने 4 जण जखमी झाले होते, पावसाळ्यात उपोषणकर्त्यांना भिजावे लागते तर उन्हाळ्यात चक्कर येऊन आंदोलकांना दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळेच निवारा शेड सह पिण्याचे शुद्ध पाणी,शौचालय,तसेच बंदिस्त नालि आदि. मुलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी करत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

5 वर्षापासूनचा लढा, 5 वर्षापुर्वी जिल्हाधिका-यासमोरील नालीची साफसफाई करून आंदोलन केले होते – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
6 एप्रिल 2015 रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली वरील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडेझुडपे तोडुन, नालीची साफसफाई करून गांधिगिरी आंदोलन करण्यात आले होते, विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध होऊन या अनोख्या आंदोलनाचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात आले होते, त्यानंतर दि. 13 एप्रिल 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.

रोटरी क्लबने निवारा शेडसाठी पुढाकार घेतलाय ,जिल्हाधिका-यांची परवानगी आवश्यक – डाॅ.सुदाम तांदळे

उपोषणकर्ते यांच्या निवा-यासाठी शेड उपलब्ध करून देण्यात यावे यासाठि डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस च-हाटकर,के.के.वडमारे पांडुरंग आंधळे, सुदाम कोळेकर, पत्रकार एस. एम.युसुफ, आपचे रामधन जमाले, भाऊसाहेब फुंदे,दिनानाथ शेवालीकर आदिंनी लेखी निवेदन जिल्हाधिका-यांना दिले असून या संदर्भात रोटरी क्लबच्या पदाधिका-यांना निवारा शेडसाठी सहकार्य करण्याची लेखी निवेदनाद्वारे विनंती केल्यानंतर त्यांनी सहमती दर्शवित जिल्हाधिका-यांच्या परवानगीची आवश्यकता असल्याने त्यासाठी सोमवारी जिल्हाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून परवानगी मागण्यात येणार आहे.

बोगस जाॅबकार्ड प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत ―डाॅ.गणेश ढवळे

बीड:नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)― बीड जिल्ह्य़ातील नरेगा गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने घोटाळा प्रकरणात चौकशीकडे दुर्लक्ष केल्याने बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यातच बीड जिल्ह्य़ातील कोरोना कालावधीत बोगस कुटुंब दाखवुन त्यांच्या नावाने कागदोपत्रीच कामे दाखवुन कोट्यावधी रूपयांचा अपहार सरपंच, ग्रामसेवक, तसेच प्रशासकीय आधिकारी यांनी संगनमतानेच केला असून संबधित प्रकरणात गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी.

केज तालुक्यातील लहुरी नरेगा गैरव्यवहार प्रकरणात फौजदारी कारवाई करावी

केज तालुक्यातील लहुरी ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा कामात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला असून संबधित प्रकरणात सरपंच, ग्रामसेवक, तसेच पंचायत समिती गटविकास आधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत रोहयो मंत्री, प्रधान सचिव रोहयो मंत्रालय, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.

चौसाळ्यात दारूच्या नशेत मुलाने केला आईचा खुन

बीड:नानासाहेब डिडुळ― शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आईला बेदम मारहाण केली. यामध्ये सदर महिलेचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. ही घटना चौसाळा येथे घडली.आईचा जीव गेल्याचे लक्षात येताच मुलाने पळून जात सासरवाडी गाठली. आरोपी मुलास पोलिसांनी पाठलाग करत तात्काळ अटक केली.
चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे वय70 वर्षे या महिललेचा मुलगा मदन पांडुरंग मानगिरे वय 28 वर्ष जागा विकली त्या पैशाचा माझा मला हिस्सा दे असे म्हणत दारूच्या नशेत नेहमीच मारहाण करत असे. चौसाळा पोलीस चौकीत नेहमी यासंदर्भात तक्रार केली जायची. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमूळे या प्रकरणावर पांघरून घातले जायचे. शुक्रवारी देखील असाच नेहमीप्रमाणे प्रकार घडला. मदन मानगिरे याने आई प्रयागबाई हिला बेदम मारहाण केली. या जबरदस्त झालेल्या मारहाणीत तिचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान आजूबाजूच्या लोकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर व मुलाची दारूची नशा कमी झाल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच एपीआय विलास जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी आरोपी सासरवाडी असलेल्या महाकाळा येथे पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पीएसआय लक्ष्‍मण केंद्रे यांनी तत्परता दाखवत स्वतःच्या खाजगी वाहनाने पाठलाग सुरू केला दरम्यान आरोपी मदन यास दुचाकीवरून लहान मुलासह पळून जात असताना शहागड जवळ पकडण्यात आले. यामध्ये मृत महिलादेखील नेहमीच दारू पित असल्याचं सांगितले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा नोंद केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.